अनेक लोकांच्या डोक्यात खाज येते, अक्षरशः त्यांच्या डोक्याची स्किन ची आग होते, कधीकधी असे मादरचोत ठेवते होते की, आपण बाहेर असतो, तेव्हा डोक्यात फार खाज येते, कोणासमोर आपल्याला डोके ही खाजवता येत नाही. जीव कसाबसा होतो, तर कधी त्यांच्या डोक्यात खाजून खाजून पुरळ होतात. त्यांच्या डोक्यातील स्किन ची खपली निघते, पण कशामुळे डोक्यात खाज येते? तर डोक्यात खाज येण्याची अनेक कारणे आहेत, जसे की उवा होणे, हो खरंच उवा झाल्याने डोक्यात खाज येते, तसेच केसांमध्ये कोंडा होणे, कोंडा म्हणजे डोक्यात बुरशी येणे होय. केसात कोंडा झाल्यावर आपण सारखे सारखे खाजवत राहिले, तर डोक्यात छोटे छोटे फोड येतात आणि मग त्या फोडांचे आकार वाढतात, मग ती जखम फुटल्यावर आपल्याला खूप त्रास होतो. त्यासाठी आपण वेळीच उपचार करायला हवे, तसेच केस व्यवस्थित स्वच्छ न धुतल्यामुळे ही डोक्यात खाज येते, तसेच अनेक वेळा पावसात आपण भिजून आल्यावर केस कोरडे न केल्यामुळे डोक्यात खाज येते, तसेच घरात एकमेकांचा कंगवा वापरल्याने ही डोक्यात खाज येते. तसेच आपल्या शरीराला पोषक आहार न मिळाल्याने सुद्धा डोक्यात खाज येते. कधीकधी तुम्ही सुगंधित तसेच कोणतेही ब्रँडेड तेल न वापरल्यामुळे ही डोक्यात खाज येते, अशा तेलाचे रिएक्शन झाल्याने ही डोक्यात खाज येते. अशी अनेक कारणे आपल्या डोक्यात खाज येण्याची आहेत. मग अशा कारणांवर आपल्याला काही घरगुती उपाय आहेत का?
चला तर मग जाणून घेऊया की डोक्यात खाज येत असेल, तर कोणते घरगुती उपचार करायला हवे !
केसात उवा झाल्यावर, करा हे घरगुती उपचार
केसांमध्ये उवा झाल्यावर अनेकांना फार त्रास होतो. डोक्यात त्यांची सारखी खाज येते, मग अशावेळी त्यांनी सिताफळाच्या पानांचा किंवा बियांचा रस आपल्या केसांना लावावे, सीताफळाचे पान कुठून तुम्ही त्याचा रस खोबरेल तेलामध्ये मिसळून त्यात कापुराची वडी टाकून ते तेल तुमच्या केसांना चोळा, त्यामुळे तुमच्या केसातील उवा हळू कमी होतील. तसेच तुम्ही मेडिकल वरून मेडिकर नावाचा शाम्पू केसांसाठी मिळतो, तो तुमच्या केसांना लावून तुम्ही केस धुवा, त्याने तुमच्या डोक्यातील उवां वर त्वरित तुम्हाला आराम मिळेल, आणि डोक्यातील खाज येण्याची समस्याही कमी होईल.
लिंबू आणि मध वापरून बघा
लिंबू आणि मध हे आपल्या डोक्यात खाज येण्यावर फार फायदेशीर ठरतो. लिंबू मध्येअंटी बॅक्टेरिया असते, त्यामुळे आपल्या डोक्यात कोणतेही फंगल इन्फेक्शन झाल्यावर त्यावर निंबु मात करतोय. त्यासाठी तुम्ही लिंबू आणि मध एकत्र करून तुमच्या केसांना त्याचा मसाज करा, मग केस तुम्ही पंधरा ते वीस मिनिटांनी धुवा, असे केल्याने तुमच्या डोक्यातील खाज येण्याच्या, तसेच केसांमध्ये कोंडा झाल्यास अशा समस्यांपासून तुम्हाला फायदा होईल.
तुम्ही टी ट्री ऑइल वापरून बघा
हो, टि ट्री ऑइल तुमच्या केसांसाठी फार फायदेशीर ठरेल. कारण टी ट्री ऑइल मध्ये ऑंटी बॅक्टरियल तसेच फंगल इन्फेक्शन वर गुणकारी गुण आहेत. त्यामुळे तुमच्या केसांमध्ये एक प्रकारचा ओलावा टिकून राहतो, त्यासाठी तुम्ही हे ऑइल एका कापसाच्या मदतीने तुमच्या केसांना लावावे, त्याने आठवडाभरातच तुम्हाला फरक जाणवलेला दिसेल.
कोरफड चा वापर करून बघा
कोरफड मध्ये आरोग्याचे भरभरून गुण भरलेले आहेत. तसेच कोरफड ला विविध औषधी मध्येही वापरले जाते. कोरफडीचा वापर केसांसाठी फार फायद्याचे असते, तसेच आपले केस मजबूत होतात. व केस कोंडा विरहित होतात. जर तुम्हाला डोक्यात खाज येण्याची समस्या असेल, तर तुम्ही कोरफडीचा गर केसांना लावून केसांची मसाज करा, आणि एक तासाने केस धुवून टाका. असे तुम्ही दोन ते तीन आठवडे केल्यास तुम्हाला फरक जाणवेल.
ऑलिव्ह ऑईल वापरून बघा
ऑलिव ऑइल हे केसांसाठी फार फायद्याचे ठरते, ऑलिव्ह ऑइल लावल्याने केस हे मुलायम होतात. तसेच डोक्यातील टाळूची त्वचा ही नरम राहते, आणि खाज येण्याची समस्याही कमी होते, तुम्ही ऑलिव्ह ऑइल ने डोक्यातील त्वचेची चांगली मालिश करा, मालिश केल्यानंतर तुम्ही एक-दीड तासाने तुमचे केस हर्बल शाम्पू ने धुऊन टाका, असे तुम्ही दोन ते तीन आठवड्यांनी केल्यास तुम्हाला फरक जाणवला दिसेल.
दही चा वापर करून बघा
केसातील कोंडा घालवण्यासाठी दही फायद्याची ठरते, तसेच आपल्या त्वचेचे संरक्षण हे दही मुळे होते. दही हे नैसर्गिक कंडीशनर चे काम करते, त्यासाठी तुम्ही दही अर्धी वाटी+ त्यात लिंबाचा रस घालून ते मिश्रण चांगले मिसळा, आणि डोक्यावर तुम्ही वीस मिनिटे लावून ठेवा , थोड्यावेळाने तुम्ही तुमचे केस धुऊन चांगले कोरडे करून घ्या. असे केल्यास तुम्हाला डोक्यातील खाज येण्याचा समस्यांपासून आराम मिळेल.
तुम्ही चांगला हर्बल शाम्पू व खोबरेल तेलाचा वापर करून बघा
खोबरेल तेलाचा वापर हा पूर्वीपासूनच केला जातो, पण आताच्या नवीन युगामध्ये नवीन नवीन प्रकारचे तेल आल्यामुळे, आपण त्याचा वापर कमी करतो. पण खोबरेल तेल केसांसाठी फार फायद्याचे असते, तुम्ही खोबरे तेलाने मसाज केला, तर तुमच्या डोक्यातील स्किन एकदम मुलायम होईल, तसेच केस ही मजबूत होतील. तुम्ही रात्री झोपताना खोबरेल तेलाने डोक्याला मसाज करा, सकाळी उठून केस धुवून टाका. तुम्ही चांगला हर्बल शाम्पू आणून तुमचे केस धुवा, तसेच तुम्ही कंडिशनरचा आठवड्यातून एकदा वापर करायला हवा. त्याने तुमचे केस ही मुलायम होतील, आणि डोक्यातील खाज येण्याचे समस्याही कमी होतील.
तुम्ही हिरव्या पालेभाज्या आहारात घ्या
हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक प्रकारचे विटामिन्स, तसेच प्रथिने, पोटॅशियम ,फॉस्फरस सगळे असते. ते आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असते. आपल्या डोक्यात किंवा शरीरात कुठेही फंगल इन्फेक्शन झाल्यावर त्या गुणकारी असतात. त्यासाठी तुम्ही आवर्जून हिरव्या पालेभाज्या तुमच्या आहारात घ्या. तसेच मोड आलेले कडधान्य ही तुमच्या आहारात घ्या, असे पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होते, आणि शरीरातील रक्त शुद्ध राहिल्यामुळे तुमच्या डोक्यातील खाज येण्याचे समस्याही होत नाही.
चला, तर आज आम्ही डोक्या मध्ये खाज येण्याची कारणे व त्यावर काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. जर तुम्हाला डोक्यात खाज येऊन फोड अथवा पुरळ जास्त होत असेल, तर तुम्ही तज्ञ डॉक्टरांकडे दाखवून घ्यावे, त्यावर ते तुम्हाला ऑंटीसेफ्टीक क्रीम, तसेच गोळ्या, औषधी देतील. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.
धन्यवाद
डॉक्टर पाटील यांनी आपले मराठी आयुर्वेद चे काही सोप्पे उपाय आपल्या साठी येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.