धन्याचे पाणी पिण्याचे फायदे आणि बनवायची पद्धत जाणून घ्या

आज आम्ही आपल्याला एक अस्सल घरगुती उपाय सांगणार आहोत उपाय वापरून तुम्ही खूप साऱ्या आजारांपासून सुटका मिळवू शकतात. कारण खूप सारे लोक असे आहे की ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्यांच्या दैनंदिन जीवनात जीवनामध्ये येत असतात जसे कि सर्दी खोकला, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे किंवा महिलांच्या मासिक पाळी मध्ये त्यांना अधिक त्रास होणे अशा खूप सर्व समस्यांचे घरगुती उपाय आपल्याकडे घरातच उपलब्ध असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी गोळ्या घेत असतो. यासाठी आम्ही आज आपल्याला आपल्या घरामध्ये असलेले धने किंवा कोथंबीर वापरून धन्याचे पाणी चा उपाय कसा करायचा याबद्दल माहिती देणार आहोत.

आजकाल सर्वांच्याच घरांमध्ये जेवण बनवताना किचनमध्ये कोथंबीर दिसते किंवा धन्याचे दाणे दिसतात त्याकरता हा सोपा उपाय कोणीही करू शकतो, चला मग तर जाणून घेऊया काय आहेत धन्याचे दाणे आणि कोथिंबीर चे सोपे घरगुती उपाय.

धन्याचे पाणी पिल्यामुळे काय फायदे होतात ?

धन्या मध्ये खूप सारे असे गुण उपलब्ध आहेत जे तुम्हाला माहितही नसणार. धन्या मध्ये पोटॅशियम विटामिन सी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम अधिक मात्र मध्ये असते. यामुळे याचा नीट वापर केल्याने आपल्याला हे सर्व गुण एकाच ठिकाणी आपल्या शरीरासाठी अगदी सोप्या पद्धतीने मिळतील. जर आपल्याला आपले वजन कमी करायचे असेल किंवा आपल्याला डायबिटीस सारखी समस्या असेल तर आपल्यासाठी हे उपाय खूप लाभदायक आहेत.

चला मग जाणून घेऊया काय आहे धन्याचे पाणी पिल्यामुळे होणारे फायदे :

पोटाचा घेर आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर :

मित्रांनो आपल्या शरीरा मधली अतिरिक्त चरबी घालवण्यासाठी धन्याचे पाणी आपली मदत करते. ज्या व्यक्तीला वजन कमी करायचे आहे त्या व्यक्तींसाठी नियमित धन्याचे पाणी प्यायल्याने धन्या मध्ये असलेले Quercetin गुण  आपल्या शरीरामधील मेटाबोलिजम वेगवान होण्यास मदत करतो. आणि मेटाबोलिजम वाढल्यामुळे आपल्या शरीरामधील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते.

शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो :

जर तुम्ही योग्य पद्धतीने धन्याच्या पाण्याचे सेवन केले तर तुम्हाला धन्या मध्ये उपलब्ध असलेले अस्कॉर्बिक अॅसिद आमच्या शरीरामध्ये अँटिऑक्सिडंट सारखे काम करते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती याच्यामुळे वाढण्यास मदत होते.

सर्दी खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन पासून सुटकारा :

जर तुमची तब्येत अचानक मध्येच सर्दी आणि खोकला किंवा तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन सारखे छोटे छोटे आजार होत असतील तर तुम्हाला धन्याचे पाणी खूप फायदेशीर ठरू शकते. धन्या मध्ये असलेले लीनोलेनिक ॲसिड तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.

तोंडाचा वास येत असेल तर :

जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या तोंडाचा खूप वास येत आहे आणि तो तुम्हाला नाहीतर समोरच्या व्यक्ती ला तुमच्या मुळे होणारा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही आठवड्यातून दोन-तीन वेळा धन्याचे पाणी प्यायला हवे.

डायबिटीज वर नियंत्रण ठेवण्यासाठी :

आजकाल खूप लोकांना डायबिटीस ची समस्या वाढलेली आहे. अशा समस्यांमध्ये काही गोष्टी चालतात आणि काही नाही चालत आहे कारण की शुगर वर कंट्रोल ठेवणे खूप गरजेचे असते. पण घाबरून जाऊ नका धन्याचे पाणी तुम्हालाही तेवढेच फायदेमंद राहील आणि धन्य यामुळे तुमचे ग्लुकोज लेव्हल ची असते ती नियंत्रणात राहण्यास तुम्हाला मदत मिळेल व तुमच्या डायबिटीज नियंत्रणात राहील.

