अवकाळी केस पांढरे होत आहेत का ? काय करावे नक्की जाणून घ्या


आपल्या कुणालाच आवडणार नाही की आपले केस तरुण वयामध्ये म्हणजे अवकाळी केस पांढरे झालेले अथवा तुटलेले तसेच केसांना फाटे फुटणे अशा समस्या आपल्या केसांना नसावे, आपले केस निरोगी व चांगले असावे असे सर्वांनाच वाटते. पण बऱ्याचदा तरुण वयामध्ये आपले केस पांढरे पडायला सुरुवात होते, हळूहळू आपले केस पांढरे होऊ लागतात. अशावेळी प्रश्न पडतो की आपले केस पांढरे का पडत आहे ? तसेच यावर कोणते उपाय आहेत ?

आपण आजकाल बघतो की आपल्या राहणीमानामुळे आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो म्हणजे आपले तरुण वयामध्ये केस पांढरे होणे, तसेच आपण कोणता आहार घेतो कसा आहार घेतो ? त्यावरही आपल्या शरीराच्या बऱ्याच समस्या अवलंबून असतात.

तर मित्रांनो आज आपण याबाबत चर्चा करणार आहोत, जर आपले तरुण वयामध्ये केस पांढरे होत असेल तर त्याची कारणे कोणती ? याच प्रकारे केस पांढरे होण्यापासून आपण आपला बचाव कसा करावा ? त्याच प्रकारे केस पांढरे न होणे यावर घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते  ? चला तर मग बघूया.

अवकाळी केस पांढरे होण्याचे कारण कोणती ?

  1. ताण तणाव घेतल्याने
  2. चुकीचा आहार घेतल्याने
  3. पुरेशी झोप न घेत्ल्यामुले
  4. सतत विचार केल्याने
  5. अनुवंशिक (जेनेटिक)
  6. पुरेसे पोषण न भेटल्याने

बऱ्याचदा आपण खूप ताण तणावामध्ये असतो. आपण खूप सतत विचार करतो. याचप्रकारे आपण शांत झोप घेत नाही. तसेच शरीराला असलेली पुरेशी जर झोप आपण घेतली नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो, पण त्याचा परिणाम आपल्या केसांवर देखील दिसून येतो अवकाळी केस पांढरे होण्यास सुरुवात होते.

बऱ्याचदा अवकाळी केस पांढरे होणे हे अनुवंशिक असते. म्हणजेच पिढ्या नुसार चालत येत असते. तसेच आपण जो आहार घेतो, तो आहार आपल्या शरीराला करतात पोष्टिक आहे का नाही तो आहार आपल्या शरीराला करतात चांगला आहे की नाही हे, आपण तपासत नाही. तसेच चुकीचा आहार घेतल्याने त्याचा सरळ सरळ परिणाम आपल्या शरीरावर तसेच केसांवर दिसून येतो.

अवकाळी केस पांढरे होणे कसे थांबवावे ?

आपण तरुण वयामध्ये केस पांढरे होण्याची कारणे तर बघितली, आता आपण जाणून घेणार आहोत. जर आपली अवकाळी केस पांढरे होत असतील, तर त्यावर कोणते घरगुती व प्रभावशाली उपाय करावे ? जेणेकरून आपले केस पांढरे होणे तात्काळ थांबतील. चला तर मग जाणून घेऊया वरील उपाय.

पुरेशी झोप घेणे :

आपल्या शरीरातील बरेचसे आजार तसेच बऱ्याच अडचणी पुरेशी झोप न घेतल्यामुळे उद्भवतात. जर आपण पुरेशी झोप घेतली नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर व केसांवर दिसून येतो. आपले केस पांढरे होण्यास सुरुवात होते तसेच केस गळती सुरू होते. आपण दिवसभरातून सात ते आठ तास शांत झोप घेणे फार गरजेचे आहे. शांत झोपी शरीराला फार फायद्याची असते. तसेच आपण शांत झोप घेतली तर आपल्या केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

खूप ताण घेणे :

बऱ्याचदा आपण पण कामाचा तसेच काही इतर गोष्टींचा खूप ताण घेतो तसेच अति विचार करते. त्यामुळे त्याचा सर्वत्र परिणाम आपल्या केसांवर होतो केस पांढरे होतात तसेच केस गळती सुरू होते. याच प्रकारे याचा परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर होतो. म्हणून आपण कमीत कमी ताण घ्याव तसेच सतत विचार करणे कमी करावे.

आवळ्याचा रस लावा :

आवळ्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अमोनिया असतो. आपण आवळ्याचा रस आपल्या केसांना लावल्याने आपले केस पांढरे होणे कमी होऊ शकते. याच प्रकारे आपण आवळ्याचा रस आठवड्यातून दोनदा आपल्या केसांना लावू शकतो. आवळ्याचा रस केसांना लावण्या आधी केस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे त्यानंतर आवळ्याचा रस केसांना लावा.

फळांचा रस प्या :

बऱ्याचदा आपला आहार केस पांढरे होण्याचे कारण होऊ शकते. कारण आपल्या आहारामुळे आपल्याला जे विटामिन्स सी तसेच पोषणतत्वे पाहिजेत, ते आपल्या केसांना मिळत नसल्याने आपले केस तरुण वयामध्ये पांढरे होतात. आपण आपल्या आहारामध्ये फळे खाल्ली पाहिजे तसेच फळांचा रस घेतला पाहिजे.

शुद्ध नारळाचे तेल वापरावे :

बऱ्याचदा आपण बाजारात असलेली कोणतेही तेल आपल्या केसांवर लावतो. हे आपल्या केसान करता हानिकारक असते. याच्या मुळे आपले केस पांढरे होण्याची शक्यताही असते. म्हणून आपण आपल्या केसांना नियमितपणे शुद्ध नारळाचे तेल लावावे.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही घरी करून बघा तुम्हाला फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले तरुण वयामध्ये केस पांढरे होण्याची कारणे कोणती त्याचबरोबर त्याचे घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला हि घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *