अंजीर खाण्याचे फायदे नक्की कोणकोणते आहेत ? चला तर मग जाणून घेऊया !

अंजीर हे एक फळ आहे. तसेच ते फळ सुकल्यावर ड्रायफ्रूट मध्ये त्याचा समावेश होतो. अंजीर चा रंग हा सोनेरी किंवा गडद बदामी असतो. पण काही लोकांना अंजीर खाण्याचे फायदे हे माहीत नसतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला अंजीर खाण्याचे फायदे सांगणार आहोत. तुम्ही जर अंजीर खाल्ले तर तुमच्या शरीराला त्यापासून अधिक फायदा होईल. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांनी अंजीर जरूर खा.

तसेच सर्दी खोकला या आजारात तुम्ही अंजीर पाण्यात उकळून ते गरम पाणी पिऊ शकतात, त्यावर तुम्हाला फायदा होईल, अंजीर खूप लाभकारी आहे.

अंजीर खाण्याचे फायदे : Fig Benefits in Marathi

अंजीर मध्ये ए, बी, सी, डी विटामिन भरपूर प्रमाणात आहे. तसेच प्रोटिन्स, सॅच्युरेटेड फॅट्स या गुणांनी हा भरलेला आहे. म्हणून अंजीर सगळ्यांनी खाल्ले, तर त्यांचे आरोग्य एकदम निरोगी राहील. तसेच अंजीर मध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात असते. त्यामुळे आपल्या उच्च दाबाच्या समस्यांपासून आपण वाचतो.

अंजीर मध्ये मधुमेह, दमा, सर्दी-जुकाम सारख्या व्याधींपासून आपल्याला खूप लाभ मिळतो. तसेच अंजीर खाल्ल्याने पोटातील वातही कमी होतो. अंजीर खाल्ल्याने आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात लोह सुद्धा मिळते अजून काय काय फायदे आहेत.

चला, तर मग जाणून घेऊया के अंजीर पासून होणारे फायदे कोणकोणते ?

अंजीर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतो :

काही लोकं सारखे सारखे आजारी पडतात. पण ते कशामुळे आजारी पडतात, कधी कधी त्यांना अगदी थकल्यासारखे ही वाटते का वाटते? कारण त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, मग त्यासाठी तुम्ही काय करायला हवे, त्यासाठी तुम्ही रात्री पाण्यात भिजवलेले अंजीर सकाळी उठून खायला हवे. कारण अंजीर मध्ये विटामिन बी, सी, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. त्याच्या ने आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास आपल्याला मदत होते. अंजीर हे तुम्हाला कोठेही मिळेल. तसेच अंजिर मधील अँटी-ॲक्सिडेंट हे रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत करते. अंजीर जर तुम्ही नियमित सेवन केले, तर तुम्ही आजारांपासून दूर राहणार.

अंजीर मुळे आपली पचनसंस्था व्यवस्थित राहते :

अवेळी खानपान मुळे, अनेक जणांना अपचन सारखे समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच त्यांचे पोटही फुटते, पोट दुखते, त्यावर अंजीर फार रामबाण उपाय आहे. पूर्वीचे लोक असेच म्हणून अंजीर खात नव्हते, तर त्यांना त्यामागील कारणे माहीत होते. अंजीर मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे तो आपले पोटातील आतील घाण बाहेर टाकण्यास अर्थळा येऊ देत नाही. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, त्यांनी अंजीर जरूर आहारात घ्या. अंजीर आपली पचनसंस्था सुरळीत ठेवून आपले आरोग्य सुधारते.

मधुमेहावर अंजीर नियंत्रण ठेवतो :

आता तुम्ही म्हणाल, अंजीर तर गोड असते मग ते कसे काय मधुमेहावर नियंत्रण ठेवेल, तर अंजीर हे नैसर्गिक गोड असल्यामुळे त्याचा गोडवा आपल्या शरीराला बाधत नाही. तसेच अंजीर मधील पोटॅशियम घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतात. त्यामुळे मधुमेही लोक अंजीर खाऊ शकतात. आपल्या शरीराला साखरेची सुद्धा आवश्यकता असते, जर आपल्या शरीरातील साखर कमी झाली, तर आपल्याला अशक्तपणा सारखे वाटते. मग काही खावंसं वाटत नाही. तसेच ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी जर अंजीर खाल्ले तर त्यांच्या शरीरातील इन्सुलिनचे कार्यही सुरळीत चालते. अंजीर हा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो

तरी तुम्हाला काही शंका असेल, तर तुम्ही योग्य डॉक्टरांच्या सल्ल्या घेऊन खाऊ शकतात.

