पोटातील जंत रोग घरगुती उपचार

पोटातील जंत

पोटातील जंत रोग घरगुती उपचार

दूषित अन्न किव्वा दूषित पाणी पिल्यामुळे पोटामध्ये जंत होतात आणि पोट दुखते. लहान मुलांना पोटामध्ये जंत चा त्रास जास्त प्रमाणात असतो.

पोटातील जंत लक्षणे:

खाल्लेले अंगी न लागणे, उलट्या होणे, चेवहऱ्यावर पांढरे डाग, गुदभागी कंड, मळमळणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

काय खावे:

शेवगा, तुर, कुळीथ, ताक, ओवा, दालचिनी, लसूण, मध, गोमूत्र, जुने तांदूळ, कढीपत्ता, इत्यादी पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करावे.

काय खाऊ नये:

उडीद, चवळी, वाल, मटार, अंडे, मांसाहार, सीताफळ, रताडे, तांबडा भोपड, अळू, बाहेरचे पाणी टाळावे.

पोटातील जंत घरगुती उपचार :

  • पाव चमचा ओवा, व पण चमचा वावडिंग एकत्र करून चावून खावे याप्रमाणे नियमित 2 महिने केल्यास जंत कमी होतात.
  • पोटातील जंत झाले असता आठवडाभर डाळिंबाच्या फळाच्या सालीचे पाव चमचा चूर्ण किव्वा  काढा घ्यावा. काढा करण्यासाठीअर्ध्या डाळिंबाचे साल चार कप पाण्यात चतुर्थाउंश उरे पर्यंत उकळावे, व गळून प्यावे.
  • रोज सकाळी पाव चमचा हळद, पाव चमचा वाववडिंग व अर्धा चमचा गुड एकत्र करून दोन महिने एकत्रित घेतल्यास पोटातील जंत नाहीसे होतील.
  • पाच चमचे गोमूत्र सात वेळा सुटी कपड्यात गाळून पाच चमचे पाणी मिसळून घ्यावे. याप्रमाणे महिना भर केल्यास जंत कमी होतात.
  • वारंवार जंत होण्याची सवय मोडण्यासाठी जेवणानंतर एक-दोन लवंग किव्वा दालचिनी चा छोटा तुकडा चघडल्यास जंत होत नाही.
  • लसणाची एक पाकळी तुपात तळून सकाळ संध्याकाळ महिनाभर घ्यावी.
  • रोज चार ते पाच कडीपत्याची ताजी पाने चावून खाल्ल्यास बारीक दोऱ्याप्रमाणे दिसणारे जंत मलावाटे पडून जातात.,
  • उकळलेले पांनी प्यावे, बाहेरचे पाणी टाळावे, व स्वच्छता पाळावी, दिवस झोपणे, वरचेवर व भूक लागली नसता  खाणे टाळावे.
  • जंत होण्याची सवय असल्यास पंधरा दिवसातून एकदा पोट साफ होण्याचे औषध घावे.
  • जंत होत असल्यास मेथी, कारलं, सिमला मिरची, या भाज्या नेहमी वापरात ठेवाव्यात याने पोटातील जंत होत नाही.
  • दुपारच्या जेवणानंतर एक वाटी टाकं अर्धा चमचा बडीशेप, एक चिमूट ओवा व हिंग टाकून घ्यावे.

डोके दुखी घरगुती उपचार मराठी मध्ये

ताप आल्यावर काय करावे

उल्टी vomating थांबवण्याचे घरगुती उपचार.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *