चेहर्याला बेसन लावण्याचे फायदे माहिती आहेत का ? जाणून घ्या

चेहर्याला बेसन लावण्याचे फायदे

आपली त्वचा व आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्य चांगले असावे अशी सर्वांची इच्छा असते आणि त्यासाठी सर्वजण वेगवेगळे प्रयत्न करत असतात आणि हे प्रयत्न करत असताना ते वेगवेगळ्या क्रीमचा वापर करतात. पण काही केमिकलयुक्त क्रीमचा वापर केल्यामुळे त्याचा त्यांना साईड इफेक्ट देखील होऊ शकतो. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे किंवा चेहऱ्यावर सतत लाल किंवा काळे डाग येणे अशा समस्या उद्भवू शकतात. पण जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील सौंदर्य व त्याचबरोबर तुमच्या त्वचेवरील सौंदर्य वाढवायचे असेल तर तुम्ही बेसन पावडरचा वापर करून बघावा.

बेसन मध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगळ्या घटकांमुळे आपल्या चेहऱ्यावरील धूळ, प्रदूषणाचे कण नाहीसे करण्यासाठी बेसन हे आपल्याला मदत करतो. स्वयंपाक घरात बेसनाचा वापर विविध प्रकारे केला जातो त्याचबरोबर विविध प्रकारची पदार्थ बनवण्यासाठी देखील व्यसनाचा वापर केला जातो

बेसन चेहऱ्याला लावण्याचे फायदे :-

बेसनामुळे आपल्या त्वचेवर किंवा चेहऱ्यावर असणारी कोणतीही घाण स्वच्छ करण्यासाठी बेसन आपल्याला मदत करते. चेहरा तर स्वच्छ करतेच पण त्याचबरोबर ते त्वचेला आवश्यक असणारे पोषक घटक व तत्वे देखील देते. जे आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्य वाढवण्याचे काम करते.

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत चेहऱ्यावर बेसन लावल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात ? चला तर मग बघुया !

● चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करण्यास मदत करतो :-

अनेक वेळा आपण आपल्या दैनंदिन जीवनात वेगळ्या कामासाठी घराबाहेर पडत असतो आणि हे काम करत असताना आपण आपल्या कामात एवढे एकाग्रह किंवा गुंग होऊन जातो की आपण आपल्या चेहऱ्याकडे किंवा आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर प्रदूषणाचे व धुळीचे कण चिटकतात. त्यामुळे आपल्या त्वचेवर किंवा चेहऱ्यावर अस्वच्छपणा निर्माण होतो. ज्यामुळे आपले सौंदर्य मध्ये अडथळा येऊ शकतो.

बेसन मध्ये उपलब्ध असणारा वेगळ्या घटकांमुळे आपल्या चेहऱ्यावरील हे प्रदूषणाचे कण त्याचबरोबर चेहरा वरील कोणतेही घाण स्वच्छ करण्याचे काम बेसन करत असते.

रोज रात्री झोपायच्या एक किंवा दोन तास आधी ही बेसन चेहऱ्यावर लावा. हे बेसन आपल्या चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन घ्या. असे पाच-सहा दिवस केल्यामुळे तुमच्या चेहरा स्वच्छ होण्यास तुम्हाला मदत मिळेल. त्याच बरोबर तुमच्या चेहरा स्वच्छ झाल्यासारखा तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे हा एक महत्त्वाचा फायदा आपल्याला बेसन चेहऱ्यावर लावल्यामुळे होऊ शकतो.

● चेहऱ्यावरील पिंपल्स घालण्यासाठी मदत करते :-

अनेक लोकांना प्रामुख्याने तरुण मुला-मुलींना चेहऱ्यावर पिंपल्स येणे अशा समस्यांना वारंवार सामोरे जावे लागते. हे पिंपल घालवण्यासाठी ते वेगवेगळ्या औषधांचा किंवा क्रीमचा वापर करतात. पण यामुळे काही पुरेसा फरक पडत नाही. पण जर तुम्हाला हे चेहऱ्यावरील पिंपल्स घालवायचे असतील तर तुम्ही बेसन चा वापर करून बघावा.

बेसन घेऊन त्यामध्ये थोडेसे कोमट पाणी टाकावे. याची चांगली पेस्ट तयार करून घ्यावी ही पेस्ट चेहऱ्याला लावावी. ही पेस्ट चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनिटं तशीच राहू द्यावी. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा असे जर तुम्ही ते 20 दिवस केले तर तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल जाण्याचे तुम्हाला मदत मिळू शकते. त्याचबरोबर तुमच्या चेहर्‍यावरील काही पिंपल्स गेलेले तुम्हाला आढळून येऊ शकते. त्यामुळे हा एक उत्तम उपाय तुम्हाला चेहऱ्यावरील पिंपल घालवण्यासाठी होऊ शकतो.

● ओईली स्किन दूर करते :-

आपल्या दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या कामांसाठी धावपळ करत असतो. ही धावपळ करताना आपण आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचे राहून जाते किंवा लक्ष दिले जात नाही.

दैनंदिन जीवनात आपल्या चेहऱ्यावर प्रदूषण व धुळीचे कण येऊन चिटकतात. ज्यामुळे आपले स्किन किंवा आपला चेहरा ओईली झाल्या सारखा आपल्याला वाटतो. हया ओईली चेहऱ्यामुळे आपल्या सौंदर्य अधिकच बिघडते. ज्यामुळे आपला चेहरा खूप अधिकच अस्वच्छ दिसतो. पण जर तुम्हालाही तुमची ओईली स्किन दूर करायचे असेल किंवा तुमच्या चेहर्‍यावरील ओईली पणा जर तुम्हाला घालवायचा असेल तर तुम्ही चेहऱ्याला बेसन लावून बघा. बेसन मध्ये थोडेसे पाणी टाकून त्याचा फेस मास्क तयार करून घ्या. हा फेस मास्क चेहऱ्यावर अर्धा तास राहू द्या असे केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सगळी घाण त्याच बरोबर ओईलीपणा पण दूर करण्यास बेसन तुम्हाला मदत करेल. त्यामुळे हा एक उत्तम उपाय तुम्हाला होऊ शकतो.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले बेसन चेहऱ्याला लावल्यामुळे कोणकोणते फायदे आपल्या चेहऱ्याला होऊ शकतात? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *