आपण चांगले दिसावे आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्य ताजे व टवटवीत हवे असे प्रत्येकालाच वाटते. पण अशा काही वेगवेगळ्या समस्या आहेत. जे आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्य बिघडते आणि हे सौंदर्य बिघडू नये म्हणून आपण आपल्या चेहऱ्याची खूप काळजी घेतो. त्यामुळे आपण आज जाणून घेऊया चेहऱ्यावरील मुरूम घालवण्यासाठी काय केले पाहिजेल.
अनेक लोकांना वेगवेगळ्या चेहऱ्याची निगडीत वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि अशा प्रकारच्या समस्यांमुळे त्यांच्या चेहऱ्यावरील सौंदर्य कमी होते. त्याचबरोबर हे सौंदर्य वाचण्यासाठी ते वेगवेगळे गोळ्यांचा किंवा वेगवेगळ्या केमिकल युक्त क्रीम्सचा आधार घेतात. पण यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर काही साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात.
ज्यामुळे आपली त्वचा कोरडी पडणे सुद्धा सुरुवात होऊ शकते. चेहऱ्यावर मुरूम येणे ही समस्या अनेक लोकांना जाणवते किंवा बऱ्याच लोकांनी या समस्येचा अनुभव घेतला आहे. चेहऱ्यावर मुरूम येण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. तुम्ही कितीही चांगले तयार झालात तरी तुमच्या चेहऱ्यावरील मुरूम मुळे तुमचे सौंदर्य बिघडते.
चेहऱ्यावर मुरूम येणे यालाच पिंपल्स सुद्धा म्हटले जाते. तरुण मुला-मुलींमध्ये चेहऱ्यावर मुरूम येणे ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. चेहऱ्यावर मुरूम आल्यामुळे आपली त्वचा खडबडीत होते आणि कोरडी सुद्धा होण्यास सुरुवात होते. कधीकधी चेहऱ्यावर मुरूम आल्यामुळे चेहऱ्यावर डाग सुद्धा निर्माण होतात.
चेहऱ्यावरील मुरूम येण्याची कारणे :-
तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत चेहऱ्यावर मुरूम येण्याची कारणे कोणती आहे? व त्यावर घरगुती व प्रभावशाली उपाय कोणकोणते करता येऊ शकतात? चला तर मग बघूया!
१. हवेतील प्रदूषण :-
चेहऱ्यावर मुरूम येण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हवेतील असणारे प्रदूषण. हवेतील प्रदूषणाचे कण आपल्या त्वचेला चिटकतात बरोबर प्रदूषणामुळे आपल्या चेहऱ्यावर धुळीचे कण सुद्धा येतात आणि ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर मुरूम निर्माण होते व आपल्या त्वचेला याची हानी होते. चेहऱ्यावर मुरूम येणे अशा समस्या आपल्याला निर्माण होतात. त्यामुळे हवामानात असणारे प्रदूषण हेदेखील त्वचेवर मुरुम किंवा पिंपल्स येणे याचे एक महत्त्वाचे कारण आहे.
२. चेहरा तेलकट असणे :-
जर समजा चेहरा सतत तेलकट असेल किंवा तो स्वच्छ नसेल तर चेहऱ्यावर मुरूम येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. कारण की चेहरा तेलकट असते म्हणजेच चेहऱ्यावर धूळ व प्रदूषण यांचे जंतू आपल्या चेहऱ्यावर चिटकतात आणि चेहरा अस्वच्छ असल्यामुळे चेहऱ्यावर मुरूम येणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे चेहरा जर अस्वच्छ असेल तर चेहऱ्यावर मुरूम निर्माण होऊ शकतात.
३. शरीरात होणारे बदल :-
वाढत्या वयोमानानुसार आपल्या शरीरात वेगवेगळे बदल होत असतात. ज्यामुळे आपल्या हार्मोन्स सुद्धा बदलतात. या होणाऱ्या शरीरातील बदलांमुळे चेहऱ्यावर मुरूम येणे अशा समस्या उद्भवू अथवा निर्माण होऊ शकतात. शरीरात होणारे बदल जर आपल्या त्वचेला सहन झाले नाही तर चेहऱ्यावर मुरूम येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे देखील चेहऱ्यावर मुरूम येण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे.
चेहऱ्यावरील मुरुम घालवण्यासाठी घरगुती उपाय :-
तर वरील भागात आपण बघितले चेहऱ्यावर मुरूम येण्याचे कारणे कोणकोणते आहेत? आता आपण बघणार आहोत चेहऱ्यावर आलेले मुरूम घालवण्यासाठी कोण कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो?
● कोरफडीचे जेल लावा :-
आयुर्वेदानुसार कोरफडीचा जेल हा अनेक समस्यांवर अत्यंत गुणकारी व उपयुक्त आहे. त्याचबरोबर कोरफडीचा जेल हा वेगवेगळ्या कामासाठी सुद्धा वापरला जातो. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील मुरूम घालवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा जेल काढून तो चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे ठेवावा. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून काढावा. असे दहा ते पंधरा दिवस केल्यामुळे तुमच्या चेहर्यावरील आलेले मुरूम जाण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते.
● लिंबाची पेस्ट :-
कडुनिंब हे जरी कडू असले तर त्याचे गुण खूप अत्यंत गुणकारी आहे. कडुनिंबाची पाच-सहा पाने घेऊन ती बारीक करून घेऊ ती गरम पाण्यासोबत त्याची पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट चेहऱ्यावर मुरूम आलेल्या ठिकाणी दिवसातून दोन वेळा लावावी. असे दहा ते पंधरा दिवस केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मुरूम जाण्याचे तुम्हाला मदत होऊ शकते किंवा चेहऱ्यावरील मुरूम येणे या समस्या पासून तुम्हाला आराम मिळू शकतो.
● लिंबूची पेस्ट लावा :-
लिंबू मध्ये लॅक्टिक ऍसिड चे प्रमाण अधिक प्रमाणात असते. हे चेहऱ्यावरील आलेले मुरूम घालवण्यासाठी उपयुक्त ठरते. तुळशीची पाच-सहा पाने घेऊन ती चांगली बारीक करावी आणि त्यामध्ये लिंबूचा रस टाकावा आणि हे मिश्रण एकत्रित करून चेहऱ्यावरच्या ठिकाणी मुरूम आले आहे त्या ठिकाणी लावावे. असे केल्यामुळे चेहऱ्यावरील मुरूम जाण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. हा उपाय दहा ते पंधरा दिवस करावा यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.
आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले चेहऱ्यावर मुरूम येण्याची कारणे कोणती? त्याचबरोबर त्याचा घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
Dr. Madhuri is a leading Health expert. She has started her career in Doctor Field in 2018. She has completed her Medical Degree from a Govt recognized organization.