ज्येष्ठमध पावडर चे फायदे नक्की कोणते कोणते? चला तर मग जाणून घेऊया घेऊया ! 

ज्येष्ठमध पावडर चे फायदे

घरोघरी मसाल्यांमध्ये जेष्ठमधाचा वापर हा होतो,  तसेच जेष्ठमधाचा वापर हा आपल्या आरोग्यासाठीही होतो. ज्येष्ठमधाची चवही गोडसर असते, तसेच ज्येष्ठमधाच्या सेवनाने आपला आवाज हा चांगला होतो. ज्येष्ठमध आपल्या शरीरासाठी फार आरोग्यदायी असते. ज्येष्ठमध हे  झाडाचे मूळ असून  त्याची पावडर बनवून आपण उपयोग करतो, तसेच ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असते, जेष्ठमध मध्ये कॅल्शियम, अँटिबायोटिक्स, प्रथिने, ऑंटीएक्सीडेंट असतात. ज्येष्ठमध हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतो, तसेच जेष्ठमध+ बडीशोप याचें चूर्ण एकत्र करून जर आपण खाल्ले, तर आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी ते फार फायदेशीर असते. संगीतकार त्यांच्या रोजच्या आहारात ज्येष्ठमधाचा वापर हा करतात. कारण जेष्ठमधने कंठ हा सुधारतो. तसेच जुना सर्दी-खोकला दमा यावर जेष्ठमध फार प्रभावी आहे, ज्येष्ठमधाचा वापर केल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते. तसेच जेष्ठमधाचा वापर टुथपेस्ट, दात दुखीसाठी आवर्जून होतो. शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर तेही भरून काढण्याचे काम ज्येष्ठमधाचा करते.

ज्येष्ठमध पावडर चा वापर केल्याने होणारे फायदे :

चला, तर जाणून घेऊया की जेष्ठमधाचा वापर आपण आपल्या आरोग्यासाठी कसा करू शकतो ?

सर्दी खोकल्यावर आराम मिळतो :

ज्येष्ठमधला मराठी आयुर्वेदिक भाषांमध्ये मुलेठी असे म्हणतात. ज्येष्ठमधाच्या वापराने तुमचा जुनाट सर्दी-खोकला यावर आराम मिळतो. अनेक उपाययोजना करूनही ज्यांना आराम मिळत नसेल तर त्यांनी जेष्ठमधाचा वापर करावा. त्यांनी त्यांच्या तोंडात ज्येष्ठमधाची काडी जास्तीत जास्त वेळ चघळत रहावी, त्याने खोकल्यावर आराम मिळतो. तसेच त्यांनी ज्येष्ठमधाची पावडर + मध + सुंठ पावडर घालून त्याचे चाटण करावे, त्याने त्वरित खोकल्यावर आराम मिळतो. तसेच तुम्ही ज्येष्ठमधाचा काढा करून, तो तुम्ही सकाळ-संध्याकाळ घेतल्याने हे तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

घसा खवखव असेल आवाज घोगरा होत असेल तर याचा वापर करून बघा :

हो , बरेचदा वातावरणातील बदलामुळे, तसेच कुठलेही पाणी पिल्यामुळे घसा बसणे, आवाज घोगरा होणे, अशा समस्या होतात. तसेच त्यांचा घसा एवढा दुखतो की, आवाज व्यवस्थित निघत नाही, घशात इन्फेक्शन होते. त्यावर आयुर्वेदिक उपाय म्हणून जेष्ठमधाचा वापर करतात. तुम्ही जर ज्येष्ठमधाची काडी चघळत राहिल्यास,  तुमचा आवाज हा सुरमयी होईल व घसा खवखवणे ची समस्याही कमी होईल. त्यांच्या घशातील इन्फेक्शन  दूर होण्यास मदत मिळेल.

पोटदुखी च्या समस्यांवर आराम मिळेल :

अवेळी खानपान, तसेच खाल्ल्यामुळे अनेक जणांना अपचनाचा त्रास होतो. त्यामुळे त्यांचे पोट दुखते, पोट फुगते, त्यावर रामबाण उपाय आहे त्यासाठी तुम्ही जेष्ठमध लिंबूचा रस मिक्स करून दिवसातून तीन ते चार वेळेस घ्या, त्याने तुमची पोट दुखी व पोटफुगीवर वर आराम मिळेल.

ॲनिमियाचा त्रास वर आराम मिळेल :

शरीरातील रक्तातील कमतरतेमुळे ॲनिमियाचा त्रास संभवतो, खास करून महिलांना हा त्रास जास्त प्रमाणात होतो. मासिक पाळी दरम्यान अति रक्तस्राव झाल्यामुळे, महिलांना, ॲनिमिया च्या  त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते, त्यासाठी जेष्ठमध हे फार फायदेशीर आहे. ज्येष्ठमध हे रक्त वाढण्यासाठी फार फायदेशीर असते. त्यासाठी तुम्ही ज्येष्ठमधाचे चूर्ण+मधा सोबत करून घ्या, तुम्ही ते सकाळ-संध्याकाळ घेतल्याने तुम्हाला ॲनिमिया च्या त्रासावर आराम मिळेल.

युरिन इन्फेक्शन वर त्वरित आराम मिळेल :

ज्येष्ठमध हे थंड वनस्पती आहे, ज्या लोकांना उष्णतेचा त्रास होतो, तसेच युरिन इन्फेक्शन, तसेच लघवीला जळजळ होत असेल, त्यांनी ज्येष्ठमधाचे चूर्ण एक ग्लास पाण्यासोबत किंवा दुधासोबत नियमित सेवन केल्यास, त्यांना लघवीची जळजळ, आग कमी होण्यास मदत मिळेल. तसेच तुम्ही जेष्ठमध हळद एकत्र करून केल्याने तुम्हाला यूरिन रिटेंनशन पासूनही आराम मिळेल.

ज्येष्ठमधाचा चा वापर अशक्तपणा वर फार फायदेशीर असतो :

आजारी पडल्यामुळे अनेक जणांना अशक्तपणा येतो, तसेच कोणत्याही कामात मन न रमणे, निरुत्साही वाटणे, त्यावेळी तुम्ही जेष्ठमधाचा वापर करायला हवा. त्यासाठी तुम्ही ज्येष्ठ मध एक चमचा+ त्यात मध एक चमचा तूप याचे सेवन केल्याने आठ ते दहा आठवड्यांमध्ये तुम्हाला एकदम तंदुरुस्त आणि ताकद येईल, हे चूर्ण नियमित करायला हवे.

डोकेदुखी वर आराम मिळेल :

जर तुम्हाला अर्धशिशी तसेच डोकेदुखीचा त्रास होत असेल, अशा वेळी ज्येष्ठमध फार चांगले औषध आहे, त्यासाठी तुम्ही ज्येष्ठमधाचे चूर्ण त्यात थोडे मोहरीचे तेल व त्यात थोडंसं कलिहारी चूर्ण मिक्स करून त्याचा वास घ्या. तसेच  त्याचा लेप तुम्ही कपाळावर लावू शकतात. तुम्हाला डोकदुखी पासून थोडा आराम मिळेल.

ज्येष्ठमध ने तुमचे सौंदर्य फुलते :

हो , आता हे काय नवीन जेष्ठमध आपले सौंदर्य कसे वाढेल? बरेच वेळा अनेक लोकांच्या चेहऱ्यावर प्रदूषणामुळे तसेच वेळी खाणे ,अपचन, पित्त तेलकट खाल्याने यामुळे डाग धब्बे येतात. त्यावेळी तुम्ही ज्येष्ठमधाचा लेप करून तुमच्या चेहऱ्यावर डाग असलेल्या ठिकाणी लावल्यास, ते लवकर कमी होण्यास मदत मिळते. तसेच तुमचा चेहरा चमकदार आणि तेजस्वी होतो, आणि उजळण्यास मदत मिळते. त्यामुळे उटणे तयार करताना जेष्ठमधाचा वापर केला जातो.

चला, तर आज आम्ही जेष्ठमधाचा वापर कशा कशा प्रकारे करता येतो, काही घरगुती उपाय सांगितलेले आहे. पण जर कोणाला जेष्ठमध यापासून काही ऍलर्जी असेल, तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.  तसेच आम्ही सांगितलेल्या या घरगुती उपायांमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरुर कळवा.

धन्यवाद


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *