डोके दुखी घरगुती उपचार मराठी मध्ये

डोके दुखी घरगुती उपचार मराठी मध्ये

डोकेदुखी ची समस्या आज प्रत्येक एक दुसऱ्याला असते. कोणाला अति कामामुळे तर कोणाला उन्हामुळे डोके दुखी ची समस्या असते. तर आज आम्ही आपल्याला असे काही घरगुती उपचार सांगणार आहोत मराठी मध्ये ज्यामुळे आपण घरच्या घरी डोक दुखत असेल तर उपचार करू शकतात .

डोके दुखत असल्यास काय खावे:

तांदूळ, तूर, गहू, मूग, साळीच्या लाह्या, दुधी, पडवळ, पालक, दोडका, चाकवत, घोसाळे, डाळिंब, द्राक्षे, खडी साखर इत्यादी पदार्थ जास्त प्रमाणात खावे.

डोके दुखी मध्ये काय खाऊ नये:

बाजरी, नाचणी, गवार, मटार, हरबरा, चवळी, शेवग्याच्या शेंगा, सिमला मिरची, अननस, कैरी, आंबट दही, मद्य इत्यादी पदार्थ टाळावे.

डोके दुखत असल्यास तुम्हाला डॉक्टर कडे जायची गरज नाही. घरगुती उपचाराने देखील तुम्ही डोकेदुखी वर मात करू शकतात.

डोके दुखी घरगुती उपाय :

  • जर तुमच डोकं दुखत असेल तर दोन किंवा तीन वेलदोडे कुटून त्यात पिंपळाचे दोन चिमूट चूर्ण घालावे. आणि मधासह घ्यावे. याने डोकं दुखायचे थांबते.
  • सर्दी मूळे डोकं जळ होऊन दुखत असल्यास सुंठ, मिरे, पिंपळी, व दालचिनी यांचे एकत्र अर्धा चमचा चूर्ण मधातून घ्यावे. याने सर्दी मुळे जळ झालेलं डोकं मोकळं होत आणि डोके दुखी थांबते.
  • अपचनामुळे पोट जड होऊन डोकं दुखत असल्यास चमचाभर आले लिंबाच्या रसात थोडी साखर टाकून घ्यावी. याने डोकं दुखी थांबेल.
  • पाण्यात मूठभर मनुका भिजवून खाल्ल्यास छाती, पोटात होणारी जळजळ थांबून पोट साफ होऊन डोकं दुखणं थांबत.
  • अतिशय मानसिक ताण व थकव्यामुळे डोके दुखत असल्यास दुधात उगाळलेल्या जायफळ मध्ये थोडी वेलची पूड टाकून कपाळावर लेप करावा.
  • डोके जड होऊन दुखत असल्यास सुंठ व लवंग उगाळून कपाळावर लेप करावा.
  • उन्हामुळे किंवा जगरणामुळे डोके दुखत असल्यास अथवा अर्धशिशीचा त्रास असल्यास नाकामध्ये सजून तूपाचे दोन थेंब टाकावे. याने डोकं दुखणे कमी होईल.
  • घरी बनवलेले एक चमचा लोणी खाडी साखरेसह नियमित घेतल्यास वारंवार डोके दुखायचा त्रास कमी होतो.
  • वेळेवर झोपणे, वेळेवर जेवण केल्यास डोकेदुखी चा त्रास होत नाही.

उल्टी vomating थांबवण्याचे घरगुती उपचार.

भूक वाढीसाठी उपाय जेवण वाढवण्यासाठी काय करावे ?.

ताप आल्यावर काय करावे.

1 thought on “डोके दुखी घरगुती उपचार मराठी मध्ये”

Leave a comment