सकाळी गुळ खाण्याचे फायदे कोणते आहेत ? नक्की जाणून घ्या


आपण बर्याच वेळा गुळाचा इतर वेगवेगळ्या कामांसाठी आपण वापर करत असतो. कोणताही सण म्हटला तर त्यात गुळाचे पदार्थ येतात. जसे की उकडीचे मोदक आणि तिळाचे लाडू यासाठी गुळाचा वापर केला जातो, पण जर आपण बघितले काही लोक फक्त सणासाठी गुळाचा वापर करतात. पण गुळाचा वापर हा फक्त सणासाठी न करता, जर आपण त्याचे रोज सकाळी नियमित सेवन केले तर त्याचे आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे होऊ शकतात. कारण गुळ खाण्याचे फायदे खूप सारे आहेत जर ते तुम्ही जाणून घेतले तर तुम्हाला नक्की फायदा होईल.

पूर्वीच्या काळात वृद्ध लोक किंवा आपल्या आजी-आजोबा हे आजही रोज सकाळी गुळाचे सेवन करतात, कारण त्यांना गुळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरास कोणकोणते फायदे होतात ? हे माहीत असते. तर ते इतरांनाही गुळाचे सेवन करणे का उपयोगी आहे याचा सल्ला देत असतात. त्याचबरोबर आपला आयुर्वेदानुसार रोज सकाळी गुळ खाणे किंवा गुळाचे सेवन करणे हे आपल्या शरीरास आरोग्यदायक व लाभदायक ठरते. काही लोक या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून गुळ खाणे टाळतात.

अनेक लोकं आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफी या पेयांनी सुरू करतात. पण असे न करता जर तुम्ही गुळाचे सेवन केले तर त्यामुळे तुमच्या शरीरास हे लाभदायक ठरू शकते, त्यासाठी तुम्ही साखरेचा चहा पिण्या ऐवजी गुळाचा चहा सुद्धा पिऊ शकतात.  बरेचदा लोक गुळाच्या ऐवजी साखरेचा उपयोग करतात कारण त्यांचा असा समज आहे की गुळ आणि साखर दोघेही उसापासून बनवले गेले आहेत. त्यामुळे गुळ खाल्ले काय किंवा साखर खाल्ले काय दोघेही एकच आहे असा त्यांचा समज आहे. पण हा त्यांच्यासाठी खूप मोठा गैरसमज आहे .साखर खाल्ल्यामुळे आपल्याला डायबिटीज अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. पण जर तुम्ही नियमित गुळाचे सेवन केले तर गुळामुळे आपल्याला डायबिटीज अशा समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागत नाही. साखर आणि गुळ या मध्ये खूप फरक आहे कारण गुळामध्ये तुम्हाला आवश्यक ते नुट्रिशन वैल्यू जास्त असतात अणि या साखरे मध्ये नसतात, साखरेत कैलोरी जास्त असते तीच गुळामध्ये कमी असते.

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारकच असतो आणि त्यातच अनेक लोक गुळाचे अतिप्रमाणात सेवन करतात पण गुळाचे अति प्रमाणात सेवन करणे हे आपल्या शरीरास हानिकारक ठरू शकते. त्याच बरोबर जर आपण गुळाचा अतिप्रमाणात वापर किंवा उपयोग केला आपल्याला काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे गुळाचे थोडेसे सेवन करणे योग्य आहे.

सकाळी गूळ खाल्ल्यामुळे होणारे फायदे :-

गुळाचे सेवन करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळ. जर आपण सकाळी उपाशी पोटी थोड्याशा गुळाचे सेवन केले तर तुम्हाला त्याचे फायदे आरोग्य लाभदायक का आहे याचे परिणाम दिसून येतील.

रोज सकाळी गुळाचे सेवन केल्यामुळे आपले शरीर हे निरोगी राहते व त्यामुळे आपल्याला कोणतेही आजार होण्याची संभावना कमी असते. त्यामुळे आज आपण बघणार आहोत की रोज सकाळी गुळ खाल्ल्यामुळे आपल्याला कोण कोणते फायदे होऊ शकतात ? चला तर मग बघुया !

रक्त शुद्धीकरण करण्यास मदत मिळते :-

आपण आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करत असतो, त्यामुळे कधीकधी कोणतेही पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे आपल्या रक्ताचा प्रभाव कमी होऊ शकतो.

त्यामुळे जर आपण रोज सकाळी थोडासा एक गुळाचा खडा उपाशीपोटी घेऊन त्यावर जर आपण थोडेसे कोमट पाणी पिले, तर त्यामुळे आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपण गुळाचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त ही शुद्ध होण्यास मदत होते.

पचनक्रिया सुधारण्यास लाभदायक ठरते:-

आपण जर रोज सकाळी नियमितपणे गुळाचे सेवन केले किंवा थोडासा गुळ खाल्ला, तर त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्याच बरोबर आपल्याला अपचन सारख्या समस्यांचा त्रास होत नाही. त्यामुळे रोज सकाळी गुळ खाल्ल्यामुळे हा एक उत्तम फायदा आपल्या शरीरास होऊ शकतो.

काम करण्यास ऊर्जा मिळते :-

अनेकदा आपल्याला काम करून खूप थकवा किंवा आपल्या शरीरात थकवा जाणवतो. हाच थकवा जर तुम्हाला दूर करायचा असेल तर रोज सकाळी थोडासा गुळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात काम करण्यासाठी एक नवी ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे आपला दिवस ही चांगला जातो. त्याचबरोबर आपल्या शरीराला काम करताना कोणताही थकवा जाणवत नाही.

शरीरातील कॅल्शिअम वाढवण्यास मदत करतो :-

अनेकदा आपल्या हाडांमधील कॅल्शियम कमी झाल्यामुळे आपल्याला सांधेदुखी असे त्रास उद्भवतात. पण जर आपल्याला हे त्रास होऊ नये किंवा आपल्या शरीरातील जर तुम्हाला कॅल्शिअम वाढवायचे असेल , तर नियमित पणे गुळाचे सेवन करा. गुळ हे शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी मदत करतो. त्यामुळे आपली हाडे ही मजबूत राहतात. त्याच बरोबर आपल्याला सांधेदुखी अशा समस्यांना तोंड द्यावे लागत नाही.

नोट : मधुमेह असलेल्यांनी गुळाचे सेवन करणे टाळावे. पण जेव्हा तुम्ही साखरे चा वापर कधी करत असणार त्या ऐवजी गुळ घेणे योग्य राहील.

तर आज आपण बघितलं रोज सकाळी थोडासा गूळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात? त्याच बरोबर गुळ आपले शरीर निरोगी ठेवण्यास कोणकोणती महत्त्वाची भूमिका बजावत असतो ? याच संदर्भात जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला ही घेऊ शकतात.


One response to “सकाळी गुळ खाण्याचे फायदे कोणते आहेत ? नक्की जाणून घ्या”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *