श्वास घेताना त्रास होणे कारणे आणि उपाय जाणून घ्या

श्वास घेताना त्रास होणे कारणे आणि उपाय

श्वास हा आपल्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचा भाग आणि घटक आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात आपण या श्वासाचा वापर करत असतो अथवा श्वास घेत असतो. दोन मिनिटांसाठी जर आपला श्वास बंद झाला तर आपल्याला गुदमरल्यासारखे वाटते. त्यामुळे श्वास आपल्या शरीरास अत्यंत गरजेचा आहे. पण कधी कधी हा श्वास घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. पुरेशा श्वास आपल्याला घेता येत नाही किंवा श्वास घेताना आपल्याला त्रास निर्माण होतो अथवा जाणवतो. श्वास घेताना त्रास होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. हवामानात होणारे कोणतेही बदल किंवा अशी वेगवेगळी कारणे अशा समस्या निर्माण करतात त्यामुळे आपल्याला श्वास असताना त्रास जाणवतो.

अशा समस्यांवर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर त्वरित उपचार करणे गरजेचे असते. पण अशा काही घरगुती उपायांनी सुद्धा श्वास घेताना त्रास होणे अशा समस्या पासून तुम्हाला आराम मिळू शकतो.

श्वास घेताना त्रास होण्याची कारणे :-

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत श्वास असताना त्रास होण्याची कोण कोणती कारणे आहेत ? आणि त्याचबरोबर त्यावर घरगुती व प्रभावशाली उपाय कोणकोणते करता येतात? चला तर मग बघुया !

१. हवामानात होणारे बदल :-

अनेक वेळा वातावरणात हवामानात वेगवेगळे बदल होत असतात. या होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांमुळे सुद्धा श्वास असताना त्रास होणे अशा समस्या आपल्याला उद्भवू शकतात. हवामानात बदल झाल्यामुळे हवामानाचे प्रदुषणाचे कण किंवा धुळीचे कण हवेत निर्माण होतात. ह्या कारणांमुळे आपल्याला श्वास घेताना त्रास होणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे हवामानात होणारे बदल हे एक महत्त्वाचे कारण आहे.

२. दम्याचा आजार असणे :-

श्वास घेताना त्रास होणे याचे अजून एक महत्त्वाचे कारण असते ते म्हणजे दम्याचा आजार असणे. काही लोकांना दम्याचा आजार असतो. या दम्याच्या आजारामुळे कधीकधी आपल्याला पुरेशा श्वास घेता येत नाही किंवा आपल्याला धाप लागते अशा समस्यांमुळे सुद्धा आपल्याला श्वास घेताना त्रास होणे किंवा पुरेशा श्वास न मिळणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दम्याचा आजार असणे हे देखील श्वास असताना त्रास होणे याचे एक महत्त्वाचे कारण आहे.

३. सर्दी असणे :-

तापमानात होणारे बदल यामुळे किंवा प्रदूषणाच्या काणामुळे अथवा हिवाळा हा ऋतू मुळे आपल्याला सतत सर्दी होत असते. ही वारंवार होणारी सर्दी देखील या समस्येचे एक महत्त्वाचे कारण आहे. सर्दी मुळे आपले नाक बंद होते आणि आपल्याला श्वास घेता येत नाही अथवा श्वास घ्यायला अतिप्रमाणात त्रास होतो. त्यामुळे सर्दी हे एक महत्त्वाचे कारण आहे. श्वास असताना त्रास होणे या समस्या निर्माण करण्यासाठी आहे.

श्वास घेताना त्रास होऊ नये यासाठी घरगुती उपाय :-

तर मित्रांनो वरील भागात आपण बघितले श्वास असताना त्रास होण्याची कोणकोणती कारणे आहेत? आता आपण बघणार आहोत श्वास असताना त्रास होत असेल तर कोण कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो?

● ओव्याचे सेवन करावे :-

जर तुम्हाला श्वास घेताना त्रास होत असेल किंवा त्रास निर्माण होत असेल तर तुम्ही हा उपाय करून बघावा. रोज सकाळी उठल्यावर ओवा थोडासा गरम करून घेऊन उपाशीपोटी त्या ओव्याचे सेवन करावे. कमीत कमी दोन चमचे ओव्याचे सेवन करावे आणि नंतर त्यावर थोडेसे कोमट गरम पाणी प्यावे. ओवा हा वेगवेगळ्या समस्यांवर उपाय म्हणून अत्यंत गुणकारी आहे. असे दहा ते पंधरा दिवस केल्यामुळे श्वास घ्यायला जो तुम्हाला त्रास होत असेल तो त्रास कमी होण्यास तुम्हाला मदत मिळू शकते.

● तुळशीचा काढा प्यावा :-

आपल्या आयुर्वेदानुसार तुळशी वेगवेगळ्या समस्या अत्यंत गुणकारी व उपयुक्त अशी एक वनस्पती आहे असे सांगितले आहे. तुळशी वेगवेगळ्या समस्यांवर अत्यंत उपयुक्त उपाय करते. त्यामुळे कोणतीही समस्या पासून आपल्याला लवकर आराम मिळण्यासाठी तुळशीचा वापर केला जातो. जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तुम्ही तुळशीचा काढा प्यावा. पाच ते सहा तुळशीचे पाने घेऊन ती पाने गरम पाण्यामध्ये चांगली उकळून घ्यावी नंतर ते पाणी काढुन घेऊन या काढाचे दिवसातून दोन वेळा सेवन करावे. असे दहा ते पंधरा दिवस असल्यामुळे तुम्हाला श्वास असताना त्रास होणे अशा समस्या पासून आराम मिळण्यास मदत होऊ शकते.

● गरम पाणी प्यावे :-

जर तुम्हाला श्वास असताना त्रास होत असेल तर तुम्ही गरम पाण्याचे सेवन करावे. गरम पाण्याच्या सेवन केल्यामुळे आपल्याला नसा मोकळ्या होण्यासाठी मदत मिळते. त्याच बरोबर सर्दी सारख्या समस्या आपल्याला उद्भवत नाही आणि आपल्याला श्वास घेत असताना त्रास होणे, अशा समस्या पासून आराम मिळण्यास मदत मिळू शकते.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले श्वास असताना त्रास होण्याची कारणे कोणती ? त्याचबरोबर त्याचा घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *