हाता पायाला मुंग्या येण्याची कारणे आणि घरगुती उपचार जाणून घ्या


आपण सर्वांनीच एकदा तरी हाता पायाला मुंग्या येण्याचा अनुभव घेतला आहे. हाता, पायाला मुंग्या येणे म्हणजेच आपल्या शरीरातील रक्ताचा प्रभाव एखाद्या भागावर किंवा अंगावर जोरजोरात वाढायला लागतो. अनेकदा एका स्थितीत बसल्यामुळे किंवा हालचाल न करता जास्त वेळ एका ठिकाणी बसणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला मुंग्या येतात.

हाता, पायाला मुंग्या आल्यामुळे आपला तो भाग सुन्न होतो किंवा बधीर होतो. असे वाटते जसे की आपल्या शरीरात तो अवयव नाही आहे. हात किंवा पायाला मुंग्या येणे ही सर्वसामान्य समस्या आहे. पण ही समस्या अनेक लोकांना वारंवार उद्भवत असते. काही लोकांना तर भरपूर वेळा हाता,पायाला मुंग्या येतात.

हात किंवा पायाला मुंग्या येणे वेगवेगळी कारणे असू शकतात. मुंग्या येण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरातील एखाद्या शिरेवर जास्त दाब येणे. हात किंवा पायाला मुंग्या येणे हा त्रास किंवा ही समस्या प्रत्येक वयोगटातील लोकांना होऊ शकते.

हात व पायाला एकदा किंवा दोनदा मुंग्या येणे ही सर्वसामान्य बाब आहे. पण जर सतत हाता, पायाला मुंग्या येत असतील तर त्यावर वेळीच उपाय केले पाहिजे. जर तुम्ही यावर वेळीच उपाय केले नाहीत तर तुम्हाला हात किंवा पायाला मुंग्या येणे याचा अधिक प्रमाणात त्रास होऊ शकतो.

हाता पायाला मुंग्या येण्याची कारणे :-

तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या हात किंवा पायाला मुंग्या येण्याचे मुख्य कारणे कोणती आहेत? त्याचबरोबर हात किंवा पायाला येणे थांबवण्यासाठी कोण कोणते घरगुती व प्रभावशाली उपाय करता येऊ शकतात ? चला तर मग बघूया !

विटामिन बी – १२ ची कमतरता :-

जर तुम्हाला वारंवार हात किंवा पायांना मुंग्या येत असतील, तर तुमच्या शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता असल्यामुळे हा त्रास तुम्हाला जाणवू शकतो. शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता असल्यामुळे, आपल्याला थकवा येणे त्याचबरोबर मुंग्या येणे अशा समस्या होऊ शकतात.

मानेच्या नसेवर दबाव पडल्यामुळे :-

हाता पायाला मुंग्या येण्याचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे आपल्या मानेच्या नसेवर अतिप्रमाणात दबाव पडणे. यामुळे आपल्याला मुंग्या येणे असा त्रास होऊ शकतो. एखाद्या स्थितीत चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे आपल्या मानेच्या नसेवर अतिप्रमाणात दबाव पडतो व त्यामुळे आपल्या हातांना मुंग्या येतात.

थायरॉईड असणे :-

जर तुम्हाला थायरॉईडचा आजार असेल किंवा तुम्हाला थायरॉइड असेल, तर तुम्हाला सतत हात पायाला मुंग्या येणे अशा समस्या जाणवू शकतात.

हात किंवा पायाला येणाऱ्या मुंग्या थांबवण्यासाठी घरगुती उपाय :-

वरील भागात आपण बघितले आपल्या हात किंवा पायाला मुंग्या येणे ही मुख्य कारणे कोणकोणते आहे ? आता आपण जाणून घेणार आहोत हाता पायाला मुंग्या येणे थांबवण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय ? आपण करू शकतो.

नारळाच्या तेलाने मसाज करून बघा :-

जर तुम्ही सतत मुंग्या येणाऱ्या भागावर दहा ते पंधरा मिनिटं नारळाच्या तेलाने मसाज केला, तर त्या भागावर मुंग्या येण्याचे प्रमाण हे कमी होईल. कारण त्या भागावर तेलाचा मसाज केल्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत मिळते.

लसुन खाऊन बघा :-

तुम्हाला जर सतत मुंग्या येणे या त्रासापासून सुटका हवी असेल तर, रोज सकाळी लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या चाऊन खावे. कारण आपल्या आयुर्वेदानुसार लसूण हा वेगवेगळ्या समस्यांसाठी प्रभावशाली काम करतो. लसणाच्या पाकळ्या खाली असे जर तुम्ही दहा ते पंधरा दिवस केले, तर तुम्हाला फरक जाणवू शकतो.

तूप लावून बघा :-

हाता पायाला मुंग्या येणे या पासून आराम मिळवण्यासाठी, रोज रात्री झोपण्याआधी थोडेसे तूप कोमट पाण्यामध्ये मिसळून तो लेप पायाला व हाताला लावावा. तूप हे अत्यंत गुणकारी आहे. तुपाचे अनेक फायदेसुद्धा आहेत. त्यामुळे मुंग्या घालवण्यासाठी तूप हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

दालचिनी वापरून बघा :-

हात किंवा पायाला मुंग्या येण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील रक्तपुरवठा कमी होणे. हा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी दालचिनी उपयुक्त ठरू शकते. दालचिनी चा वापर केल्यामुळे आपल्याला शरीरातील रक्त पुरवठा किंवा रक्त प्रवाह सुरळीत करण्यास मदत मिळते. त्यामुळे रोज सकाळी थोडीशी दालचिनीची पावडर कोमट पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे. त्यामुळे तुमच्या हाता पायाला मुंग्या येण्याचे प्रमाण कमी होईल.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले हाता पायावर मुंग्या येण्याची मुख्य कारणे कोणती ? त्याचबरोबर त्याचे घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *