तर मित्रांनो आपल्या शरीरातील सगळ्यात संवेदनशील भाग म्हणजे आपला चेहरा. तसेच सर्व लोकांना विशिष्ट पणे स्त्रियांना वाटते की आपला चेहरा सगळ्यात सुंदर तसेच चांगला दिसावा. आपला चेहरा आकर्षक दिसावा म्हणून अनेक केमिकल्स तसेच कॉस्मेटिक्स वापरले जातात कारण सर्वांना आपला चेहरा प्रिय असतो. आपल्या चेहऱ्यावर जर एखादा डाग, पिंपल्स वांग किंवा काळे चट्टे निर्माण झाले तर आपल्या खूप काळजी होते. कारण आपला चेहरा चांगला दिसावा आकर्षक दिसावा म्हणून आपण झटत असतो. पण जर आपल्या चेहऱ्यावर एखादा काळा डाग आला तर आपले सौंदर्य कमी होते. तसेच कोणालाही आवडणार नाही की आपल्या चेहऱ्यावर काळा डाग किंवा चट्टे असावे आपण खूप सारे कॉस्मेटिक्स, केमिकल्स वापरतो तरीही ते काळे डाग जात नाही याउलट चेहरा आणखीनच काळा होत जातो. आज आपण चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत जेणे करुन आपली सुंदरता अधिक वाढताना दिसेल.
सर्वांना हा प्रश्न पडतो की आपण आपला चेहरा नीटनेटका आकर्षक कसा ठेवावा आपल्या चेहऱ्याची निगा कशी राखावी तसेच आपल्या चेहऱ्यावर जर काळे डाग निर्माण झाले असतील तर ते डाग कसे घालवावे. तर मित्रांनो आज आपण याबाबत चर्चा करणार आहोत जर आपल्या चेहऱ्यावर काळे डाग काळे चट्टे निर्माण झाले असतील तर घरगुती उपायांनी ते काळे डाग कसे घालता येईल चला तर मग बघुया.
चेहऱ्यावर काळे डाग का निर्माण होतात ?
1. शरीरातील हार्मोन्सचे बदल
2. प्रखर सूर्यप्रकाशामध्ये जाणे
3. वातावरणातील बदल
4. केमिकल्सचा साईड इफेक्ट
5. मानसिक तणाव
तर मित्रांनो चेहऱ्यावर काळे डाग निर्माण होण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की शरीरातील बदल प्रत्येकाच्या शरीरातील हार्मोन्स नुसार त्याच्या शरीरामधील बदल होत असतो. त्याचे उदाहरण म्हणजे बऱ्याच स्त्रियांना गरोदर असताना चेहऱ्यावर काळे डाग निर्माण होतात. तर इतर व्यक्तींना प्रकार सूर्यप्रकाशामध्ये गेल्यावर चेहऱ्यावर काळे डाग निर्माण होतात.
अनेक लोकांना वातावरणाच्या बदलामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होतो जसे की चेहऱ्यावर काळे चट्टे किंवा डाग निर्माण होणे. तसेच बऱ्याच केमिकल्स चा चेहऱ्यावर साईड इफेक्ट होतो, त्यामुळे आपला चेहरा काळपट दिसू लागतो व चेहऱ्यावर डाग किंवा चट्टे निर्माण होतात. तसेच चेहऱ्यावर डाग निर्माण होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे मानसिक तणाव अनेक वेळा मानसिक तणावामुळे त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो.
चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी उपाय :
आपण चेहऱ्यावरील काळे डाग निर्माण होण्याची कारणे तर बघितली. आता आपण जाणून घेणार आहोत आपल्या चेहऱ्यावर जर काळे डाग निर्माण झाले असतील तर आपण घरगुती व प्रभावशाली उपायांनी काळे डाग कसे नाहीसे करू शकतो चला तर मग जाणून घेऊया.
लिंबू व सोडा लावून बघा :
आपण सुरुवातीस एक अर्धा लिंबू कापून घ्या त्यानंतर त्या लिंबू वर थोडासा बेकिंग सोडा टाका. त्यानंतर जेथे काळा डाग आहे त्यावर दहा ते पंधरा मिनिटं घासा. बेकिंग सोडा हे ब्लीच काम करतो म्हणजेच तुमच्या चेहर्यावरील डाग असेल तर डाग नाहीसे करण्याचे काम बेकिंग सोडा करतो. त्याचप्रकारे लिंबू मध्ये नायट्रिक ऍसिड असते जे शरीरावरील डाग घालण्यावर फार उपयुक्त असते.
कोरफड (एलोवेरा) लावा :
एलोवेरा ही वनस्पती खूप औषधी आहे हे सर्वांनाच माहिती आहे. तसेच आलोवेरा चे त्वचेवर बरेच फायदे आहेत त्यातील एक फायदा म्हणजे जर आपल्या चेहऱ्यावर काळे डाग असतील तर त्या जागेवर कोरफडीचा गर लावल्याने आपले काळे डाग नाहीसे होऊ शकतात. हा उपाय सलग एकवीस दिवस करावा जेणेकरून तुमच्या चेहर्यावरील डाग नाहीसा होण्यास मदत होईल.
मध व लिंबू वापरून बघा :
आपल्या चेहऱ्यावर काळे डाग असतील तर त्यावर मध आणि लिंबू लावल्यास काळे चट्टे व डाग नाहीसे होण्यास मदत होईल. तर आपण सुरुवातीस थोडेसे मध घ्यावे त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस टाकावा हे मिश्रण एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्यावर ज्या ठिकाणी डाग आहे त्या ठिकाणी दीड तास ठेवावे, असे केल्यास तुमची काळा डागान पासून सुटका होऊ शकते.
गरम वाफा घ्या :
बऱ्याचदा आपल्या डॅड स्किंस मुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग व काळे चट्टे निर्माण होतात. या डेड स्किनला घालवायचे असेल तर आपण गरम पाण्याचे वाफा घेणे गरजेचे आहे. तर आपण सर्वप्रथम दहा ते पंधरा तुळशीची पानं घ्या ती पानं एका भांड्यामध्ये टाका व त्यानंतर त्यामध्ये हळदकुंड टाका हळदकुंडाच्या ऐवजी तुम्ही पाण्यामध्ये निलगिरी ही टाकू शकता. पाणी उकळून त्याच्या वाफा चेहऱ्यावर घ्या हा उपाय रोज रात्री झोप ना आधी करावा.
तर आज आपण बघितले आपल्या चेहऱ्यावर काळे डाग किंवा चट्टे निर्माण झाले असतील तर त्याची कारणे कोणती त्याचबरोबर त्यावर घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकता. तुम्हाला काही अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
Dr. Madhuri is a leading Health expert. She has started her career in Doctor Field in 2018. She has completed her Medical Degree from a Govt recognized organization.