डोळ्यांखाली काळी वर्तुळे घालवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या

तुमच्याही डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली आहेत का ? म्हणजेच डार्क सर्कल आले आहेत का ? तर काळजी करू नका आज आपण याच बाबत चर्चा करणार आहोत. सुरुवातीस आपण बघणार आहोत आपले डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात ते येण्याची कारणे कोणती आहेत व हे आले असणार तर कसे आपण सोपे घरगुती उपाय वापरून त्यांना घालवू शकतो ? हे जाणून घेऊ

आपण सर्व आपला चेहरा नेहमी जपतो. तसेच आपण आकर्षक दिसावे इतरांपेक्षा चांगले दिसावे यासाठी आपण धडपड करत असतो. प्रत्येक स्त्रीला असे वाटते की आपण आकर्षक दिसावे व इतरांपेक्षा अधिक सुंदर दिसावे. पण बर्याचवेळा आपण बघतो की आपल्या डोळ्या खाली एक विशिष्ट प्रकारे काळे वर्तुळ निर्माण होतात. तसेच ते आजकाल स्त्री व पुरुष दोघांमध्ये बघायला मिळते, मग प्रश्न पडतो की हे आलेले डार्क सर्कल्स घालवायचे कसे ? कारण डोळे ही एक महत्त्वाची ज्ञानंद्रिये आहे. जर डोळे सुंदर नसतील, आकर्षक नसतील तर आपला चेहरा कसा चांगला दिसेल म्हणून आपल्या डोळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

आज आपण याबाबतची चर्चा करणार आहोत की डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होण्याची कारणे कोणती ? तसेच त्यावर घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते ? चला तर मग बघुया –

डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होण्याची कारणे :

डोळ्यांखाली डार्क सर्कल का येतात हे आपल्याला माहिती हवे, जेणेकरून आपण ते येण्यापासून सुद्धा टाळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्याची कारणे –

 1. दूषित वातावरण
 2. अपुरी झोप अथवा झोपेचा अभाव
 3. टीव्ही, कम्प्युटर व मोबाईल हे अति प्रमाणामध्ये बघणे
 4. केमिकल्सचा वापर
 5. शरीरातील बदल
 6. एलर्जी अथवा त्वचेचे इतर आजार

तर अशी बरीच कारणं असू शकतात आपले डोळ्यांच्या खाली काळे वर्तुळ निर्माण होण्याची. याच प्रकारे आपण दूषित वातावरणामध्ये गेल्यामुळे, झोप पूर्ण न झाल्यामुळे तसेच टीव्ही, कम्प्युटर मोबाइल यावर सतत काम केल्याने. बरेचसे केमिकल्स मुळे साईड-इफेक्ट होऊन होऊ शकतो. तसेच शरीरातली बदल अशी बरीच कारणं आहेत डोळ्याखाली डार्क सर्कल्स निर्माण होण्याची.

डोळ्यांखाली काळी वर्तुळे घालवण्याचे सोपे घरगुती उपाय : 

डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होण्याची कारणे तर आपण बघितली. आता आपण बघणार आहोत डाग सर्कल जर निर्माण झाले असतील तर त्यावर कोणते घरगुती व प्रभावशाली उपाय आपल्याला करता येतात चला तर मग जाणून घेऊया डोळ्यांखाली काळी वर्तुळावरचे उपाय.

लिंबू आणि बेकिंग सोडा लावून बघा:

आपल्या डोळ्याखाली जर डार्क सर्कल असतील तर आपण लिंबू आणि सोडा हे दोघं एकत्र करून लावून बघावे याने फरक पडू शकतो. तर ते कसे लावावे आपण बघूया.

 1. अर्धा लिंबू घ्यावा त्यानंतर त्या लिंबू वर अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकावा.
 2. त्यानंतर तो लिंबू डोळ्यांच्या खालती डाळ सर्कस वर चोळावा.
 3. दहा ते पंधरा मिनिटं डोळ्यांची मसाज करावी.
 4. असे काही दिवस केल्यास तुमचे डार्क सर्कल्स नाहीसे होऊ शकतात.

