अंगाला खाज येत आहे का ? हे घरगुती उपचार करून बघा

बरेच वेळा आपल्या अंगाला खाज येत असते. ही अंगाला येणारी खाज स्किन एलर्जी मुळे मग धुळीच्या ऍलर्जीमुळे येत असते. तर काही लोकांना पित्ताचा त्रास असल्यामुळे अंगाला पुरळ पडणे किंवा खाज येते.

कधीकधी खाज एलर्जी झाल्यामुळे येते. नाहीतर कधीही अचानक खाज येते. त्याचबरोबर त्यामुळे खाज येण्याचे नेमके कारण कोणते हे, आपल्याला कळत नाही. काहीवेळा एकाच ठिकाणी वारंवार खाज येत असते आणि अतिप्रमाणात खाज खाजल्यामुळे आपल्या त्वचेला त्याची हानी होऊ शकते.

त्यामुळे अंगाला जास्त अथवा अतिप्रमाणात खाज येणे हे आपल्याला त्रासदायक ठरू शकते. बरेच लोकांना तापमानातील झालेल्या बदलांमुळे सुद्धा अंगाला खाज निर्माण होते. खाज येण्याचे आणखी मुख्य कारण म्हणजे घाम. आपण नेहमी आपल्या कामामध्ये गुंग असतो आणि ही काम करताना आपल्या शरीराला घाम येतो. काहीजण हा घाम पुसत नाही आणि अतिप्रमाणात घाम आल्यामुळे सुद्धा शरीराला खाज येते.

अंगाला खाज येण्याची कारणे :-

अंगाला खाज येणे यावर जर वेळीच उपाय केले नाही, तर आपल्याला वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अंगावर खाज येणे याच्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार अंगावर खाज येण्याची कारणे कोणती ? आणि यावर घरगुती व प्रभावशाली उपाय कोण कोणते आहेत ? चला तर मग बघूया!

एलर्जी :-

शरीरावर खाज येण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या स्कीनला असणारी कोणतीही ऍलर्जी. बऱ्याच जणांना धूळ किंवा मातीची कोणताही केमिकलची किंवा अन्य कुठलीही वेगवेगळ्या प्रकारची ऍलर्जी असते. अशा प्रकारच्या ऍलर्जीमुळे सुद्धा आपल्याला अंगावर खाज निर्माण होते.

कोरडी त्वचा असणे :-

बऱ्याच लोकांची त्वचा ही कोरडी आहे. कोरडी असते ह्या कोरडी त्वचा मुळे सुद्धा आपल्याला शरीरावर खाज येणे, अशा समस्या निर्माण होतात. कोरड्या त्वचेमुळे शरीरावर खाज येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे कोरडी त्वचा हे देखील अंगावर खाज येण्याचे महत्त्वाचे कारण आहे.

शरीराला घाम येणे :-

अनेक वेळा वेगवेगळी काम करताना आपल्या शरीराला घाम निर्माण होतो. हा घाम जर पुसला नाही, तर आपल्याला त्या ठिकाणी अंगाला खाज येते आणि अतिप्रमाणात ती जागा खाजवल्यामुळे आपली त्वचा लाल होते. त्यामुळे शरीराला घाम येणे हे देखील अंगाला खाज येण्याचे मुख्य कारण आहे.

केमिकल्सचे साईड इफेक्ट:-

आपण आपल्या त्वचेसाठी वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करत असतो, पण बऱ्याच लोकांना या केमिकल्स साइड इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे केमिकलच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा अंगाला खाज निर्माण होऊ शकते आणि अशा समस्या होऊ शकतात.

अंगाला खाज येणे घरगुती उपाय :-

तुळशीचा लेप लावा :-

आपल्या आयुर्वेदानुसार तुळस ही वेगवेगळ्या समस्यांसाठी गुणकारी आहे. तुम्हाला जर शरीरावर खाज येत असेल, तुळशीचा नक्की वापर करा. दोन-तीन तुळशीचे पाने घेऊन ती पाने चोळा आणि त्याचा रस आणि चोळलेली पाने अंगाला ज्या ठिकाणी खाज येत असेल त्या ठिकाणी लावा. यामुळे तुम्हाला अंगाला खाज येणे या समस्येपासून सुटका होऊ शकते.

कोरफडाचे जेल वापरा :-

कोरफड हे सुद्धा अंगावर खाज येणे या समस्येवर गुणकारी ठरू शकते. कोरफडीचा ताजा जेल शरीरावर खाज येणाऱ्या ठिकाणी लावावा. कोरफड मध्ये असलेल्या नैसर्गिक गुणांमुळे अंगावर खाज येणे, या समस्यापासून तुम्हाला आराम मिळू शकतो.

कडूलिंब वापरून बघा :-

कडूलिंबाची पाने अनेक काळापासून वेगवेगळ्या समस्यांवर वापरली जात आहे. कडूलिंबाची पाने शरीरावर खाज येणे यावर उपयुक्त ठरू शकते. पाच-सहा कडुलिंबाची पाने आणि थोडेसे पाणी घेऊन कडुनिंबाची पेस्ट बनवून घ्या, ही पेस्ट दिवसातून दोन वेळा ज्या ठिकाणी खाज येत आहे त्या ठिकाणी लावावे. कडूलिंबा मध्ये असणाऱ्या  एंटीबॅक्टेरियल गुणांमुळे तुम्हाला फरक जाणवू शकतो.

नारळाचे तेल लावा :-

कोरडी त्वचेमुळे सुद्धा अंगावर खाज येते, नारळाचे तेल यावर उपयुक्त उपाय ठरू शकते. आंघोळ करून झाल्यावर अंग नीट कोरडे पुसून घ्या आणि नंतर ज्या ठिकाणी अंगावर खाज येत आहे, त्या ठिकाणी नारळाचे तेल लावा. नारळाचे तेल कोरडी त्वचा मुलायम व मऊ करण्यास मदत करते. त्यामुळे नारळाचे तेल लावल्यामुळे अंगावर खाज येणे ही समस्या दूर होऊ शकते.

मध लावून बघा :-

जर तुम्हाला अंगाला वारंवार खाज येत असेल या ठिकाणी मध लावा. दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने मध लावलेली जागा धुऊन घ्या. मधामध्ये असलेल्या वेगवेगळ्या गुणधर्मामुळे अंगावर खाज येणे या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले शरीरावर खाज येण्याची कारणे कोणती ? त्याचबरोबर त्याचा घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

Leave a comment