दात सळसळ करणे या त्रासापासून त्रस्त आहात का ? जाणून घ्या हे उपाय

दात सळसळ करणे

मित्रांनो आपल्या शरीरातील सर्वात वाईट दुखणं दाताचं असतं कारण दात दुखायला लागले, तर आपल्याला कोणतीही गोष्ट खाता येत नाही, पिता येत नाही. आपले शरीर अशक्त बनत जाते याच प्रकारे आपल्याला त्या दात सळसळ करणे चा खूप त्रास होतो. आपल्या मेंदूपर्यंत ती सहसा जाणवते ती सळसळ जर लवकरच बरी नाही केली किंवा त्याच्यावर लवकरच काही उपाय नाही केलं तर दातातील दुखणं वाढतच जाते व एका वेळानंतर आपल्याला तोंड हलवायला तसेच बोलायला खूप त्रास होतो.

आपल्याला जर दाताची समस्या जाणवत असेल तर आपण त्वरित आपल्या डेंटिस्ट कडे गेले पाहिजे. कारण आपण जर ती दाताची सरळ अंगावर काढली तर ती समस्या कालांतराने वाढत जाते. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे.

तर आपण आज बघणार आहोत आपल्या दातांमध्ये समस्या का निर्माण होते त्याची कारणे कोणती याच प्रकारे जर आपल्या दातांमध्ये. सळसळ होत असेल दात ठणकत असतील तर आपण घरगुती व सोपे उपायांनी ती ठणक कशी कमी करू शकतो चला तर मग पाहूया –

दात का सळसळ करू लागतात ?

1. दाताचे घर्षण झाल्यामुळे
2. चुकीचा आहार घेतल्याने
3. मानसिक तणाव वाढल्याने
4. दातावरील परत नाहीशी होण्यामुळे
5. चुकीच्या पद्धतीने ब्रश केल्यामुळे
6. आमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे
7. ऍसिडिटी झाल्यामुळे

तर मित्रांनो आपल्या दातांची हळू हळू मोठ्या प्रमाणामध्ये घर्षण होत असते. म्हणून आपले दात दिवसंदिवस झिजत असतात म्हणून आपल्या दातांची सळसळ होते तसेच आपण बऱ्याचदा चुकीचा आहार चुकीच्या वेळी घेतो, यामुळे देखील आपल्या दातांमध्ये सळसन निर्माण होते.

कारण खूप लोकांना सवय असते आंबट पदार्थ खाण्याची त्या आंबट पदार्थांमध्ये नायट्रिक ऍसिड असते ज्याच्यामुळे तुमच्या दातांची हळू हळू झीज होते. आपल्या दातांवर दोन परत असतात त्यातील पहिली परत म्हणजे ऍनोमल जी आपल्या दातांना ॲसिड, कीड दातांना लागण्यापासून वाचवते.

त्याच्या आतील परत म्हणजे डेंटल जी खूप संवेदनशील असते दाताच्या आतील बाजूस इडेंटी म्हणतात. जर त्या डेंटल ला जरासाही स्पर्श झाला तर आपल्यात दातांची सळसळ होते.

अनेक लोकांना अंमली पदार्थ खाण्याची सवय असते. या अमली पदार्थांमुळे आपल्या दातांची झीज होते व आपल्या दातांना हळूहळू कीड लागते. यामुळे आपल्या दातांची. सळसळ होते तसेच बऱ्याच लोकांना ऍसिडिटी असते, त्या ऍसिडिटीमुळे देखील आपले दात दिसण्याची शक्यता असते.

दात सळसळण्यावर उपाय जाणून घ्या :

आपण दात सळसळ्याची कारणे तर बघितली आता आपण जाणून घेणार आहोत, आपले जर दात सळसळत असतील तर त्यावर घरगुती व सोप्या पद्धतीने आपण कसे थांबवू शकतो ते आपण बघणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

ब्रश योग्य पद्धतीने करायला हवा :

अनेक लोकं ब्रश करताना खूप हार्ड ब्रश वापरतात यामुळे त्यांच्या हिरड्या सोलतात. तसेच दातांची झीज होते यामुळे आपले दात स्वच्छ होतात पण दातामध्ये ठणक बसते. कारण दातांच्या मुळांना हिरड्या सुरक्षित ठेवतात, पण चुकीच्या पद्धतीने ब्रश केल्याने हिरड्यांना इजा होते. म्हणून ब्रश करताना दात जोरात घासू नये व दिवसातून दोनदा ब्रश करावा एकदा सकाळी व एकदा रात्री जेवण झाल्यावर.

लसणीच्या पाकळ्या दाता खाली ठेवा :

आपल्याले दात खूप ठणकत असतील तसेच सळसळ करत असतील तर दाताखाली लसणाच्या पाकळ्या ठेवा जेणेकरून तुमचे दाताची ठणक तात्काळ थांबेल.

लंवग ठेवून बघा :

बऱ्याच लोकांना दाताखाली लसुन ठेवलेले आवडत नाही म्हणून त्या लोकांसाठी दुसरा उपाय म्हणजे तुम्ही दाताखाली लवंगी ठेवू शकतात. जेणेकरून तुमचे दाताची ठणक व दातातील सळसळणे तात्काळ थांबेल, तसेच जर तुमच्या दाताला कीड लागली असेल तर लवंग मुळे तुमच्या दातातील कीड ही नाहीसा होण्यास मदत होईल.

पेरूची पाने खावी :

आपले दातातील वरची परत कमी झाल्यामुळे आपले दात सळसळत तसेच दाताची झीज होते. पेरू चे पान खाल्ल्याने आपले दाताची ठणक थांबते तसेच दातांची झीज होणे ही पेरूच्या पानांवर थांबते.

दिवसातून एकदा पेरूची पाने खावी पेरूची पाने दातांनी चावून खावी, तसेच पानांचा रस तोंडामध्ये जास्त वेळ ठेवावा जेणेकरून जाताना त्याचा फायदा होईल.

लिंबाच्या काडीने दात घासायला हवे :

लिंबाचे झाड हे खूप आयुर्वेदिक असते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या दातांवर खूप चांगले फायदे होतात. त्यातील एक फायदा म्हणजे आपण जर लिंबाच्या काडीने दात घासले, तर आपले दात निरोगी तसेच पांढरे शुभ्र राहतात व दातांना कीड लागण्याचा धोकाही कमी होतो.

आल्याचे तुकडे ठेवून बघा :

आपल्या जर दाताची सळसळ होत असेल तर ज्या ठिकाणी सळसळ होत आहे त्या ठिकाणी आल्याचे बारीक तुकडे ठेवावे. तसेच तुम्हाला आल्याचे तुकडे ठेवायची नसेल, तर तुम्ही आल्याची पेस्ट करून त्या जागी ठेवू शकता जेणेकरून तुमच्या दाताची ठणक थांबू शकते.

तर मित्रांनो आज आपण बघितले दात मध्ये सळसळ का होते तसेच जर आपल्या दातांमध्ये सळसळ होत असेल तर त्यावर कोणते घरगुती व प्रभावशाली उपाय आहेत. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

तुम्हाला काही अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल, तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *