घसा दुखत आहे का ? हे सोपे घरगुती उपाय करून बघा


मित्रांनो अनेकदा आपण बाहेरचे काही तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा कोणताही पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्यावर आपला घसा खवखवतो किंवा घसा दुखायला लागतो. बरेचदा घसा सर्दी झाल्यामुळे ही दु:खतो, तर कधीकधी हवामानातील बदल आणि जंतुसंसर्ग त्यामुळे ही घसा दु:खू लागतो. तुम्हाला हि असे जाणवत आहे का कि तुमचा घसा दुखत आहे ? आज काही सोपे उपाय आम्ही घेऊन आलोय त्याने नक्की फायदा होईल.

अनेकदा घसा बसल्यामुळे आपला आवाजसुद्धा बदलतो हे सर्व घशातील इन्फेक्शन मुळे किंवा खूप अतिप्रमाणात तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे होऊ शकते. जर आपला घसा दु;खत असेल तर आपण जे कोणतेही काम करत असून ते काम करण्यास आपले मन ही लागत नाही . अधिक प्रमाणात घसा हा संसर्गजन्य जंतूंमुळे दु:खतो किंवा मग अति प्रमाणात थंड पदार्थ खाल्ल्यामुळे ही घसा दु:खतो.

तर काही लोक घसा दुखण्याचे मूळ कारण माहीत नसल्यामुळे घसा दु:खण्याकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर घसा दु:खण्याच्या वेदना सहन होत नाही. त्यामुळे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत घसा दुखण्याचे कारणे कोणती व त्यावरचे उपाय चला तर मग आपण जाणून घेऊया.

घसा दु:खण्याची कारणे :-

  • अतिप्रमाणात तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे
  • सर्दी झाल्यामुळे
  • थंड पदार्थ खाल्ल्यामुळे
  • जंतुसंसर्ग झाल्यामुळे

अशा इतरही कारणांमुळे आपला घसा दु:खू शकतो वेळीच त्याच्यावर उपाय घेतले नाही, तर त्याच्या वेदना वाढू ही शकतात. घसा दुखण्याचे कारण म्हणजे वातावरणातील बदल काही काही लोकांना सहन होत नाही . त्यामुळे त्यांना घसा दुखणे असे आजार उद्भवतात याच बरोबर कधी कधी जंतूसंसर्ग झाल्यामुळे आपल्याला घसा दुखणे सुरू होते, याच प्रकारचे कधीकधी तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे आपला घसा दुखण्याची शक्यता असते.

घस्यासोबत आवाज बसण्याची कारणे :-

घसा किंवा आवाज बसला याचे मुख्य कारण म्हणजे एलर्जी हवामानातील विविध बदल आवाज बसण्यासाठी कारणीभूत ठरतात, कधी कधी एखादा क्लोरीन सारखा पदार्थ जर हवेतून किंवा पाण्यातून आपल्या घश्यापर्यंत पोहोचला, तर आपला आवाज बसू शकतो व आपल्याला घसे दुःखी होऊ शकते.  आपण घसा दु:खण्याची कारणे कोणती हे तर जाणून घेतली, पण त्यावर उपाय कोणते करायचे हे आता आपण जाणून घेऊया.

घसा दुखत असल्यास घरगुती उपाय :

आपण घसा दु:खण्याचे कारणे तर बघितली आता आपण बघणार आहोत घसा दु:खत असेल तर त्याचे उपाय ते ही अगदी सोप्या घरगुती उपाय वापरून, चला तर मग जाणून घ्या घसादुखी थांबवण्याचे उपाय.

घसा दुखत असल्यास मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करून बघा –

घसा दु:खी थांबवण्यासाठी अत्यंत सोपा आपला घरगुती वर रामबाण उपाय म्हणजेच मिठाच्या पाण्याने गुळण्या करून बघा त्यासाठी  थोडेसे कोमट पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ मिसळून त्या कोमट पाण्याच्या गुळण्या करून घ्यावा, असे चार ते पाच दिवस करावे.

त्यामुळे तुमच्या घशाला आराम भेटेल व तसेच जर तुमचा आवाज बसला असेल तर तो मोकळा होण्यात तुम्हाला मदत होईल.

ज्येष्ठमधाच्या पाण्याच्या गुळण्या करून बघा-

ज्येष्ठमध हे आयुर्वेदातील सर्वात श्रेष्ठ व रामबाण उपाय मानले जाते, ज्येष्ठमधाची पावडर किंवा ज्येष्ठमधाची काडी उकळत्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याचा रंग पिवळा होईपर्यंत पाणी उकळू द्या.  त्यानंतर त्या पाण्याच्या दर पाच- पाच मिनिटांनी गुळण्या करा. असे जर तुम्ही पाच ते दहा दिवस केले तर तुमच्या घसा मोकळा होण्यास तसेच तुमची घसे दुखनी थांबण्यास मदत होईल.

हळदीचे दूध पिऊन बघा –

हळद ही सुद्धा आपला आयुर्वेदामध्ये अतिशय उत्तम व श्रेष्ठ मानली जाते. हळद चे अनेक आजारांसाठी गुणकारी ठरते. तसेच रोज रात्री झोपायच्या आधी, जर तुम्ही हळदीचे थोडेसे कोमट दूध प्यायले घसा दुखणे थांबण्यास मदत होऊ शकते.

असे जर तुम्ही तीन ते चार दिवस केले तर तुम्हाला घसा दुखण्यापासून आराम भेटू शकतो.

मधाचा वापर करून :

तुम्हाला जर सारखा घसा दुखत असेल तर तुम्ही यासाठी मधाचा सुद्धा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा मधामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळायचा आहे आणि हे मिश्रण तुम्हाला दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यायचे आहे यामुळे तुम्हाला नक्की फायदा होईल.

घसा दुखत असल्यास तुळशीचा काढा – 

तुळस ही वेगवेगळ्या आजारांसाठी निरोगी शरीरासाठी अत्यंत गुणकारी ठरते. तुळशीचे आपल्या ग्रंथसाहित्य मध्ये श्रेष्ठ मानले जाते. सर्व वनस्पतींमध्ये तुळशीची पूजा केली जाते कारण तुळसी इतर वनस्पती पेक्षा जास्त औषधी व गुणकारी ठरते.

घसे दुखी थांबवण्यासाठी तुळशीचा काढा हा रामबाण उपाय आहे.

  1. तुळशीची सात आठ पाने उकळत्या पाण्यात सोडावी.
  2. पाण्याचा रंग थोडासा ब्राउन होईपर्यंत पाणी चांगले उकळू घ्यावे.
  3. त्यानंतर पाणी गाळुन घेऊन तुळशीचा काढा दर दोन मिनिटांनी घोटघोट प्यावा.
  4. असे जर तुम्ही दहा ते पंधरा दिवस केले तर तुमचे घसा दुखणे थांबू शकते.

तसेच जर तुमचा आवाज बसला असेल तर तर तो मोकळा व्हायला तुळशी गुणकारी ठरते.

तर मित्रांनो आज आपण पाहिले घसे दुखी होण्याची कारणे व त्यावरचे उपाय यासंदर्भात अजून उपाय जाणून घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेऊ शकतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *