हाडे मजबूत करण्यासाठी काय खावे ? जाणून घ्या कधीच हात पाय दुखणार नाही


आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते, याच प्रकारे तुम्हाला तुमची हाडांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण तुमच्या शरीराला आधार देण्याचे काम हाङे करतात म्हणून आपल्या शरीरामध्ये सर्वाधिक झीज होणारे अवयव म्हणजे आपली हाडे आहे म्हणून आपण आपल्या हाडांना मजबूत तसेच कॅल्शियमयुक्त ठेवले पाहिजे त्या साठी आपण हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम वाढवणारे पदार्थ खायला हवेत.

बऱ्याचदा खूप लोकांची तक्रार असते की त्यांचे हाङे खूप दुखत आहे, तसेच सतत त्यांचे दुखणे वाढतच जात आहे. काही गोळ्या औषधे घेतल्यानंतर थोडा वेळ आपले दुखणे थांबते पण थोड्यावेळाने पुन्हा हाडे दुखायला लागतात. हाडे दुखणे याचाच अर्थ हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता असणे असे पण असते. आपल्या हाडांमध्ये जर कॅल्शियम चे प्रमाण कमी झाले तर आपली हाडे ठिसूळ होतात. तसेच ती भविष्यामध्ये खूप दुखू लागतात आपल्याला जर तरुण वयामध्ये हाडे दुखत नसतील आणि आपण जर त्याची नीट काळजी घेतली नाही. तसेच कॅल्शियमयुक्त व जीवनसत्व असलेले पदार्थ खाल्ले नाही तर आपली हाडे भविष्यामध्ये खूप त्रास देऊ शकतात. म्हणून हाडांकडे दुर्लक्ष करू नये.

आपली हाडे दुखत असतील तसेच ठिसूळ झाली असेल, तर आपण त्वरित त्यावर काही ना काहीतरी उपाय केला पाहिजे. तर आज आपण बघणार आहोत की घरगुती व नैसर्गिक पद्धतीने आपल्याला आपल्या शरीरातील हाडे कसे मजबूत करता येईल ? तसेच त्यांचा भविष्यामध्ये परत त्रास होणार नाही असे आपण काही उपाय बघणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहे ते उपाय.

हाडे कमकुवत होण्याची प्रमुख कारणे :

1. कॅल्शियमची कमतरता होने
2. अति परिश्रम करने
3. आहार मधे कैल्शियम ची कमतरता
4. गोळ्या औषधांचे जास्त सेवन केल्याने
5. वयोमानानुसार होने

आपली हाडे कमकुवत होण्याचा मुख्य कारण म्हणजे आपल्या हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता असते, तरुण वयामध्ये आपण खूप काम करत असतो. तसेच आपल्या शरीराला पुरेसे कॅल्शियम न भेटल्यामुळे आपल्या हाङे कमकुवत होतात.

आपण जर तरुण वयामध्ये खूप परिश्रम केले असेल तर आपले वय झाल्यानंतर हाडे खूप दुखायला लागतात, तसेच कमकुवत होतात किंवा आपण जर गोळ्या औषधांचे सेवन करत असू ,तर तेही एक कारण असू शकते आपले हाडे ठिसूळ होण्याचे.

हाडे मजबूत करण्यासाठी उपाय :

मुख्यताहा असे बघण्यात आले आहे की जसे जसे आपले वय वाढत जाते, तसेतसे आपल्या हाडे कमकुवत होत जातात आपल्या हाडांना मजबूत करण्याची फार गरज असते याच प्रकारे शरीरातील हाडांना 40 वयानंतर कॅल्शियम ची खूप गरज असते अथवा त्यांची हाडे मजबूत करण्याची फार गरज असते. कारण जसजसं वय वाढत जातो तसतसे त्यांची हाडे अलवार होत जातात. जाणून घेऊया काही सोपे घरगुती उपाय :

दही चे सेवन नियमित करावे :

दह्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. तसेच त्यामध्ये असे काही पदार्थ असतात जे तुमच्या हाडांसाठी फार उपयुक्त असतात 100gm दह्यामध्ये 110mg प्रोटिन्स असतात जे तुमच्या हाडानकरता फार उपयुक्त ठरते. म्हणून तुम्ही दिवसातून साधारण अर्धा वाटी दही खाल्ले पाहिजे, असे केल्याने तुमच्या हाडांच्या बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत होईल.

तिळाचे तेल वापरून बघा :

जर आपल्या शरीरामध्ये कोणत्या भाग दुखत असतील जसे की खांदा, हात, पाय तर त्यावर तिळाच्या तेलाने मालिश केली तर दुखणे बऱ्यापैकी थांबते. याच प्रकारे जर तुम्ही सकाळी उठल्यावर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा तिळाचे तेल टाकून ते पाणी सकाळी पिले तर तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते. तसेच हा उपाय तुम्ही दोन ते तीन आठवडे करावा.

हाडे मजबूत करण्यासाठी दूध प्यावे तसेच दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा :

आपल्या शरीराला पुरेसे असणारे कॅल्शियम दुधामध्ये असते, म्हणून जर आपण सकाळी चहा पिण्याच्या व्यतिरिक्त दूध पिले तर खूप चांगले. स्त्रीला 40 वयानंतर कॅल्शिअमची गरज पडते. कारण जसे जसे वय वाढत जाते तसतसे आपल्या शरीरात कॅल्शियमची कम करता होते. तसेच अन्य दुग्धजन्य पदार्थ खावे दूध, दही, ताक, पनीर हाडांना जे कॅल्शियम पाहिजेल असतात हाडे मजबूत होण्यासाठी ते दुग्धजन्य पदार्थांमध्ये बर्‍यापैकी असते. तसेच दुग्धजन्य पदार्थ मधील कॅल्शियम हाडे लवकर शोषून घेतात.

हाडे मजबूत करण्यासाठी अंडी व बदाम घ्या :

आपण नियमित एक ते दोन अंडी खाणे गरजेचे आहे. अंड्यामध्ये 3g ग्रॅम फॅट्स असतात. तसेच भरपूर प्रमाणामध्ये प्रोटिन्स असतात. जे तुमच्या हाडान करता फार उपयोगी ठरते याप्रकारे रोज सकाळी उठल्यानंतर बदामाचे सेवन करावे. बदाम हे देखील कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत आहे. याचप्रकारे तुम्ही जर बदामाच्या बाहेरील आवरणा सह बदाम खाल्ला तर तो जास्त फायदेशीर ठरतो.

मनुके, कैळी, बीट, व संत्राचे सेवन करा :

आपले हाडे मजबूत करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे फळ फळांमध्ये नॅचरल शुगर असते. याच प्रकारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्व असतात. म्हणून आपण मोठ्या प्रमाणामध्ये फळे आपल्या आहारामध्ये समावेश करावे. याचप्रकारे मुख्यता मनुके, केळी व संत्रे या तिघांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. मनुके तुमच्या हाडान करता फार उपयुक्त ठरते. याच प्रकारे सत्रांमध्ये विटामिन सी असते जे तुमच्या शरीरा करता व हाडान करता खूप फायदेशीर आहे. तसेच बीट खाल्ल्याने तुमचे रक्त शुद्ध होण्यास मदत होते तसेच हाडे ही मजबूत होतात.

पालेभाज्यांचे सेवन करा :

आपली इम्युनिटी तसेच हाडे कमजोर असतील तर ते मजबूत करण्यासाठी आपण पालेभाज्यांचे सेवन करणे फार गरजेचे आहे. पालेभाज्यांमध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्व असतात. म्हणून पालेभाज्या आपल्या शरीरा करता खूप फायदेशीर आहे. याच प्रकारे तुम्ही पालक चा मोठ्या प्रमाणामध्ये सेवन करावे.

तर हे होते हाडे मजबूत करण्यासाठी सोपे घरगुती उपाय. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला हि घेऊ शकतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *