अंगावर भाजणे व जखमेवर घरगुती उपचार

जखमेवर घरगुती उपचार

अंगावर भाजणे व जखमेवर घरगुती उपचार

जखमेवर घरगुती उपचार
जखमेवर घरगुती उपचार

एखाद्या घटनेने जर शरीराचा एखादा भाग भाजल्यास खूप वेदना होतात. तसेस भयंकर आग होते. त्यासाठी घरगुती उपाय करून तुम्ही आग व वेदना कमी करू शकतात. डॉक्टरी उपचार करून देखील फायदा होत नासल्यास खाली दिलेले उपाय करावे.

अंगावर भाजणे साठी घरगुती उपचार:

  • भाजल्यानंत होणारी जळजळ कमी करण्यासाठी मेंदीची ताजी पाने वाटून भाजलेल्या जागी लेप करावा.
  • भाजलेल्या ठिकाणाचा डाग घालवण्यासाठी पाण्यात डिंक उगाळून लेप करावा. त्याने भाजलेला डाग निघून जाईल.
  • जर शरीर जास्त प्रमाणात भाजले असल्यास शक्य असेल तेवढ्या लवकर डॉक्टर कडे न्यावे.
  • भाजले असल्यास जास्त मसाले पदार्थ खाऊ नये.
  • जर शरीराचा एखादा भाग भाजलेला असेल तर त्या ठिकाणी जिरे तुपामध्ये वाटून लावावे.
  • भाजलेल्या ठिकाणी लगेच कोरफडीचा गर लावावा. याने जळजळ होत नाही तसेच फोड येत नाही आणि त्वचा आधी सारखी होते.
  • भाजलेल्या ठिकाणी जखम झाल्यास व जखमेतून पु येत असल्यास दुधाच्या साईत कात उगाळून लावावा. याने व्रण साफ होऊन जखम लवकर भरून येते.

याशिवाय बाजारातील सॅन हिल मलम, जात्यादी घृत इत्यादी औषधे वापरून जखमेवर उपचार करता येतो. भाजलेला भाग अंघोळ करताना ओला करू नये. याने जखम जास्त होते. आणि लवकर कोरडी होत नाही.

शरीरावर जखम होणे :

जखम झाली असल्यास घरगुती उपचार करून आपण ती बरी करू शकतो. जखम झाल्यास पुढील उपाय करावे.

जखमेवर घरगुती उपचार:

  • जखम झाल्यावर रक्त थांबण्यासाठी  हळदीचे चूर्ण जखमेवर लावावे. हळदीमध्ये तिखट किंवा मीठ मिसळलेले नसल्याची खात्री करावी.
  • जुने तूप जखमेवर लावल्यास न भरणारी जखम ही लगेच भरून येते.
  • बऱ्याच दिवसापासून न भरून आलेली जुनाट जखम त्रिफळाच्या काढयाने धुवावी व नंतर तूप व मध एकत्र करून जखमेत भरावे.
  • जुनाट बरी होत नासलेल्या जखमेवर धूप कापूस व वेखंडाचा धूप घ्यावा.
  • जास्त प्रमाणात भाजले असल्यास किंवा मोठी जखम होऊन खूप रक्त स्त्राव झाल्यास योग्य ते वैदकीय उपचार वेळेवर घेणे आवश्यक ठरते.

या व्यतिरिक्त सॅन हिल मलम, ऑईनमेंट इत्यादी बाजारात मोडणाऱ्या औषधींचा उपयोग करून जखम कोरडी किंवा बरी करू शकतात. जखम झाली असल्यास शक्य होईल तितके तिला पाण्यापासून दूर ठेवावे. जखमेला ओले होऊ देऊ नका. अश्याने जखम जास्त खराब होऊ शकते.

अपचन घरगुती उपाय मराठी मध्ये
हिंदू स्त्रिया कपाळावर कुंकू किंवा टिकली का लावतात ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *