अंडरआर्म्सचा काळेपणा मिटवा एकदम सोप्या घरगुती उपाय ने

अडुळसा औषधी वनस्पती

आपण बऱ्याचदा बघतो की आपल्या अंडरआर्म्स च्या खाली काळपटपणा येतो. तसेच त्याच्याकडे लक्ष दिले नाही तर तो काळपटपणा वाढत जातो. खूप स्त्रियांना स्लीवलेस टॉप, टी-शर्ट घालायचे असतात पण अंडरआर्म्स च्या काळे पणामुळे ते स्लीवलेस कपडे घालू शकत नाही. बऱ्याच जणांना वाटते की आपणही इतरांसारखे मनमोकळे कपडे घालावे पण अंडरआर्म्सचा काळेपणा असतो.

आपण बऱ्याच प्रकारची पावडर, जेल, केमिकल वापरून बघतो, तरी हा काळपटपणा जातच नाही. तसेच वयानुसार जसे जसे वय वाढत जाते तसतसा काळपटपणा वाढत जातो. म्हणून जर आपण साधारण असणाऱ्या गोष्टींकडेही लक्ष देणे फार महत्त्वाचे असते. कारण या गोष्टीबद्दल जरी कोणी बोलत नसलं तरी ही गोष्ट सर्वांना त्रासाची ठरते. तसेच हा त्रास सर्वांनाच उद्भवतो आपण याच्या बद्दल चर्चा नाही करत व कोणतेही अर्धवट उपाय करायला लागतो. मग त्याचे साईड इफेक्ट आपल्यावर दिसून येतात कारण पुरेशी माहिती नसताना आपण कोणतीही वस्तू वापरतो.

तर आपण आज याबाबत चर्चा करणार आहोत की अंडरआर्म्स काळेपणा कसा मिटवावा ? तसेच त्याची कारणे कोणती ? व त्याचे घरगुती उपाय कोणते ?

अंडरआर्म्स काळे पडण्याची प्रमुख कारणे :

1. शरीराकडे दुर्लक्ष करणे
2. जास्त घाम येणे
3. स्वच्छ कपडे न घालने
4. शरीरातील बदल होणे
5. वेगवेगळ्या केमिकल्स वापरणे

इत्यादी कारणे असू शकतात अंडरआर्म्स काळे पडण्याची. आपण कामांमध्ये शरीराकडे दुर्लक्ष करतो तसेच आपल्याला जर जास्त घाम येत असेल किंवा आपण स्वच्छ कपडे घालत नसू किंवा आपण बरेचसे केमिकल वापरतो त्यामुळे ही अंडरआर्म्स डार्क पडण्याची शक्यता असते.

अंडरआर्म्स काळे पडले असतील तर त्यावर घरगुती उपाय :

आपण अंडरआर्म्स काळी पडण्याची कारणे तर बघितली आता आपण बघणार आहोत बगलमध्ये काळेपणा आपण घरगुती उपाय वापरून कसा नाहीसा करु शकतो ते. चला तर मग जाणून घेऊया अंडरआर्म्स चा काळेपणा कसा घालवावा ? ते

लिंबू वापरून बघा :

लिंबू वापरल्याने आपल्या अंडरआर्म्सचा काळेणा जाऊ शकतो. चला तर मग बघूया वापरायची पद्धत –

 1. आपण अर्धा लिंबू घ्यावा.
 2. रोज सकाळी अंघोळीच्या आधी तो लिंबू आपल्या अंडरआर्म्सवर लावा.
 3. पाच ते दहा मिनिट तो लिंबू अंडरआर्म्सवर रब करून घ्यावा.

असे काही दिवस केल्याने तुमची अंडरआर्म्सच्या काळे पणा पासून सुटका होऊ शकते. कारण लिंबू मध्ये ऑंटी ऑक्साईड्स आणि विटामिन असतात. तसेच ब्लिचिंग प्रॉपर्टी पण असतात जर तुम्ही करून बघितले तर तुमचे काळे डाग दूर करण्यास मदत होईल व बगल मधून वास येत असेल तर ते पण या पासून दूर होतो.

