जेवताना ठसका का लागतो कारणे आणि उपाय जाणून घ्या

जेवताना ठसका का लागतो कारणे आणि उपाय

अनेकदा बरेच लोक जेवण करताना वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतात. ही चर्चा करत असताना त्यांना मध्येच जेवताना ठसका लागतो आणि त्यावर ते लगेच पाणी पितात. जेवताना ठसका लागण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात.

जेवण करताना घास जर आपल्या श्वासनलिकेत गेला तर आपल्याला जेवत असताना ठसका लागतो. काही लोकांना जेवत असताना ठसका लागला की कधी कधी दम सुद्धा लागतो. ठसका लागणे म्हणजेच पटापट जेवण करत असताना दुसऱ्याशी बोलत आपला घास आपल्या श्वासनलिकेत जातो. त्यामुळे आपल्याला ठसका लागतो आणि पुरेशा श्वास त्यावेळी साठी घेता येत नाही.

बऱ्याच वेळा जेवताना ठसका लागणे किंवा दम लागणे अशी समस्या वृद्ध लोकांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते जेवताना त्यांना ठसका आल्यामुळे श्वास घ्यायला सुद्धा त्यांना वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात.

काही लोकांना जेवताना सतत ठसका लागतो. या समस्येवर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर वेळीच उपचार किंवा उपाय करणे गरजेचे आहे. पण घरातल्या काही घरगुती उपायांनी सुद्धा तुम्हाला आलेला ठसका जाण्यास मदत मिळू शकते.

जेवताना ठसका लागण्याची कारणे :-

तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत जेवत असताना ठसका लागण्याची कारणे कोणती आहेत? आणि त्याचबरोबर त्यावर घरगुती उपाय करता येऊ शकतात? चला तर मग बघूया!

१. दम्याचा आजार असणे :-

जर तुम्हाला दम्याचा आजार असेल तर तुम्हाला जेवत असताना ठसका लागण्याची शक्यता अधिक प्रमाणात आहे. दम्याचा आजार असल्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला खूपच अडचणी होतात आणि पुरेशा श्वास घेता येत नाही. त्याचबरोबर श्वास घेण्याचा प्रयत्न करताना जेवण आपल्या श्वसनलिकेत जातं आणि त्यामुळे आपल्या ठसका लागणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दम्याचा आजार असणे हे जेवत असताना ठसका याचे एक महत्त्वाचे कारण आहे.

२. हवामानात होणारे बदल :-

अनेक लोकांच्या शरीरास हवामान झालेले कोणतेही बदल त्यांच्या शरीराला सहन होत नाही आणि त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. जेवताना अचानक ठसका लागणे याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हवामानात झालेले बदल. हवामानात असणारे प्रदूषणाचे कण अथवा धुळीचे कण आपल्या श्वासनलिकेत जातात. त्यामुळे आपल्याला जेवत असताना ठसका लागणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हवामानात होणारे बदल सुद्धा जेवताना अचानक ठसका लागणे याचे एक कारण आहे.

३. सर्दीची समस्या असणे :-

हिवाळ्याच्या ऋतूंमध्ये अनेक जणांना सर्दी असते. पण बऱ्याच लोकांना बाराही महिने सतत सर्दीची समस्या असते. ज्यांना वारंवार सर्दीची समस्या असते त्यांना जेवताना ठसका लागणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कारण सर्दी मुळे आपले नाक बंद होते व आपल्याला श्वास घेण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आपण तोंडाने श्वास घेण्यास सुरुवात करतो. हा तोंडाने श्वास घेत असताना जेवणाचा कण आपल्या श्वासनलिकेत जातो. त्यामुळे आपल्याला जेवत असताना ठसका लागणे अशा समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला वारंवार सर्दी असेल तर तुम्हाला जेवताना ठसका लागण्याची शक्यता अधिक आहे.

जेवताना ठसका लागू नये यासाठी घरगुती उपाय :-

तर मित्रांनो वरील भागात आपण बघितले जेवत असताना ठसका लागण्याची कारणे कोणकोणते आहेत?आता आपण बघणार आहोत ज्योती ठसका लागू नये यासाठी कोणकोणते घरगुती उपाय आपण करू शकतो?

● गरम पाण्याचे सेवन करावे :-

जर तुम्हाला जेवत असताना ठसका लागणे अशा समस्या वारंवार होत असेल तर तुम्ही गरम पाण्याचे सेवन करावे. गरम पाण्यामुळे आपल्या श्वासनलिका मोकळा होण्यास आपल्याला मदत मिळते. त्याचबरोबर जेवणाचा कोणताही अडकलेला कण बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे जेवताना गरम पाण्याचे सेवन करावे. ज्यामुळे तुम्हाला ठसका येणार नाही किंवा अशा समस्या उद्भवणार नाही.

● ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे :-

जर तुम्हाला जेवताना वारंवार ठसका लागत असेल तर हा उपाय करून बघा. जेवत असताना ठसका येऊ नये यासाठी जेवणाच्या किंवा जेवणापूर्वी अर्धा तास आधी थोड्याशा गरम पाण्यामध्ये ओवा चांगला उकळून घ्यावा आणि याचे कोमट पाणी जेवणाच्या अर्धा तास आधी प्यावे. ज्यामुळे जेवत असताना ठसका लागणे अशा समस्या तुम्हाला निर्माण होणार नाही आणि जेवत असताना ठसका लागणे या समस्या सुद्धा आराम मिळू शकतो.

● तुळशीच्या काढा द्यावा :-

जेवताना जर तुम्हाला ठसका लागत असेल तर तुम्ही तुळशीचा काढा घ्यावा. ओवाचे पाणी जर तुम्हाला आवडत नसेल तर हा उपाय करू शकतात. तुळशीची पाच-सहा पाने घेऊन ते गरम पाण्यात चांगली उकळून घ्यावी आणि जेवणापूर्वी एक ते दीड तास आधी ह्या काढायचे सेवन करावे. असे दहा ते पंधरा दिवस केल्यामुळे जेवत असताना ठसका लागणे या समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकतो.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले जेवण करताना ठसका लागण्याची कारणे कोणती? त्याचबरोबर त्याचा घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *