अपचन घरगुती उपाय मराठी मध्ये

अपचन घरगुती उपाय

अपचन घरगुती उपाय

अपचन घरगुती उपाय
अपचन घरगुती उपाय

पोटाचे विकार आणि उपाय मध्ये आज आपण अपचन वर घरगुती उपाय बघुया. मित्रांनो अपचन घरगुती उपाय मध्ये आपण जाणूया अपचन का होते आणि जेवणाचे अपचन नाही होण्यासाठी आपल्याला काय करायला हवे.

खाल्लेलं अन्न न पचणे म्हंजेच अपचन होय. जेवण केल्यानंतर जड वाटणे सुस्ती येणे याला अपचन म्हणतात.

अपचन झाल्याचे लक्षणे:

पोट जड होणे, जिभेवर पांढरा थर होणे, पोट दुखणे व फुगणे , दिवसभर सुस्त वाटणे, अंग मोडून आल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षण आढळून येतात.

अपचन टाळण्यासाठी काय खावे:

मूग, भात, लाह्या, ज्वारी, पपई, संत्रे, दोडका, मेथी, पालक, सुंठ, जिरे, सुरण, लसूण, ताक, गरम पाणी इत्यादी सेवन करावे.

अपचन पासून वाचण्यासाठी काय खाऊ नये:

वाटणे, मटार, चावडी इत्यादी कडधान्य, रताळे साबुदाणा, तळलेले पदार्थ, जड मिठाई, थंड पाणी, शिळे पदार्थ इत्यादी पासून दूर राहावे.

अपचन घरगुती उपचार:

  • जेवणानंतर अर्धा चमचा  भाजलेला ओवा, चिमूटभर सैंधवाबरोबर चावून खाल्ल्यास व त्यावर गरम पाणी पिल्यास खाल्लेलं लवकर पचते.
  • अपचनामुडे पोटात वायू धरत असल्यास, अस्वस्थ वाटत असल्यास अर्ध्या लिंबाबच्या रसात दोन चिमूट हिंग, दोन चिमूट तमालपत्र चे चूर्ण व थोडे सैंधव टाकून घ्यावे. याने अपचन कमी होते व भूक वाढते.
  • जेवणा आधी अर्धा चमचा जिरेपूड व एक दोन चिमूट सुंठीचे चूर्ण  लिंबाच्या रासाबरोबर घावे. अपचन होणार नाही आणि भूक वाढेल. तसेच खाल्लेलं सर्व पचेल.

अपचनावर घरगुती उपचार:

  • अपचनावर सर्वात सोपा व खात्रीच उपाय म्हणजे उपवास करणे व हलका अहार घेणे. दुपारी हलके जेवण करून रात्री काहीही खाऊ नये. किव्वा केवळ पालक सूप घ्यावे.
  • दिवसभर गरम पाणि प्यावे.
  • जेवण वेळेवर करावे.
  • दुपारच्या जेवणानंतर एक वाटी ताजे ताक, अर्धा चमचा जिरेपूड, चिमूटभर सुंठ, व किंचित सैंधव टाकून घ्यावे.
  • जेवणामध्ये आल्याचा तुकडा हिंग व सैंधव घालून खावा.
  • जेवणा नंतर लवंग किव्वा दालचिनीचा छोटा तुकडा चघडल्याने पचनास मदत होते.
  • अपचन मुडे पोटांत वायू धरून ढेकर येतात, बैचेन वाटते. अश्या वेळी किसलेले आले पाण्यात टाकुन चहाप्रमाने उकडावे. चावी साठी साखर घ्यावी आणि प्यावं. अपचन नाहीस होईल.

वाचा :

मूळव्याध घरगुती उपचार उपाय मराठी मध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *