केसांमध्ये कोंडा होत असेल तर हे घरगुती उपाय नक्की वापरून बघा

प्रत्येक स्त्री पुरुषाला वाटते की आपले केस मुलायम, काळे शार तसेच चांगले दिसावे अर्थातच कारण की स्त्रीचे सौंदर्य हे तिच्या केसावर सुद्धा अवलंबून असते. पण काही कारणाने केसांमध्ये अनेक समस्या येतात त्यातलीच एक समस्या म्हणजे केसांमध्ये कोंडा होणे.

सर्व लोकांचा एक प्रश्न पडतो की कोंडा का होतो ? तसेच कोंडा होण्याची कोणती कारणे नेमके आहेत तरी काय ? बर्याच वेळा कोंडा झाल्यावर आपले केस गळायला लागतात. कारण डोक्यामध्ये कोंडा झाल्याने डोक्यावरील त्वचेची रोमछीद्रे बंद होतात आणि त्याला हानी पोहोचते त्यामुळे बर्याचवेळा नवीन केस उगवायला हि त्रास होतो आणि जी केस आहेत ती पण पडू लागतात.

मग सर्वांना एकच भीती असते की आपल्याला टकले पण तर नाही येणार ? आपण विद्रुप तर नाही न दिसणार ? त्यासाठी ते अनेक वेगवेगळे उपाय करून बघतात पण प्रत्येक वेळेस त्यांना अपयश येत असतो आणि केमिकल उक्त वस्तू वापरून ते अजून केस गळती ला सुरुवात करून घेतात. त्या करिता ते केमिकलचा वापर न करता आपल्याला डोक्यातील कोंडा कसा घालवता येईल या बद्दल विचार करत असतात. त्या करिता आपण आज बघणार आहोत की केसांमध्ये कोंडा निर्माण होण्याची कारणे कोणती तसेच तो कोंडा घालवण्याचे घरगुती प्रभावशाली उपाय काय आहेत ?

केसांमध्ये कोंडा निर्माण होण्याची कारणे :

  • सारखे केस ओले राहणे
  • वेगवेगळे प्रकार चे शैम्पू वापरने
  • डोक्याची त्वचा कोरडी असल्याने
  • दुसऱ्याचा टॉवेल, कंगवा वापरल्याने

बघायला गेले तर आपल्या केसांमध्ये कोंडा होण्याची अशी बरीचशी कारणे आहेत. आपण कधी कधी केस सारखे ओले ठेवतो त्यामुळे केसांमध्ये कोंडा निर्माण होतो. तसेच बाजारामध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे केमिकल युक्त प्रॉडक्ट उपलब्ध आहेत, ते आपण त्यात काय आहे हे न वाचता वापरतो.

तसेच आपल्या डोक्याची त्वचा बऱ्याचवेळा कोरडी असल्याने केसांमध्ये कोंडा तयार होतो. त्याच प्रकारे आपण जर दुसऱ्याचे टॉवेल, कंगवा किंवा इतर वस्तु वापरल्या तरी ही केसांमध्ये कोंडा होण्याची शक्यता असते. तर ही होती कारणे केसांमध्ये कोंडा निर्माण होण्याची प्रमुख कारणे.

केसांमधील कोंडा नाहीसा करण्याचे घरगुती उपाय :

चला तर मग जाणून घेऊया केसातील कोंडा घालवण्याचे  काय सोपे व घरगुती उपाय आहे. जे आपल्याला केसातील कोंडा नाहीसा करण्यास मदतीचे ठरतील.

बेकिंग सोडा ने कोंडा कमी करा :

आपल्या सर्वांच्या घरांमध्ये बेकिंग सोडा तर  सहज उपलब्ध असतोच. बेकिंग सोडा हा केसातील कोंडा घालवण्यासाठी सोपा उपाय आहे. त्यासाठी –

  1. सर्वात आधी आपले केस आदल्या दिवशी शैम्पू लावून चांगले धुऊन घ्यावे.
  2. त्यानंतर केस कोरडे झाल्यानंतर एका कप पाण्यामध्ये दोन ते तीन चमचे बेकिंग सोडा घ्यावा.
  3. तुम्हाला हवे असल्यास त्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळावा.
  4. त्यानंतर ते मिश्रण डोक्यावर लावावे व अर्धा तासानंतर आपले केस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी.

असे काही दिवस केल्यास केसातील कोंडा नाहीसा होतो.

कांद्याचा रस लावावा :

आपण आपल्या केसांना जर कांद्याचा रस लावला तर आपले केस काळे तसेच आपले केस  गळणे थांबते व आपले केस चमकायला लागतात. त्याच बरोबर कांद्याचा रस लावल्याने आपल्या केसातील कोंडा जाण्यास मदत होते. आठवड्यातून दोनदा कांद्याचा रस केसांना लावा. असे काही दिवस केल्यास तुमची कोंड्यापासून सुटका होऊ शकते.

तेल बदलावे लागेल :

आपण केसांना जे तेल लावतो ते तेल बदलणे आवश्यक आहे. काही वेळेस आपण जे तेल लावतो त्या तेलामुळे आपले केस गळणे तसेच, केस तुटणे व केसात कोंडा निर्माण होण्याची फार शक्यता असते.

म्हणून आपण –

  1. शुद्ध नारळाचे तेल घ्यावे. या जागी तुम्ही वर्जीन कोकोनट ओईल सुद्धा घेऊ शकतात.
  2. त्यामध्ये एक चमचा लसणाचा रस व दोन चमचे कांद्याचा रस टाकावा.
  3. तयार झालेले तेल रोज सकाळी आंघोळीनंतर केसंवर तसेच  डोक्याच्या तळावर लावावे.

असे काही दिवस केल्याने तुमचा केसातील कोंडा कमी होण्यास मदत होईल.

लिंबाचा रस व आल्याचा रस लावल्याने फरक पडेल :

आपल्या केसांच्या तळावर जर आपण लिंबाचा रस लावला तर त्याने आपल्या केसाचा कोंडा जाण्यास मदत होते. तसेच आपण दोन दिवसातून अर्धा लिंबाचे रस डोक्याचा तळावर लावावे. असे काही दिवस केल्यास तुमची कोंड्यापासून सुटका होऊ शकते.

शैम्पू कोणता वापरावा ? हे जाणून घ्या

शैम्पू कोणता वापरावा हा प्रश्न सर्वांनाच पडतो. कारण बाजारामध्ये बरेच शैम्पू उपलब्ध आहे. पण त्यातील जास्त करून केमिकल युक्त आहे. जर तुम्हाला कोणता शैम्पू वापरावा ? असा प्रश्न पडत असेल तर तुम्ही बाजारामध्ये हर्बल युक्त शैम्पू वापरायला आजपासूनच सुरुवात करा. तसेच काही हर्बल युक्त शैम्पू मध्ये आल्याचा रस सुद्धा असतो. जो तुमच्या केसांना खूप फायद्याचा ठरतो.

तर आज आपण बघितले केसांमध्ये कोंडा होण्याची कारणे कोणती तसेच केसात कोंडा झाल्यावर त्याचे घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते ? हे उपाय जर तुम्ही काही दिवस करून बघितले तर काही दिवसांमध्ये तुमची कोंडा पासून सुटका होऊ शकते. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकता.

Leave a comment