हिंदू स्त्रिया कपाळावर कुंकू किंवा टिकली का लावतात ?

Must read
Dr. Patil
Dr. Patil
डॉक्टर पाटील यांनी आपले मराठी आयुर्वेद चे काही सोप्पे उपाय आपल्या साठी येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

हिंदू स्त्रिया कपाळावर कुंकू भांगामध्ये कुंकू का लावतात हिंदू स्त्रिया किवा बायका लग्नानंतर आपल्या कपाळावर लाल टिळा का लावतात,लग्न झालेली बाई आपल्या भांग मध्ये कुंकू का भरते असे खूप प्रश्न आज कालचा युवा पिढीला पडले आहेत.

कपाळावर कुंकू का लावतात ?

भांगामध्ये कुंकू
कपाळावर कुंकू

तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगू इच्छितो कि महिला आपल्या भांगा मध्ये कुंकू लावणे हे सुहासिन स्त्रीयानां सूचक आहे.

हिंदू धर्मा मध्ये केवळ विवाहीत स्त्रियाच केवळ कुंकू लावतात. कुमारिका किव्हा विधवा स्त्रियांना कुंकू लावणे वर्जित आहे.

कुंकू लावल्याने महिलांचा सौंदर्या मध्ये अजून भर पडते अर्थातच महिलांचे सौंदर्य कुंकू लावल्याने खुलून उठते.

विवाहाचा वेळेस वर वधूच्या म्हणजे नवरा मुलगा नवरी मुलीच्या मस्तकावर मंत्रोच्चारात पाच वेळा किवा सात वेळा कुंकू भरतो.त्यावेळेलाच विवाहकार्य संपन्न होते त्यादिवसापासून ती स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी दरदिवशी नियमित कुंकू लावते.

मस्तकावर चमकणारा दागिना म्हणून स्त्रियांचा कुंकू ला सौंदर्या चा प्रमुख अंग म्हणून ओळख आहे.

कपाळावर कुंकू लावण्याचे वैज्ञानिक कारण:

भांगामध्ये कुंकू लावणे हे केवळ रूढी परंपरा आहे कि त्या मागे काही वैज्ञानिक कारण आहे जानुया, ब्रम्हरंध आणि अध्मि नावाचे मर्मस्थान बरोबर वरच स्त्रियां कुंकू लावतात. त्यालाच सामान्य भाषे मध्ये भांग असे बोलतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांचा भांग ची जागा खूप कोमल असते.

कुंकू मध्ये पाण्यासारखा धातू अधिक प्रमाणात असल्याने कुंकू लावल्याने महिलांच्या शरीरात विद्युत उर्जा नियंत्रित करतो.

कपाळावर कुंकू लावण्याचे फायदे:

कुंकू लावतांना आपल्या भांगाच्या आज्ञाचक्र वर दाब दिला जातो त्यामुळे तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्‍याच्या स्नायूंना चांगला रक्तपुरवठा होतो.

हिंदू स्त्रियांसाठी सोळा श्रुंगार असून त्यामध्ये कुंकुवाचे स्थान खूप महत्वाचे आहे. लग्नाचा आधी मुली कुंकू लावतात किव्हा टिकली सौंदर्य वाढवण्यासाठी वापरतात परंतु लग्नानंतर कुंकू लावणे म्हणजे सौभाग्याची निशाणी असते.

योग विज्ञानाच्या दृष्टीने कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला गेलेला आहे. मुली कपाळावर ज्या ठिकाणी कुंकू लावतात  त्याठिकाणी आज्ञा चक्र असते. हे चक्र महिलांच्या मनाला नियंत्रित करत असते.

जेव्हा आपल्या आज्ञा चक्रावर दबाव पडतो तेव्हा मन एकाग्र केले जाते .आज्ञा चक्रावर स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे त्यांचे मन एकाग्र राहण्यास मदत होते.

त्यामुळे महिलांनी आपल्या कपाळावर किव्हा भांग मध्ये कुंकू लावायलाच हवा केवळ एक परंपरा म्हणून नाही तर त्याने आपल्याला आपले मन एकाग्र करण्यास पण फायदा होईल आणि कुंकू लावणे केवळ आपल्या भलाई साठीच लाभदायक आहे.

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest article