चामखीळ घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय जाणून घ्या

चामखीळ घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

अनेक लोकांना त्यांच्या शरीरावर भरपूर चामखीळ किंवा मोस असते. अशा प्रकारच्या चामखिळी त्यांच्या शरीरावर असल्यामुळे त्यांच्या सौंदर्या यामध्ये अडथळा निर्माण होतो. अशा समस्या बरेच लोकांना असतात चामखीळ येणे याला स्किन ट्यूमर म्हणून सुद्धा ओळखले जाते, त्यामुळे या चामखीळ घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत.

अनेक लोकांच्या पायांच्या तळव्यांना किंवा बोटांना त्याच बरोबर हातांच्या तळव्यांना आणि बोटांना, चेहऱ्यावर अशा वेगवेगळ्या ठिकाणी चामखीळ असते. यामुळे त्यांचे बोटे किंवा तळवे कुरूप दिसतात. लहान मुलांच्या शरीरावर ही चामखीळ अधिक प्रमाणात दिसून येते.

चामखीळचे मुख्यतः तीन वेगवेगळे प्रकार असतात. या प्रकारामध्ये शरीरावर कोणत्याही एका प्रकाराची चामखीळ असते. अनेक वेळा चामखिळ ही कोणताही उपाय न करता नाहीशी होते. तर काही वेळा वेगवेगळे शस्त्रक्रिया करून ही चामखीळ नाहीशी केली जाते. पण ही चामखीळ वेगवेगळे घरगुती उपाय केल्याने सुद्धा नाहीशी होऊ शकते.

चामखीळ चे प्रकार :-

तर आज आपण जाणून घेऊया चामखीळचे मुख्य तीन वेगवेगळे प्रकार कोणते? आणि चामखीळी घालवण्यासाठी कोणते घरगुती प्रभावशाली उपाय करू शकतो? चला तर मग बघुया!

१. कॉमन चामखीळ :-

चामखीळ ही वेगवेगळ्या प्रकाराची आपल्या शरीरावर असते. त्यामधील सर्वप्रथम चामखीळचे प्रकार म्हणजे कॉमन चामखीळ. कॉमन चामखीळ ही आपल्या शरीरावर कोणत्याही भागावर येऊ शकते. मुख्यता पायाच्या किंवा हाताच्या बोटावर येते.

२. फ्लॅट चामखीळ :-

चामखीळीचा अजून एक महत्त्वाचा प्रचार म्हणजे फ्लॅट चामखीळी. ही चामखीळी शरीरावर आपल्या चेहऱ्यावर तसेच आपल्या हातावर आणि पायावर येतात ही चामखिळ जास्त फुगलेली नसते, त्यामुळे हिला फ्लॅट चामखीळ असे म्हणतात.

३. फिलिफॉर्म चामखीळ :-

चामखीळीमधील तिसरा प्रकार म्हणजे फिलिफॉर्म चामखीळ ही चामखीळ आपल्या चेहर्‍यावरील तोंडाच्या बाजूस त्याचबरोबर मानेच्या बाजूस आणि हातावर दिसून येते.

चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय :-

तर मित्रांनो आता आपण बघितले चामखीळी चे वेगवेगळे प्रकार कोणते ? आता आपण बघणार आहोत चामखीळ घालवण्यासाठी कोण कोणते घरगुती उपाय ? आपण करू शकतो ते –

लसूण वापरून पहा :-

अनेक लोक आपल्या शरीरावर असणारी चामखीळ घालवण्यासाठी प्रयत्न करत असतात, जर तुम्हालाही तुमच्या शरीरावरची चामखीळ घालवायचे असेल तर, लसणाची पेस्ट चामखिळीवर लावून बघा. असे दहा ते पंधरा दिवस केल्यामुळे तुमची चामखीळ आपोआप गळून पडेल.

लिंबू लावून बघा :-

शरीरावरची चामखीळ घालवण्यासाठी लिंबू उपयुक्त ठरू शकतो. लिंबू मध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या नाइट्रिक एसिड मुळे चामखीळी जाण्यास मदत मिळेल. रोज रात्री झोपण्यापूर्वी लिंबाचा रस चामखीळ असलेल्या ठिकाणी लावावा असे दहा ते पंधरा दिवस जर केले तर चामखीळ गळून पडू शकते.

बटाटा लावा :-

जर तुम्हाला तुमच्या शरीरावरची चामखीळ घालवायचे असेल तर बटाटा वापरून पहा. बटाट्याचे बारीक तुकडे करून ते मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे. बारीक झालेला बटाटा चामखीळ असलेल्या ठिकाणी लावा असे पाच ते दहा दिवस केल्याने तुमच्या शरीरावरची चामखीळ जाण्यास मदत होईल.

कोरफडीचा जेल लावून बघा :-

चामखीळीचा त्रासापासून जर तुम्हाला सुटका मिळवायचे असेल तर कोरफडीचे जेल तुम्हाला उपयोगी ठरेल. कोरफडीचा ताजा जेल असलेल्या ठिकाणी लावा असे पंधरा ते वीस दिवस करावे. असे केल्यामुळे तुम्हाला चामखीळी पासून सुटका मिळू शकते. अनेक आजारावर उपाय म्हणून कोरफड वापरली जाते.

केळ लावून बघा :-

केळ हे शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी तसेच वेगवेगळे समस्यांवर उपाय म्हणून हे उपयोगी ठरते. मिक्सर मध्ये एक केळी बारीक करून चामखीळ असेल त्या ठिकाणी लावावे. केळ्या मध्ये असलेल्या नैसर्गिक गुणधर्म मुळे तुमची चामखीळ जाण्यास तुम्हाला मदत होईल. हे जर तुम्ही दररोज केले तर तुमच्या शरीरावरची चामखीळ नष्ट होऊ शकते.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले शरीरावर आलेली चामखीळीचे प्रकार कोणते? त्याचबरोबर त्याचा घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा . ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *