सर्दी घरगुती उपाय कसा करतात

Must read
Dr. Patil
Dr. Patil
डॉक्टर पाटील यांनी आपले मराठी आयुर्वेद चे काही सोप्पे उपाय आपल्या साठी येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

सर्दी घरगुती उपाय

सर्दीची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. प्रत्येक एखाद्या दुसऱ्याला आज सर्दी चा त्रास आहे. वातावरणातील बदल किंवा ऍलर्जी मुळेही सर्दी होऊ शकते.

सर्दीवर सामान्य लक्षणे:

शिंका येणे, नाकातून पाणी येणे किंवा कफ येणे, डोके व नाक जड होणे, डोके दुखणे, नाक चोदणे इत्यादी लक्षण दिसून येतात.

काय खावे:

गहू, तांदूळ, यव, नाचणी, मूळा, शेवगा, पालक, तोंडली, आले, मूग, कुळीथ, पपई, तूप, लोणी, लहसून, हळद, दालचिनी, लवंग, वेलची इत्यादी पदार्थ खावे.

काय खाऊ नये:

सर्दी झाली असल्यास लाल भोपडा, अति प्रमाणात काकडी, आंबट दही, अननस, टोमॅटो, सीताफळ, चिकू, फणस, शीतपेये, रात्री आईसक्रीम इत्यादी पदार्थ खाणे टाळावे.

सर्दी घरगुती उपचार :

  • वारंवार सर्दी होऊन नाकातून पाणी, चिकट पिवड्या रंगाचा कफ येत असल्यास जेवणानंतर नियमित एक महिना भर एक चमचा ओवा खावा. याने सर्दी नाहीशी होते.
  • दर पावसाड्यात वरचेवर सर्दी, खोकला होत असल्यास पाच चमचा दालचिनी, दोन चिमूट जिरे, व दोन चिमूट सुंठीचे चूर्ण सकाळ संध्याकाळ मधातून घ्यावे. याने पावसाळ्यात येणार सर्दी नाहीशी होईल.
  • नाकातून पाणी येऊन डोळे व नाक यात जळजळ होत असल्यास पाव चमचा सुंठ, पाव चमचा जेष्ठमध व पाव चमचा साखर सकाळ संध्याकाळ मधातून घ्यावे. सर्दी मध्ये लवकर आराम मिडेल.
  • सर्दी झाली असल्यास उकळत्या पाण्यात निलगिरीच्या दोन थेंब टाकून वाफ घ्यावी. सर्दी लवकर बरी होईल.
  • सर्दी, सायनसमुडे डोके जड दुखत असल्यास चिमूटभर सुंठ तपकिरी प्रमाणे नाकपुडीने ओढल्याने शिंका येऊन डोके हलके होते.
  • सर्दीमूडे कफ सायनसमध्ये भरल्याने डोके व डोळे जड वाटत असल्यास सुंठ कीव लवंग पाण्यात उगाळून कपाळ, नाक व डोळ्याभोवती लेप करावा व  15 ते 20 मिनिटे ठेवावे आणि नंतर धूऊन टाकावे.
  • कफ डोक्यात साचल्याने डोळे व डोके जड झाले असलास मूठभर ओवा सुती कपड्यात बांधून पुरचुंडी तयार करावी व तव्यावर गरम करून नाक, कपाळ व डोळ्याभोवती पुरचुंडीने शेकावे. याने लवकर अराम मिडेल.
  • गवती चहा, सुंठ, लवंग, दालचिनी, तुळशीची पाने, यांचा चहा घेतल्यास सर्दी व थंडी वजने कमी होईल.
  • वरचेवर सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्यास रोज सकाळी पाव चमचा हळद गरम दुधात टाकून घेण्याची सवय ठेवावी. हळदी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. विशेषतः ऍलर्जी असल्याने सर्दी खोकला होत असल्यास हा उपाय करावा.

वरील उपायांचे नियम पालन केल्यास कुठल्याही प्रकारची सर्दी मुळासकट नष्ट होते. आणि डॉक्टर कडे जाण्याची वेळ येत नाही.

ताप आल्यावर काय करावे.

अपचन घरगुती उपाय मराठी मध्ये.

पोट साफ होण्यासाठी उपाय मराठी मध्ये.

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest article