अडुळसा औषधी वनस्पती उपयोग माहिती
अडुळसा भारतामध्ये सर्वत्र प्रसिद्ध आहे. याची पाने मोठी भाल्याच्या आकारासारखी असतात. फळांना कवच असते. प्रत्येक फळामध्ये ४ बिया असतात. फुले पंढरी किंवा जांभळी असतात. याचे वसाका हे नाव संस्कृत मध्ये आहे. ही वनस्पती भारतामध्ये सर्वत्र आढळते. अडूळशाचे मुळ स्थान भारत आहे.
औषधी गुणधर्म:
अडुळसाच्या मुळा, पाने, फुले, औषधी साठी वापरतात. सर्दी, खोकला दमा, इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी आहे.
विविध रोगांवर उपचार:
क्षय रोग:
आयुर्वेदामध्ये क्षय रोगासाठी अडूळशाच्या फुलांपासून तयार केलेला गुलकंद उपयोगी असल्याच सांगितल आहे. अडूळशाची पाने कुस्करून चीनी मातीच्या भांड्यात ठेवावी. त्यात खाडी साखर मिसळावी. आणि भांडे उन्हामध्ये ठेवावे. सकाळ संध्याकाळ हे मिश्रण हलवावे.
एक महिना नंतर हे मिश्रण वापरण्यायोग्य होते. पानांचा रस सुद्धा क्षय रोगावर गुणकारी आहे. अडुळसा इतका गुणकारी आहे कि जोवर अडुळसा आहे तोवर कोणत्याही प्रकारच्या क्षय रोगावर मात करता येऊ शकते.
खोकला:
अडूळसाची सात पाने पाण्यामध्ये उकळवावी, ती गाळून घेतल्या नंतर त्यात २४ ग्राम मध मिसळावे. हा काढा घेतल्याने खोकला थांबतो. तसेच अडुळसा ची फुले टाकून तयार केलेली मिठाई दर वेळी 12 ग्राम या प्रमाणे सकाळ संध्याकाळ खाल्ल्यास खोकला थांबतो. ६० ग्राम फुले १८० ग्राम गुळाच्या पाकात मिसळून ही मिठाई तयार करावी.
पोटातील जंत:
पाने, खोड आणि मुडाची साले, फळे, आणि फुले सर्वच भाग पोटातील जंत बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहेत. सालीचा काढा प्रत्येक वेळी ३० ग्राम या प्रमाणे दिवसातून 2-3 वळेस सलग ३ दिवस घ्यावा किवा ताज्या पानांचा रस दर वेळी 1 चमचा या प्रमाणे ३ दिवस ३ वेळा घ्यावा.
जुलाब आणि आव:
जुलाब किंवा आव झाला असल्यास पानांचा रस 2 ते 4 ग्राम घ्यावा.
त्वचारोग:
ताज्या जखमा, संद्यावरची आणि इतर ठिकाणची सूज यांवर पानाचे पोटीस लावले. खरुज आणि इतर त्वचारोग यांवर पानांचा गरम काढा घ्यावा.
वापरण्याची पद्धत आणि प्रमाण:
पानांचा रस, आल्याचा रस किवा मध यांसोबत दर वेडी १५ ते ३० ग्राम घ्यावा. वाळलेल्या पानांचे चूर्ण 2 ग्राम घेतले तरी चालेल. ताज्या पानांचा काढा करून घ्यावा. खोकल्या मध्ये अनेक आयुर्वेदिक औषधी मध्ये अडुळसा च्या पानांचा रस असतो. खोडाच्या सालीचा ही काढा ३० ते ६० मि.ली. च्या डोसात घेतला तरी चालतो.

डॉक्टर पाटील यांनी आपले मराठी आयुर्वेद चे काही सोप्पे उपाय आपल्या साठी येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.
One response to “अडुळसा औषधी वनस्पती उपयोग माहिती”
खूप छान उपयोगी माहिती.
पूर्ण माहिती साठी भेट द्या eco Environment
Click profile and visit