डोळे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचे ज्ञानंद्रिये आहे. आपल्या शरीरातील सर्व ज्ञानंद्रिये मधील डोळेही सर्वात महत्वाचे अवयव आहे. याप्रकारे आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे बदलत्या वातावरणामुळे आपल्या डोळ्यांवर त्याचा फार मोठा परिणाम होत आहे तसेच आजकाल डोळ्यांत संबंधित लोकांकडून फार तक्रारी येत आहे. त्यामुळे आपण जाणून घेणार आहोत डोळ्यांची काळजी कशी घ्यायला हवी.
आपण बघतो की खुप लहान मुलांना चष्मे लागतात तसेच तरुणांचे वयोवृद्धांची डोळे कमकुवत होतात नजर कमी होते. याच प्रकारे डोळे लाल होणे, डोळ्यात आग होणे, इन्फेक्शन होणे अशा खूप सारे समस्या आपल्याला बघायला मिळत आहे. आज काल आपण आपल्या डोळ्यांकडे फार दुर्लक्ष करत आहोत. आपण वर्क फ्रॉम होम करतो, त्यामुळे आपल्या डोळ्यांवर सर्वाधिक ताण येतो. तसेच अवेळी झोप घेतो व प्रदूषित वातावरणामुळे जातो. त्यामुळे धुळीचे कण तसेच प्रदूषित वातावरण या सर्वांचा आपल्या डोळ्यांवर फार वाईट परिणाम होतो.
अशाप्रकारे डोळ्यांची काळजी घ्या :
तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की आपण आपल्या डोळ्यांची काळजी कशी व कोणत्या प्रकारे घ्यावी तसेच आपण आपली डोळ्यांसाठी घरगुती प्रकारे काय काय करू शकतो.
थोड्या कालावधीत डोळे तपासून बघा :
आपण आपल्या कामामुळे डोळ्यांकडे दुर्लक्ष करतो आपण दर दोन वर्षांनी ते एक वर्षांनी आपले डोळे डॉक्टरांकडून तपासून घ्यावे. तसेच ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी दर सहा महिन्यांनी किंवा तीन महिन्याने डॉक्टरांकडून डोळे तपासून घ्यावे, कारण डायबिटीस असणाऱ्या लोकांना डोळ्यांच्या समस्या जास्त प्रमाणात उद्भवतात म्हणून आपण ठरलेल्या वेळेस डॉक्टर कडून डोळे तपासून घ्यावे.
हे डोळ्यांवर ठेवून बघा :
बऱ्याच वेळेस आपण खूप काम करतो तसेच अवेळी झोप घेतो, खूप टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल बघतो त्यामुळे आपल्या डोळ्यांवर खूप त्रास देतो कारण की आपल्या शरीरातील जास्तीत जास्त ऊर्जा आपल्या डोळ्यांच्या मार्फत फेकली जात असते म्हणून आपले डोळे थोडेसे गरम व लाल होतात. त्यामुळे आपण रोज दहा ते वीस मिनिटं आपल्या डोळ्यांवर काकडीचे तुकडे किंवा कोरफड म्हणजेच एलोवेरा चे तुकडे आपल्या डोळ्यांवर ठेवू शकता. हे ठेवल्याने तुमच्या डोळ्यातील सगळी उष्णता ते तुकडे शोषून घेतील व तुम्हाला तरोताजा वाटेल. असे तुम्ही दिवसातून एकदा करावे यांनी तुम्हाला सांगतो झोप लागेल.
वेळ ठरवून काम करा :
अनेक वेळा आपण गरजे पेक्षा जास्त काम करतो. म्हणजेच खूप वेळ मोबाईल किंवा लॅपटॉप वर काम करतो. यामुळे तुमच्या शरीराला त्रास होतो पण सर्वात जास्त त्रास तुमच्या डोळ्यांना होतो. कारण की डोळे सतत त्या स्क्रीन कडे बघत असतात त्यामुळे तुमचे डोळे दुखतात तसंच लाल होतात. त्यामुळे आपण दिवसातून एक विशिष्ट वेळ ठरवावी. त्याच वेळेत काम करावे तसेच सलग दोन ते तीन तास लॅपटॉप व मोबाईल बघू नये व तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल तर दर दोन तासाने दहा ते पंधरा मिनिटं डोळ्यांना आराम द्यावा. तसेच तुम्ही लॅपटॉपवर लाईट फिल्टर लावू शकता जेणेकरून कम्प्युटरच्या हानीकारक किरणे तुमच्या डोळ्यात जाणार नाही.
पुरेशी झोप घ्यावी :
तुम्हाला माहित आहे का आपल्या शरीराचे खूप सारे आजार अनियमित झोप घेतल्याने होतात. आपण जर पुरेशी झोप घेतली नाही तर ते आपल्या शरीराला फार हानिकारक ठरू शकते कारण आपण दिवसभर काम केले असते आणि शरीराला गरजेची असणारी विश्रांतीच दिली नाही तर आपल्या शरीरातील वेगवेगळ्या भागांच्या समस्या निर्माण होतात. त्यातील प्रथम समस्या म्हणजे डोळे दुखणे, डोळे लाल होणे, डोळ्यांची आग होणे, डोळे चुरचुरणे या सर्व समस्या झोप न घेण्याने तसेच अवेळी झोप घेणे यामुळे उद्भवू शकता. तुम्ही दिवसातून सात ते आठ तास शांत झोप घेणे गरजेचे आहे. तसेच दुपारी विश्रांती घेऊन एक ते दोन तास झोप घ्यावी असे केल्यास तुमच्या डोळ्यांवरील ताण कमी होईल व तुमचे डोळे निरोगी राहतील.
उन्हात जाताना डोळ्यांची काळजी घ्या :
अनेक वेळा आपण प्रखर उन्हामध्ये जातो त्यामुळे कधीकधी आपल्या डोळ्यांची आग होते. तसेच डोळ्यासमोर अंधारी येते याचे कारण म्हणजे प्रखर सूर्यप्रकाश म्हणून कधीही प्रकार सूर्यप्रकाशामध्ये जाण्याआधी चांगल्या क्वालिटीचे गॉगल वापरावे. तसेच तुम्ही टोपी घालावी ज्यामुळे तुमच्या डोळ्यांवर जास्त सूर्यप्रकाश येणार नाही व तुमच्या डोळ्यांना त्रास होणार नाही तसेच प्रदूषित व धुळीच्या वातावरणामध्ये जाणे टाळावे.
केमिकल्सचा वापर कमी करावा :
बऱ्याचदा डोळे सुंदर दिसण्यासाठी स्त्रिया डोळ्यांच्या वरच्या व खालच्या बाजूस काजळ तसेच वेगवेगळे केमिकल्स, कॉस्मेटिक्स वापरतात. हे कमीत कमी वापरावी तसेच काजळ किंवा इतर कॉस्मेटिक वापरताना चांगल्या क्वालिटीचे वापरावे जेणेकरून तुमच्या डोळ्यांना हानी पोचणार नाही.
तर मित्रांनो आज आपण बघितले आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी. तसेच आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला काही अडचण किंवा सल्ला देत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
Dr. Madhuri is a leading Health expert. She has started her career in Doctor Field in 2018. She has completed her Medical Degree from a Govt recognized organization.