अश्वगंधा चे फायदे मराठीत

अश्वगंधा

अश्वगंधा चे फायदे मराठी

अश्वगंधा चे मूळ स्थान भारत आहे. तसेच पाकिस्तान, अणि श्रीलंका या देशांमधे सुद्धा आढळते. या मध्ये सोम्निफेरीन असते. अश्वगंधाच्या संमोहक आणि शामक गुणामुळे याचा अनेक औषधी साठी उपयोग करतात.  संभोग शक्ती वाढते,बलवर्धक आणि उत्साहवर्धक आहे. ते धातूवर्धक आणि मुत्रल आहे.  जुवाणु व जंतू नाशक आहे. असेही संशोधनामध्ये आढळून आले आहे.

अश्वगंधा चे उपयोग :

पचन विकार:

अपचन आणि मंदाग्नी यांवर अश्वगंधा गुणकारी आहे. पचनसंस्थेची विविध कामे सुरळीत होतात, पाचन शक्ती वाढवायची असल्यास अश्वगंधाचा उपयोग करावा.

अशक्तपणा:

शक्ती वाढवण्यासाठी मुळ्याचे चूर्ण 2 ग्रम रोज घ्यावे. याने अशक्तपणा कमी होऊन शरीराची ताकद वाढते.

संधिवात:

संधिवात चा त्रास असल्यास रोज अश्वगंधा चूर्ण ३ ग्राम घ्यावे. संधिवातावर याचा उपयोग परिणामकारक औषधी आहे. याने नाक्की लाभ होतो.

क्षय रोग:

मुळ्यांचा काढा मिरी आणि मध टाकून घ्यावा. हा काढा गंडमाळांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. दररोज काढा घेतल्याने क्षय रोग समाप्त होतो.

निद्रानाश :

निद्रानाश होत असल्यास अश्वगंधा च्या मुळा उपयुक्त ठरतात. मुळा शामक असल्याने निद्र नाश होत नाही.

त्वचा रोग :

त्वचेच्या अनेक तक्रारींवर याची पाने गुणकारी आहे.गळवे आणि हात पायाची सूज यांवर पानांचा लेप लावावा. याने उवा मारतात. त्याचप्रमाणे पुळ्या, व्रण वैगैरे त्वचा विकारांवर हा लेप गुणकारी आहे. अश्वगंधाची पाने तुपात टाकून त्याचे मलम करून जखमेवर लावल्यास जखम लवकर बरी होते.

नेत्रविकार :

अश्वगंधाच्या पानांचा लेप डोळ्यांच्या विकारांवर गुणकारी आहे. मात्र गरोदर स्त्रियांनी याचे औषध पोटात घेऊ नये. गर्भपात होण्याचा संभव असतो. यासाठी गरोदर स्त्रियांनी याचा वापर टाळावा.

अंगाला खाज येणे :

३० मि.ली. पानांचा रस जिरे टाकून घ्यावा. अलर्जी मुळे होणारी खाज थांबते. आग सुद्धा शांत होते. त्यासाठी दिवसातून दोन वेळा हा रस घ्यावा.

आम्लपित्त: याच्या सालीचे चूर्ण किवा काढा घेतल्यास आम्लपित्त कमी होते. पित्त मुळे अंगावर गांधी झाली असल्यास अश्वगंधाच्या पानांचा रस अंगाला लावावा.

इतर उपयोग :

फळांची चटणी किवा रस करून घेतल्यास उचकी थांबते. पाने सावलीमध्ये वळवून त्याचे चूर्ण करून घेतल्यास शुक्रमेह आणि मधुमेह दूर होतो.

आल्याचे औषधी उपयोग फायदे माहिती

पोटातील जंत रोग घरगुती उपचार.

अडुळसा औषधी वनस्पती उपयोग माहिती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *