मासिक पाळी कशी येते ? मासिक पाळी बद्दल संपूर्ण माहिती

Menstrual Cycle

नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे कसे करावे मध्ये स्वागत आहे. आम्ही आपल्याला मासिक पाळी बद्दल माहिती देणार आहोत.

भारतामध्ये पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असल्याकारणामुळे महिलांच्या मासिक पाळी याविषयी अनेक गैरसमज समाजात वावरत आहेत. काही ठिकाणी मासिक पाळी यावेळी महिला ही विटाळ समजली जाते आणि आजच्या एकविसाव्या शतकातही मासिक पाळीच्या वेळेस महिलेला बराच कार्यक्रमापासून दूर रहावे लागते. त्यामुळे अनेकदा स्त्रियांना सार्वजनिक कामांमुळे किंवा धार्मिक कार्यामध्ये अडथळा येऊ नये यासाठी तिला तिचे मासिक पाळी चे नियोजन करावे लागते.

मासिक पाळी चे नियोजन करण्यासाठी महिलांना काही वेळा वेळेच्या आधी मासिक पाळी हवी असते तर काहीवेळा मासिक पाळी पुढे करावीशी वाटते.

खूप साऱ्या महिला मासिक पाळी लवकर येण्याची गोळी खातात किंवा मासिक पाळी पुढे करण्यासाठी गोळी खातात. काही वेळा फिटनेस कमी असल्यामुळे काही महिलांना चक्कर येऊ लागतात आणि तब्येत खराब होऊन जाते.

मासिक पाळी म्हणजे काय असते ?

मुलगी वयात आल्यावर दर महिन्याला तिच्या योनी मधून साधारण तीन ते पाच दिवस रक्त वाहत असते आणि या रक्त वाहण्याच्या क्रियेला मासिक धर्म म्हणजे मासिक पाळी म्हटले जाते. महिलांच्या स्त्रीबिजांचा पुरुषबीजाशी संबंध आल्यामुळे ते निरुपयोगी होतात आणि ते बीज महिलांच्या शरीरातून बाहेर निघण्यासाठी रक्तप्रवाहाचा सहारा घेतात त्यालाच मासिक पाळी असे बोलले जाते.

महिलांच्या मासिक पाळीच्या वेळेस त्यांच्या शरीरातील अशुद्ध रक्त बाहेर निघते. साधारणतः महिलेची मासिक पाळीचे चक्र 28 ते 35 दिवसांचे असते.

महिलेची मासिक पाळी चुकल्या मुळे काय होते ?

मासिक पाळी चुकल्या मुळेकाही वेळा पुरुषासोबत सेक्स क्रिया केल्यावर महिलांना वेळेवर मासिक पाळी येत नाही किंवा मासिक पाळी येतच नाही याचे प्रमुख कारण असते महिला प्रेग्नेंट झाल्यामुळे असे होते. जर महिलेची मासिक पाळी सेक्स केल्यावर वेळेवर नाही आली तर तिला दिवस जाण्याची संभावना अधिक असते. पण काही वेळा थायरॉईड किंवा मानसिक तणाव आल्यामुळे सुद्धा मासिक पाळीच्या वेळेस बदल होतो.

मुलींना मासिक पाळी कधी येऊ लागते ?

प्रत्येक मुलीला दर 27 ते 30 दिवसानंतर मासिक पाळी येते आणि मासिक पाळी येण्याची चक्र वयाच्या 12 व्या वर्षापासून साधारणतः सुरू होते.

महिलांना मासिक पाळी कधी पर्यंत येते ?

जसे की तुम्हाला माहिती आहे वयाच्या बाराव्या वर्षापासून मुलींना मासिक पाळी येण्या सुरुवात होते आणि साधारणतः 45 ते 50 वर्षापर्यंत महिलांना मासिक पाळी येत असते.

मासिक पाळीच्या वेळेस पुरुषांनी महिलांसाठी काय करायला हवे ?

पुरुष प्रधान देश असल्यामुळे प्रत्येक पतीला आपल्या पत्नीच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवे आणि तिच्या मासिक पाळीच्या वेळेस तिची काळजी घ्यायला हवी. महिलांच्या मासिक पाळीमुळे त्यांना थकवा येतो आणि अंग दुखू लागते अशा वेळेस पुरुषांनी आपल्या पत्नीला तिच्या कामामध्ये मदत केल्यामुळे त्यांची थोडीफार मदत होऊन जाते. जर आपण महिलांसाठी थोडाफार हातभार लावू शकतो तर त्या पण समाजामध्ये उच्च स्थानावर पोहोचू शकतात, धन्यवाद.

बघा –

बाबा रामदेव चे घरगुती उपचार


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *