अघाडा ही वनस्पती सरड आणि ताठ वाढते. उंची साधारण ५० से. मी असते. याला अनेक फांद्या असतात. याची फुले लहान आणि खाली तोंड करून लटकलेली असतात. फांद्यांनाखाली वळलेले काटे असतात. या वनस्पतीच्या भस्मात पोत्याशियम जास्त प्रमाणात असते.
आघाडा चे औषधी गुणधर्म :
खेड्यांमध्ये आघाडा याची भाजी केली जाते. पाने चवहीन असून शिजल्यावर थोडी कडू लागतात. अनेक रोगांवर याचा उपयोग होतो.
- दमा चा उपचार : आयुर्वेदामध्ये दम्यासाठी याच्यापासून औषध तयार करण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे: अमावसेच्या रात्री याची पाने तोडावी कारण प्रकाशामुळे पानांमधील औषधी गुणधर्म नष्ट होतो. २५ ग्राम पाने आणि 2 ग्राम मिरी पाट्यावर वाटून घ्यावी. वाटण्याच्या आकाराच्या सहा गोळ्या करून त्या रात्री अंधारामध्ये वळवाव्या. मग कृष्ण पक्षातल्या नवमी पासून रोज रात्री एक गोळी याप्रमाणे प्रतीपदे पर्यंत घ्यावी.
- खोकला बरा करण्यासाठी : यावर या वनस्पती चे भस्म मधातून घ्यावे. किवा भस्माच्या वजनाच्या चार पट पाण्यात भस्म २४ तास भिजवून ठेवावे. ते पाणी उडून गेल्यावर खाली जे उरते त्याला आघाडा क्षार म्हणतात. हा क्षार दर वेळी 6-12 से. ग्राम घ्यावा. याने खोकला कमी होतो.
- प्लीहा विकार साठी उपाय : प्लीहा सुजली असेल तर या वनस्पती चे २५ ग्राम चूर्ण दिवसातून दोन वेळा दह्या सोबत घ्यावे. याने ३-४ आठवड्यात गुण येतो.
- क्वालरा ची लागवण: याच्या मुळ्याचे चूर्ण या रोगावर उपयोगी आहे. दर वेळी सहा ग्राम चूर्ण पाण्यासोबत गुण येई पर्यंत घ्यावे.
- पचन विकार ठीक करण्यासाठी : पानांचा रस पाचन विकारांवर गुणकारी आहे. याने अपचन आणि मुळव्याध यांना आळा बसतो. पानांचा काढा मधातून किवा उसाबरोबर घेतला तर जुलाब थांबतात.
- त्वचा रोग चा उपचार : चाकू ब्लेड ने झालेल्या जखमांवर पण लाऊन बँडेज करावे. याने एक दोन दिवसातच जखम बरी होते. याच्या भास्मापासून तयार केलेल्या मलामुळे व्रण भरून येतात. तसेच याने तामखीळ देखील बरा होतो.
- नेत्र विकार ठीक करण्यासाठी: याच्या मुळाचा रस लावल्याने नेत्रशोथ आणि काचबिंदू बरा होतो. तसेच सर्व प्रकार चे नेत्र रोग नाहीशे होतात.
- इतर उपयोग: याच्या बियांमुळे प्रसूती वेदना रहित आणि सुलभ होते. त्यासाठी बिया पाण्यातवाटून त्याचा लेप बेंबीवर लावावा. आणि थोडा योनी भोवती लावावा.
इसबगोल वनस्पती चे फायदे
अश्वगंधा चे फायदे मराठीत.
डॉक्टर पाटील यांनी आपले मराठी आयुर्वेद चे काही सोप्पे उपाय आपल्या साठी येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.
One response to “आघाडा वनस्पती चे घरगुती उपचार ऐकून होणार तुम्हीही चकित”
खूप छान उपयोगी माहिती.धन्यवाद
माटा भाजी |रानभाजी माटा विषयी माहिती जाणून घेण्यासाठी visit करा.