मासिक पाळी मध्ये आराम मिळवण्यासाठी :

आज-काल मुली आणि महिलांना मध्ये मासिक पाळीच्या बाबतीमध्ये खूप काही अशा अडचणी असतात की ज्या ते कोणासोबत मनमोकळेपणाने बोलू नाही शकत. आणि त्यामुळे त्यांना मासिक पाळी मध्ये होणारा त्रास कोणाला सांगता ही येत नाही. धन्याचे पाणी प्यायल्याने तुम्हाला मासिक पाळी मध्ये होणाऱ्या त्रासापासून थोडा आराम मिळू शकतो. धन्य मध्ये Antispasmodic गुणधर्म असल्यामुळे तुम्हाला यामध्ये आराम मिळतो. यासाठी तुम्ही धन्याचे पाणी सकाळी उपाशी पोटी घ्यायला हवे.

शरीर डिटॉक्स करण्यासाठी :

आज काल आपल्या शरीरामध्ये योग्य खान-पान नसल्यामुळे आपल्याला खूप सारे विकार होतात जसे की ऍसिडिटी, पित्त वाढणे किंवा इतर समस्या आपल्याला होत असतात जेणेकरून आपली तब्येत खराब होत असते. अशा वेळेस तुम्हाला शरीर आणि रक्त शुद्ध करायला हवे असते त्यासाठी तुम्हाला धन्याचे पाणी उपयुक्त ठरेल.

तर मग हे होते काही फायदे. आता आपण जाणून घेऊया कसे आपण घर बसल्या हे धन्याचे पाणी बनवू शकतो ?

धन्याचे पाणी बनवण्याची सोपी पद्धत :

खाली आम्ही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती धन्याचे पाणी बनवण्यासाठी दिलेली आहेत. तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर वाटेल ती तुम्ही वापरू शकतात त्यामुळे तुम्हाला एक समानच फायदे मिळणार आहे.

पद्धत १ :

लागणाऱ्या गोष्टी :

  • एक चमचा धने
  • एक कप पाणी

बनावयाची पद्धत :

  1. यासाठी आपल्याला एक कप पाण्यामध्ये एक चमचा धने रात्रभर भिजवून ठेवायचे आहेत.
  2. सकाळी आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचे आहे.
  3. सकाळी उठल्यावर खाली पोट आपल्याला हे पाणी प्यायचे आहे.
  4. तुम्ही ते उरलेले दाणे सुखावून परत स्वयंपाक आतही वापरू शकतात.

पद्धत 2 :

लागणाऱ्या गोष्टी :

  • एक ग्लास पाणी
  • एक चमचा धने

बनावयाची पद्धत :

  1. ग्लास पाणी उकळून घ्यायचे आहे.
  2. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक चमचा धने त्यात टाकायचे आहेत.
  3. एक मिनिटापर्यंत आपल्याला हे धने आणि पाणी गॅस वर उकळवून घ्यायचे आहे.
  4. हे पाणी तुम्ही रात्रभर झाकून ठेवायचे आहे.
  5. सकाळी उठल्यावर तुम्हाला हे पाणी घेऊन यायचे आहे आणि जर तुम्हाला वाटलेच तुम्ही धने खाऊ शकणार तर ते धने पण तुम्ही खाऊ शकतात.

पद्धत 3 :

लागणाऱ्या गोष्टी :

  • पंधरा ते वीस कोथंबीर चे पत्ते
  • एक ग्लास पाणी
  • लिंबू

बनावयाची पद्धत :

  1. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये पंधरा ते वीस कोथंबीर चे पत्ते टाकायचे आहेत.
  2. रात्रभर हे तुम्हाला भिजू द्यायचे आहे.
  3. सकाळी उठल्यावर तुम्हाला हे पाणी गाळून त्यामध्ये लिंबाचे काही थेंब तुम्ही त्यात मिळवून हे मिश्रण प्यायचे आहे.

पद्धत ४:

लागणाऱ्या गोष्टी :

  • पंधरा ते वीस कोथंबीर चे पत्ते
  • अर्धा ग्लास पाणी
  • लिंबू

बनवायची पद्धत :

  1. या पद्धतीमध्ये तुम्हाला कोथिंबीरची 15 ते 20 पत्ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्ही थोडं पाणी मिसळावे.
  2. मिश्रण बारीक झाल्यानंतर ते तुम्ही अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये मिसळून घ्यायचे आहे.
  3. या मिश्रणामध्ये तुम्हाला तीन ते चार लिंबूचे थेंब टाकायचे आहेत.
  4. हे मिश्रण तुम्ही सकाळी उठल्यावर उपाशीपोटी घ्यायचे आहे यामुळे तुम्हाला खूप फायदे मिळतील.

तर मित्रांना हे होते धन्याचे पाणी पिण्याचे फायदे आणि ते पाणी बनवायची सोपी पद्धत. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा.

Leave a comment