मासे खाण्याचे फायदे व तोटे !! माहिती आहेत का ?

Must read
Dr Madhuri
Dr Madhuri
Dr. Madhuri is a leading Health expert. She has started her career in Doctor Field in 2018. She has completed her Medical Degree from a Govt recognized organization.

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मासे खाण्याचे फायदे व तोटे. मासे खाण्याचे फायदे आहेत पण काही प्रमाणामध्ये मासे खाण्याचे तोटे देखील आहे, ते आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच बरेच लोकांना कोणते मासे खायचे किंवा कोणत्या काळामध्ये कोणती मासे खावेत गोड्या पाण्यातले खावयाचे कि खाऱ्या पाण्यातील मासे खावावी तसेच ते मासे खाल्ल्याने आपल्या शरीरावर कोणता परिणाम होतो ? कोण कोणते फायदे होतात हे माहिती नसते, तर आज आपण हेच बघणार आहोत चला तर मग जाणून घेऊया मासे खाण्याचे फायदे व तोटे काय आहेत ते ?

मासे खाण्याचे फायदे :

तर आज आपण जाणुन घेउया मासे खाण्याचे फायदे तसेच कोणत्या प्रकारचे मासे खावे व कोणत्या पद्धतीने खावे चला तर मग जाणून घेऊया.

नजर तेज राहते / लवकर चष्मा लागत नाही :

आपण बऱ्याच वेळेस चिकन मटण खातो पण जर तुम्हाला चष्मा असेल किंवा तुमची नजर कमजोर असेल तर तुम्ही माशांचा सेवन केले पाहिजे. मासे खाल्ल्याने लवकर चष्मा ते लागत नाही तसेच जर तुम्हाला चष्मा असेल तर तो दूर होण्यास देखील मदत होते. कारण यामध्ये काही असे घटक व असे मूलद्रव्य असतात ज्यांचे सेवन करून आपल्याला भविष्यामध्ये चष्मा लागण्याची शक्यता फार कमी असते. तसेच तुमच्या डोळ्यांच्या कॉर्निया ला जे घटक आवश्यक असतात ते देखील मिळतात.

हाडे मजबूत होतात :

बऱ्याच वेळेस मासे खाल्ल्याने हाडे देखील मजबूत होण्यास मदत होते. वाढत्या वयामध्ये हाडातील कॅल्शियम कमी होत जाते तसेच 30 वया नंतर महिलांना अधिक कॅल्शिअमची गरज असते. याच प्रकारे पुरुषांना चाळीशीनंतर कॅल्शिअमची गरज असते तसेच आपला बॅकबोन त्यालाच आपण माकडहाड देखील म्हणतो. तो देखील कालांतराने कमजोर होत जातो, जर तुम्ही मासे खाल्ले तर माशांमध्ये फिष ओईल म्हणजेच नैसर्गिकरित्या असणारा पदार्थ माशांमध्ये आढळला जातो, हे जर आपल्या शरीरामध्ये गेली तर आपली हाडे मजबूत होण्यास फार मदत होते. तसेच तळलेले मासे खाणे टाळावे.

वजन वाढण्यास मदत होते

आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये बरेच लोकांना वजन वाढवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. जर तुम्हाला नैसर्गिक रित्या वजन वाढवायचं असेल तर तुम्ही नियमितपणे माशांचा सेवन करणे फार आवश्यक आहे, ते ही गोड्या पाण्यातील माशांचे सेवन करणे आवश्यक आहे. जर तुम्ही नियमितपणे माशांचे सेवन केलं तर माशांमध्ये असणारा नैसर्गिक तुमच्या शरीरामध्ये वजन वाढवण्याचे काम करू शकतो. तसेच महिन्या दोन महिन्यांमध्ये तुमचे वजन देखील वाढण्यास मदत होऊ शकते.

प्रोटिन्स उत्तम स्त्रोत :

बऱ्याचदा मासे खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो. तसेच माशांन मधे असणारं कर्ड ओईल व प्रोटिन्स मुळे आपला एक समतोल आहार मिळतो, कमीत कमी महिन्यातून दोन-तीन वेळेस तरी मासे खाल्ले पाहिजे. तसेच माशांच्या डोळ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटिन्स व विटामिन असतात जे आपल्या शरीराला गरजेचे आहेत.

तसेच मासे खाताना एक दक्षता घ्यावी ती म्हणजे मासे नेहमी ताजे खावे शीत घरामध्ये साठवलेले मासे खाणे टाळावे.

मासे खाण्याचे तोटे :

आपण मासे खाण्याचे फायदे तर बघितले आता आपण जाणून घेणार आहोत मासे खाण्याचे तोटे कोणकोणते आहे चला तर मग बघुया.

जुने आजार उमळू शकते :

बऱ्याचदा अधिक मासे खाल्ल्याने आपले जुने आजार भविष्यामध्ये उमळू शकतात. म्हणजेच जो त्रास तू मला भूत काळामध्ये होता तो तुम्हाला भविष्य काळामध्ये उद्भवू शकतो.

उदाहरणार्थ : पाठ दुखी, सतत वजन वाढणे, गुडघेदुखी, हाय ब्लड प्रेशर म्हणून अधिक माशांचे सेवन करणे देखील हानिकारक आहे. तसेच खाऱ्या पाण्यातील मासे मानवी शरीरात करता अधिक हानीकारक असतात, कारण आजकाल खूप प्रदूषण वाढले आहे तसेच पाणी देखील तो प्रदूषित झाले आहे. म्हणून त्या पाण्यातील मासे खाल्याने देखील शरीरामध्ये एक प्रकारचे रेडिएशन्स निर्माण होतात जे तुमच्या हृदय करता हानिकारक असते.

शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते.

ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी माशांचे नियमित सेवन करू नये कारण माशांमध्ये असलेला फॅट व कोलेस्टेरॉल तुमचे वजन वाढवू शकते. व तुमच्या हृदयावर मोठा दबाव टाकू शकते.

तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढणे हे आपल्या आरोग्य करता फार हानिकारक असते तसेच तेलात तळलेले माशांचे सेवन अधिक प्रमाणात करावे.

तर मित्रांनो आज आपण बघितले मासे खाण्याचे फायदे व तोटे. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकतात. तुम्हाला काही अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest article