जेवताना का बोलू नये ? यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का ? 

जेवताना का बोलू नये

अगं बाई तू खाण्याकडे लक्ष दे,शांत बस जेवण करताना बोलू नको, असे आपण मुलांना बोलू नये असे अनेक जण सांगत राहतात, तसेच पूर्वीचे लोकही सांगायचे की जेवताना बोलायचं नाही. पण यामागे काय कारण असेल बरं ,असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात , तर काहीना जणांना तर या मागील शास्त्रीय कारण ही माहीत नसते ,का जेवतांना बोलणे एवढे बंधनकारक असेल बरं, मुलांना त्या मागचं कारण काय आहे ,कसं सांगावं चला तर मग जाणून घेऊया की जेवताना का बोलू नये ?

चला तर मग जाणून घेऊया,

जेवताना का बोलू नये? 

आपण जर जेवताना बोललो ,तर एखादा अन्नाचा कण आपल्या श्वासनलिकेत जाऊन आपल्याला तीव्र प्रकारचा ठसका जातो, खोकला येतो, त्याने आपल्या डोळ्यातून नाकातून पाणी येते, किती वेळ आपल्याला उमजत नाही ,किती वेळ आपल्या घशाला तिखट तिखट लागते आणि आपल्याला श्वास घेण्यास त्रास होतो, हे कसं होत असेल बरं मग ऐका आपल्या घशात दोन प्रकारच्या नलिका असतात, एक अन्ननलिका असते, तर दुसरी श्वासनलिका असते ,आपण जे जेवण करतो , अन्ननालिके मार्फत उदरा पर्यंत जाते ,तर दुसरी श्वासनलिका फुफ्फुसां  पर्यंत असते, त्या नलिकेतून आपण श्वास घेतो, आपण जर जेवताना बोललो तर जेवणाचा एखादा अन्नाचा कण श्‍वासनलिकेत गेला, तर आपल्याला श्वासनाचा त्रास होऊन मृत्यूला सुद्धा सामोरे जाऊ लागू शकते,  हेच आपण शास्त्रीय कारण जाणून घेतले की जेवताना का बोलू नये.

पूर्वीचे लोक असे का म्हणायचे? 

जेवताना बोलू नको असे पूर्वीचे लोक नेहमी म्हणायचे त्याच्या मागचं कारण ही आहे,की त्यांच्या म्हणण्यानुसार अन्न हे परब्रह्म असते, आपण जर जेवताना बोललो ,तर त्या परब्रह्माच्या आपण अपमान करतो असं आहे .

जेवण करताना कशाप्रकारे जेवावे ?

आपण जेवताना बोलायचं नाही, जेवण नीट चावून खायचं ,आपले अन्न लाळेमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होते व आपल्याला अन्न पचायला पचायला सोपे जाते. पण तेही अगदी खर आहे, आपण आपले  शरीर एकदम छान करायला हवे, निरोगी करायला पाहिजे,  जेवताना म्हणून मन लावून एकाग्र शांत चित्ताने जेवावे, चिडचिड करून जेऊ नये ,जेवण झाल्यावर पानाला व ताटाला नमस्कार करावा ही कृतज्ञता आपण देवाला आणि जो बळीराजा शेतकरी राजा आपल्यासाठी शेतीत पीक पेरतो त्याला आहे ,तसेच जेवताना ताट जास्ती वेळ पडू देऊ नये अन्यथा त्याचाअपमान केल्यासारखं होतात जेवण करतांना ताटाच्या पाया पडून जेवायला सुरुवात करावी, जेवताना चांगले मधुर संगीत एकूण जेवण मन एकाग्र चित्ताने करावे.

जेवण झाल्यावर लगेच पाणी का पिऊ नये? 

जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये थोड्यावेळाने प्यावे त्यामागे पण कारण आहे,  जेवणानंतर आपण किमान अर्ध्या तासाने पाणी प्यायला हवे कारण ज्या वेळी आपण जे जेवतो ते, अन्न आपल्या जठरात जाऊन आपली पचनक्रिया चालू होते ,आपला जठराग्नी एक तासापर्यंत प्रबळ राहतो, जर तुम्ही जेवणानंतर लगेच पाणी पिले तर आपल्या जवळ जठराग्नी ची क्रिया बंद पडते व त्यामुळे आपल्या जठराग्नीला अन्न पचवण्याची चे काम करण्यास अडचण निर्माण होते ,आपण जर जेवणानंतर लगेच पाणी पिले तर त्याचा परिणाम आपल्या पचनक्रियेवर पडतो.  आपण जेवणानंतर लगेच पाणी पिल्यामुळे आपल्याला अन्न नीट पचन होत नाही गॅस चे प्रॉब्लेम होतात.

आज आम्ही तुम्हाला जेवण करताना का बोलू नये ? कशाप्रकारे जेवावे ,पूर्वीचे लोक काय म्हणायचे, यामागील तुम्हाला थोडीफार माहिती सांगितली आहे, तसेच तुम्हाला अजून काही शंका कुशंका असतील ,तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात.

धन्यवाद

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *