आम्लपित्त उपचार कमी करण्याचे उपाय

आम्लपित्त उपचार

आम्लपित्त उपचार
आम्लपित्त उपचार

नमस्कार मित्रानो आज आपण आम्लपित्त साठी म्हणजे acidity का होते एसीडीटी कमी करण्याचे उपाय पित्त कमी करण्यासाठी घरगुती काही उपाय बघणार आहोत आणि पित्त का होतात त्याचे लक्षण काय आहेत पित्त असताना काय खावे काय खाऊ नये आपण आज माहिती करून घेऊ.

लक्षण:

घसा, छाती व पोटामध्ये जडणे, आंबट ढेकर, पोट दुखणे, मळमळणे, डोकेदुखी, उलटी झाल्यावर बरे वाटणे.

काय खावे:

तांदूळ, ज्वारी, दुधी, घोसाळे, काकडी, मूग, आवळा, डाळिंब, नारळ, मनुका, वेलची, लोणी, तूप, धने, बडीशोप, जिरे इत्यादी पदार्थ खावे.

काय खाऊ नये:

सिमला मिरची, शेवगा, टोमॅटो, चिंच, मेथी, आंबट चुका, कुळीथ, अननस, दही, मद्य, अतिशय तिखट व तेलकट पदार्थ खाऊ नये.

आम्लपित्त उपचार:

 • सकाळी खाली पोट चार चमचे दुधी भोपळ्याच्या रसात चुमिटभर जिरेपूड टाकून घेतल्यास करपट ढेकर येणे, बैचेन वाटणे कमी होते.
 • पण चमचा सुंठ व तेवढीच आवळकंठी, अर्धा चमचा खडीसाखर घालून सकाळ संध्याकाळ घ्यावे.
 • एक वेलची व अर्धा चमचा जिरे खाडीसाखरेसह चावून खाल्ल्यास पोटात होणारी मळमळ, डोकेदुखी, चक्कर येणे कमी होते.

आम्लपित्त घरगुती उपचार:

 • गोड डाळिंबाचा रस साखर घालून घेतल्यास फायदा होतो.
 • अनेक दिवसाच्या आमलपित्तामुळे  आमाशय व्रण झाल्यास शहाळ्याचे खोबरे नियमित खाल्ल्यास लाभ होतो.
 • 7-8 काळ्या मनुका खाडीसाखरेसह खाल्ल्यास आमलपित्तामुळे होणारी जळजळ कमी होते.
 • अर्धा चमचा धने व अर्धा चमचा जिरे कपभर पाण्यात 5-6 तास भिजवावे व नंतर गाळून चवीनुसार खडीसाखर टाकून प्यावे.
 • एक ग्लास पाण्यात मूठभर लाह्या 2-3 तास भिजवाव्यात व नंतर गाळून घेऊन पाणी प्यावे.

आम्लपित्त दीर्घकालीन उपचार:

 • रोजच्या आहारात सजूक तूप व ताज्या लोण्याचा वापर करावा.
 • वारंवार पित्ताचा त्रास होत असल्यास रोज सकाळी मोरावळा किव्वा गुलकंद खावा.
 • रात्री उशिरा जेवणे टाळावे, रात्रीचे जागरण टाळावे. उन्हात जास्ती वेळ फिरू नये. चहा कोफी चा अतिरेक टाळावा.

याशीवाय तुम्ही बाजार मध्ये उपलब्ध असलेले औषध उपयोगात आणावे.

संतुलन पित्तशांती, सॅन कुल, कामदुधा इत्यादी औषधांचा वापर करावा.

भूक वाढीसाठी उपाय जेवण वाढवण्यासाठी काय करावे ?
अपचन घरगुती उपाय मराठी मध्ये
पोट साफ होण्यासाठी उपाय मराठी मध्ये

Leave a comment