पुरेशी प्रमाणामध्ये झोप घेणे :

झोप हा एक आपल्या शरीरातील अविभाज्य घटक आहे. आपली जर झोप नाही झाली तर आपली बरेच कामे बिघडतात. तसेच बरेच आजारांचा एकच उपाय असतो तो म्हणजे झोप. माणूस दिवसभर काम करतो त्याच प्रकारे अतिश्रम करून त्याचे शरीर थकलेले असते म्हणून विश्रांती घेतली की त्या माणसाला बरे वाटते. याच प्रकारे जर आपल्याला काही आजार अथवा काही अडचण असेल तर थोडीशी विश्रांती जरी घेतली आपण तरी आपल्याला तरोताजा वाटते.

साधारणता एका माणसाला दिवसभरातून सात ते आठ तास झोप घेणे अनिवार्य आहे. जर आपण सात ते आठ तास झोप घेत नसाल, तर दुपारी एक ते दोन तास शांत झोप घ्यावी. असे केल्याने तुमचे डार्क सर्कल्स जाण्यास मदत होईल.

चंदन डोळ्याला लावल्या ने फरक पडेल :

चंदन हे आपल्या आयुर्वेदामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते कारण चंदन चे बरेच से औषधी फायदे असतात. जर आपल्याला काही त्वचेचे विकार असतील, तर त्यावर चंदन लावल्याने ते लवकर बरे होण्यास मदत होते.

 1. तुमच्या डोळ्याखाली जर काळी वर्तुळ आले असतील तर आपण थोडेसे चंदन उगाळून घ्यावे.
 2. उगाळलेले चंदन रोज रात्री झोपताना डार्क सर्कल्स वर लावावे.
 3. चंदनाचा लेप दहा ते पंधरा मिनिटं ठेवावा.
 4. त्यानंतर चेहरा स्वच्छ कोमट पाण्याने धुऊन घ्यावा.
 5. असे काही दिवस केल्यास तुमचे डार्क सर्कल्स जाऊ शकतात.

डोळ्यांखाली काळी वर्तुळे टाळण्यासाठी काकडीचे तुकडे डोळ्यांवर ठेवावे :

 1. सुरवातीस आपण काकडीचे स्लाइस करून घ्यावे म्हणजेच कापून घ्यावे.
 2. त्यानंतर ते तुकडे गुलाब पाण्यामध्ये बुडवून डोळ्यांवर ठेवावे.
 3. ते तुकडे साधारणता अर्धा तास ठेवावे काकडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम असते. ते तुमचे डोळ्यातील हिट सुकून घेतात तसेच तुमचे डोळे थंड ठेवण्यासाठी मदत होते.
 4. असे काही दिवस केल्यास तुमची डार्क सर्कल पासून सुटका होऊ शकते.

पुरेसे प्रमाणामध्ये पाणी पिणे :

आपण दिवसभरामध्ये पुरेसे पाणी पीत नाही. जर आपण पुरेसे पाणी पिले तर आपली त्वचा ताजी व टवटवीत राहते. याच प्रकारे आपण साधारणत दिवसा मधून तीन ते चार लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्या त्वचेचे बरेचसे आजार पाण्यामुळे नाहीसे होतात. म्हणून आपण आपल्या शरीराला पुरेसे असलेले पाणी प्यावे.

तर आज आपण बघितले जर आपल्या डोळ्याखाली काळे वर्तुळ निर्माण झाले असतील, म्हणजेच डार्क सर्कल्स निर्माण झाले असतील. तर त्याची कारणे कोणती तसेच त्याचे घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते आहे. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

1 thought on “डोळ्यांखाली काळी वर्तुळे घालवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या”

Leave a comment