अंजीर खाल्ल्याने मूळव्याधाचा त्रास कमी होतो :

हो, खरंच अंजीर खाल्ल्याने तुम्हाला मुळव्याध चा त्रास कमी होईल. कारण अंजीर कोणत्याही प्रकारचे त्वचाविकारांवर उत्तम कार्य करतो. अंजीर हे मुळव्याध वर एका औषधाप्रमाणे कार्य करतो. तुम्ही रात्री पाण्यात किंवा दुधात भिजवून ते अंजीर जर सकाळी उठून उपाशीपोटी खाऊन त्यावर पाणी पिले तर थोड्या वेळाने तुम्हाला शौचास साफ होईल. त्यामुळे तुमच्या गुदद्वारावरची आग होणार नाही, हा प्रयोग जर तुम्ही सलग एक ते दीड महिना केला, तर तुमचा मुळव्याध आजार सुद्धा आटोक्यात येईल, खरच करून बघा.

आपल्या हाडांची व दातांचे आरोग्य अंजीर खाल्ल्याने सुधारते :

अंजीर विटामिन ए, बी, सी, डी घटकांनी परिपूर्ण भरलेला आहे. तसेच अंजीर मध्ये कॅल्शियम हे मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे अंजीर खाल्ल्याने आपले दातांची आरोग्यही सुधारते. तसेच हाडांचे व स्नायूंचे आरोग्यही सुधारते, तुम्ही अंजीर पाण्यात भिजवून ही खाऊ शकतात.

महिलांसाठी फार आरोग्यदायी असते अंजीर :

बदलत्या वातावरणामुळे, अनेक महिलांना कंबरदुखीचा त्रास होत राहतो. त्यासाठी महिलांनी अंजीर +सुंठ+ धने समप्रमाणात बारीक कुटून घ्यावे, ते मिश्रण रात्रभर पाण्यात मिसळून सकाळी उपाशीपोटी ते पाणी प्यावे. त्यांना हे पाणी नियमित पिल्यास, त्यांचा कंबरदुखीचा त्रास हा कमी होईल. तसेच अंजीर मध्ये झिंक, मॅग्नेशियम, लोहाचे प्रमाण भरपूर असते. लोहाचे प्रमाण व्यवस्थित असल्यामुळे महिलांना अनिमिया सुद्धा त्रास होत नाही, ते महिलांच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरते. महिलांच्या संबंधित आजारावर अंजीर हे रामबाण उपाय आहे. अंजीर महिलांनी खाल्ल्यामुळे त्यांना, स्तनाच्या कर्करोगापासून तसेच हार्मोन इन-बैलेंस म्हणजे असंतुलन पासून फार फायदा मिळतो.

वजन वाढीच्या समस्यांपासून अंजीर आपल्याला दूर ठेवतो

बदलत्या जीवनशैलीमुळे ,अवेळी खानपान मुळे, अवेळी झोप मुळे अनेक जणांना वजन वाढीचे समस्यांना तोंड द्यावे लागते. मग अशा वेळी जर तुम्ही अंजीर खाल तर ते तुम्हाला अधिक फायद्याचे राहील. कारण अंजीर मध्ये तंतूमय जास्त प्रमाणात असतात. अंजीर मधील तंतू आपल्या शरीरावर सकारात्मक असे परिणाम करतात. त्यामुळे आपले वजन हे वाढू देत नाही, तसेच अंजीर मध्ये जीवनसत्वे, खनिजे, रोगप्रतिरोधक जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच अंजीर मध्ये विटामिन ए, बी१, बी२, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम भरलेले असतात. त्यामुळे आपले पचन संस्था ही सुरळीत चालते. आपण फिट राहतो आणि आपल्या वजनाच्या समस्यांपासून आपण वाचतो. त्यासाठी तुम्ही अंजीर हे दिवसातून दोन किंवा तीन वेळेस खायला हवे. तसेच कोणाला, अंजीर पासून ऍलर्जी असेल, तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खाऊ नये.

चला, तर आज आम्ही तुम्हाला अंजीर खाण्यापासून तुमच्या शरीराला  कोणकोणते फायदे होतात ते आम्ही तुम्हाला सांगितलेले आहे, जर तुम्हाला अंजिरापासून काही ऍलर्जी असेल, तर तुम्ही कोणत्याही तज्ञांचा सल्ला शिवाय अंजीर खाऊ नका. तसेच तुम्हाला त्यामध्ये काही शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये ही सांगू शकतात.

Leave a comment