पोट साफ होण्यासाठी उपाय मराठी मध्ये

पोट साफ होण्यासाठी उपाय

पोट साफ होण्यासाठी उपाय
पोट साफ होण्यासाठी उपाय

पोट साफ न होण्याची लक्षणे :

सौचाला रोज न होणे व झाल्यास कडक होणे. पोट साफ न होणे. सौचसाठी खूप वेळ कुंठावे लागणे.

पोट साफ होण्यासाठी काय खावे :

तांदूळ, लाह्या, मूग, दुधी, घोसाळी, दोडका, पालक, आंबट चुका, दूध, ताक, तूप, द्राक्षे, अंजीर, खजूर, आवळा, गरम पाणी, इत्यादी पदार्थ खावे याने आपल्या पोटाला आराम मिळेल.

पोट खराब होण्यासाठी काय खाऊ नये :

हरबरा, मटार, चवळी, वाटाणा, पावटा, उडीद, बडीशेप, शेपू, शिंगाला, कॉफी, पोहे, शीतपेये इत्यादी पदार्थ खाऊ नये. याने पोट जड होते आणि मलावरोध चा त्रास होतो.

पोट साफ होण्यासाठी घरगुती उपचार :

  • रात्री झोपताना अर्धा चमचा ओवा चावून खाल्ल्यास शौचास साफ होतो.
  • मालावरोधाच्या तीव्रतेनुसार अर्धा ते एक चमचा एरंडेल रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याबरोबर प्यावे.

पोट साफ होण्यासाठी उपाय :

  • रात्री झोपताना कप भर पाण्यात एक ते दोन चमचे साजूक तूप व किंचित सैंधव टाकून प्यावे. याने मालावरोधाच्या त्रास कमी होईल.
  • रात्री झोपण्यापूर्वी पाण्यात भिजवलेल्या मनुका खाल्ल्यास मालावरोधाचा त्रास कमी होऊन पोट साफ होते.
  • ताज्या कोरफड चे पण मंद विस्तवावर किंचित शेकावे. नंतर त्याचे साल काढून त्यातील गर फडक्यात धरून घट्ट पिडावा. आणि चमचाभर रस मधात घालून प्यावा. असे काही दिवस केल्यास, पोट नेहमी साफ होते आणि मलावरोध होत नाही.
  • रोज सकाळी दोन खजूर साजूक तुपाबरोबर खाल्ल्यास शौचाला कडक होण्याची सवय मोडते.
  • शक्यतो गरम पाणी प्यावे. शिळे व कोरडे अन्न टाळावे. नियमित हलके जेवण करावे. जेवण वेळेवर करावे.
  • मालावरोधाच्या प्रवृत्ती असलेल्यांनी आमटी, भाजी वैगैरे करताना तूप वापरावे व फोडणीत लहसून वापरावा.
  • दुधी, घोसाळी, दोडक्याच्या नियमित वापर केल्यास मलाचा खडा होत नाही.

याशिवाय तुम्ही बाहेर बाजारात उपलब्ध असलेले पोट साफ होण्याचे औषधी गोळ्या व पावडर वापरू शकतात. संतुलन योगसारक, सॅन कुल, गंधर्व्हरीतकी इत्यादी औषधी चा वापर केल्यास मलाविरोधमध्ये निच्चीत फायदा होईल.

वाचा :

मूळव्याध घरगुती उपचार उपाय मराठी मध्ये
हिंदू स्त्रिया कपाळावर कुंकू किंवा टिकली का लावतात ?

2 thoughts on “पोट साफ होण्यासाठी उपाय मराठी मध्ये”

Leave a comment