एलोवेरा लावल्याने फरक पडेल :

एलोवेरा जेल म्हणजे याला आपण कोरफडीचा गर असे म्हणतो. तो गर आपल्या अंडरआर्म्सला लावल्याने काळे डाग दूर होण्यास मदत होते. कारण एलोरा मध्ये खूप औषधी गुणधर्म असतात. एलोवेराला आपल्या ग्रंथ, पुराणांमध्ये खूप औषधी मानल गेल आहे. तसेच याचे अनेक उपयोग आहेत. त्यातील एक उपयोग म्हणजे त्वचेवरचे काळे डाग काढण्यास मदत होते. तर एलोवेरा लावायचा कसा ते आपण बघू या –

 1. रोज सकाळी किंवा संध्याकाळी थोडासा एलोवेरा म्हणजेच कोरफड घ्यावी.
 2. कोरफडीचा गर काढावा आणि तो आपल्या अंडरआर्म्सला लावावा.
 3. साधारणता दहा मिनिटंने तो कोरफडीचा गर अंडरआर्म्स वर ठेवावा.
 4. त्यानंतर आपले अंडरआर्म्स पाण्याने धुऊन घ्यावे.
 5. असे दहा ते पंधरा दिवस केल्यास तुमच्या अंडरआर्म्सचा काळा पणा दूर होण्यास मदत होईल.

बेकिंग सोडा लावावा :

बेकिंग सोडा हा आपल्या सर्वांच घरी उपलब्ध असतो. तसेच बेकिंग सोडा मध्ये मॅग्नेशियम व ब्लिचिंग प्रॉपर्टी असतात. जे आपल्या त्वचेचे काळे डाग घालवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. यासाठी आपल्याला-

 1. थोडासा बेकिंग सोडा घ्यावा.
 2. त्यामध्ये पाणी मिसळून ते मिश्रण अंडरआर्म्सला लावावे.
 3. दहा मिनिटानंतर अंडरआर्म्स स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.
 4. असे काही दिवस केल्याने तुमच्या अंडरआर्म्स ची समस्या दूर होऊ शकते.

बटाट्याचा रस व गुलाब जल लावून बघा :

बटाटा आपल्या सर्वांचे किचनमध्ये असतो. तसेच बटाट्याचे काही औषधी गुणधर्मही आहेत. बटाट्यामध्ये हाय इलेक्ट्रॉन्स असतात. जे तुमच्या शरीरातील त्वचेतील काही कोणते डाग असतील तर ते दूर होण्यास मदत होते. तर आपण –

 1. सुरुवातीस बटाट्याचा रस करून घ्यावा.
 2. त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे गुलाब जल टाकावे .
 3. ते मिश्रण थोडे थंड करून घ्यावे.
 4. त्यानंतर रोज रात्री झोपण्याआधी ते मिश्रण अंडरआर्म्सला लावून झोपावे.
 5. रोज दहा ते पंधरा दिवस असे केल्यास तुमचे अंडरआर्म्सच्या डागा पासून सुटका होऊ शकते.

बगल काळी न होण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात :

 • आपल्या अंडरआर्म्सला कोणत्याही प्रकारचे केमिकल्स लावू नये.
 • तसेच अंडरआर्म्सच्या डागाचे मुख्य कारण म्हणजे घाम असते.
 • आपल्याला जर खूप घाम येत असेल तर आपण दिवसातून दोन वेळा अंघोळ करावी. तसेच आंघोळीला थोडेसे कोमट पाणी घेतले तरी चालेल.
 • नेहमी स्वच्छ कपडे घालावे. आपण बरेचदा याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून त्यानंतर आपल्याला काही अडचणींना सामोरे जावे लागते याकडे दुर्लक्ष करू नये.

तर आज आपण बघितले अंडरआर्म्स काळे पडण्याची ची कारणे कोणती ? तसेच त्यावर घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते आहे ? हे आज आपण जाणून घेतले आम्ही सांगितलेले उपाय जर तुम्ही करून बघितले तर तुमची अंडरआर्म्सच्या ङागा पासून सुटका होऊ शकते. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *