उल्टी vomating थांबवण्याचे घरगुती उपचार

Must read
Dr. Patil
Dr. Patil
डॉक्टर पाटील यांनी आपले मराठी आयुर्वेद चे काही सोप्पे उपाय आपल्या साठी येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

उल्टी थांबवण्याचे घरगुती उपचार

उल्टी vomating
उल्टी vomating

बर्याचदा शिळे अन्न किव्वा न पचणारे जड पदार्थ, दुशीत अन्न, दूषित पाणी  पिल्यास उल्टी होते.

उल्टी लक्षण:  

मळमळ होणे, तोंडाला पाणी सुटणे, काहीही खाल्ले असता उलटी होणे, पोट जड होणे, डोके दुखणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

काय खावे:

तांदूळ, सालीच्या लाह्या, दुधी, पडवळ, मूग, लिंबू, डाळिंब, आवळा, द्राक्षे, नारळ, आले,ओली हळद,लोणी, तूप, खडीसाखर इत्यादी पदार्थ आहारामध्ये घ्यावे.

काय खाऊ नये:

मका, चवळी, पावटा, वैगैरे कडधान्ये खावे. तसेच अननस, आंबट दही, अडू, मोहरी, मिरे, आंबवलेले व तेलकट पदार्थ, बाहेरचे पाणी, शिळे अन्न इत्यादी खाणे टाळावे.

उल्टी घरगुती उपचार :

 • उल्टी बरोबर  अतिशय जडजडीत पित्त पडत असल्यास रक्त चंदन व जेष्ठमध  दुधामध्ये गाळून चाटावे.
 • संपूर्ण वेलची किंवा नारळाची शेंडी तव्यावर जाळून तयात केलेले, राख मधासह चालल्यास उलट्या थांबतात.
 • वाळलेले लिंबू जाळून तयार केलेली राख मधासह वरचेवर चाटत राहिल्यास  मळमळ थांबते.
 • कढीपत्त्याची पाने वाटून काढकेल्या रसात मध किव्वा खडी साखर घालून चाटल्यास मळमळणे, तोंडाला पाणी सुटणे, अशी लक्षणे कमी होऊन उलट्या थांबतात.
 • एक किव्वा दोन लवंगांचे कबुरण डाळिंबाच्या रासाबरोबर घेतल्यास , विशेषतः गरोदरपणात होणारी उल्टी कमी होते.
 • उलट्या होत असताना सालीच्या लाह्या कोरड्या किव्वा किंचित तुपात परतवून खाल्याने मळमळ थांबते.
 • न आवडणारे पदार्थ खाऊ नये. भीती दायक गोष्टी पाहू किव्वा ऐकू नये, उन्हात फिरू नये, तहान लागली नसता पाणी पिऊ नये.
 • आल्याचा रस, लिंबाचा रस, व मध एकत्र करून केलेले चाटण वारंवार चाटवल्यास उलट्या होणे कमी होते.
 • उलटी मुडे मळमळ होत असल्यास, अतिशय तहान लागत असल्यास अर्ध्या चांच्यात बडीशेप चे चूर्ण मोरवड्या सह घ्यावे.
 • गोड डाळिंबाचा रस खडीसाखर, चिमूटभर जिरेपूड, व सैंधव टाकून घोट घोट घेतल्यास उलट्या व मळमळ थांबते.
 • वारंवार डोके दुखून उलट्या होत असल्यास शहाड्याचे पाणी, डाळिंबाचा रस, द्राक्षांचा रस, यासारख्या गोष्टी नेहमी वापरात ठेवा.

याशिवाय तुम्ही द्राक्षासव, संतुलन पित्तशांती, इत्यादी औषधे घेऊ शकतात. ही औषधी तुम्हाला बाहेर बाजारात सहज उपलब्ध होईल.

भूक वाढीसाठी उपाय जेवण वाढवण्यासाठी काय करावे ?.
अपचन घरगुती उपाय मराठी मध्ये.
पोट साफ होण्यासाठी उपाय मराठी मध्ये.
More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest article