आज काल खूप सार्या लोकांना अशक्तपणा ची समस्या येत आहे. पण हे का होत आहे हे बऱ्याच लोकांना माहित नसते. त्याकरता आजच्या या लेख मध्ये आम्ही आपल्याला अशक्तपणा दूर करण्यासाठी काय करायला हवे आणि काय केल्याने तुम्हाला कधीच अशक्तपणा येणार नाही ? याबद्दल माहिती मिळणार आहे.
दिवसेंदिवस कोरोना खूप वाढत आहे आणि अशा वेळेस जर अचानक आपल्याला अशक्तपणा जाणवत असेल तर, आपल्या मनात एक भीती होऊन जाते की मला तर कोरोना झाला नाही ? त्याकरता अशा भीती दूर करून आपल्या अशक्त पणा दूर करण्याचा घरगुती उपाय आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. तर मग आपण जाणून घेऊया अशक्त पणा बद्दलच्या काही गोष्टी –
अशक्त पणा का येतो ?
तसे बघायला गेले तर अशक्तपणा येण्याची खूप कारणे आहेत, पण अशक्त पणा आपल्याला खालील दिलेल्या कारणामुळे पण होऊ शकतो :
- कमी झोप घेतल्यामुळे
- जेवणावर व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे
- खाण्या पिण्या मध्ये विटामिन आणि इतर जीवनसत्वांची कमी असल्यामुळे
- जास्त झोपल्यामुळे
- ताप आल्यामुळे
- शरीरामध्ये विटामिन बी 12 ची कमतरता झाल्यामुळे
- डायबिटीज मुळे
- इतर काही आजार झाल्यामुळे
इत्यादी कारणांमुळे आपल्याला अशक्तपणा येतो. तर मग चला जाणून घेऊया अशक्तपणा दूर करण्यासाठी आपल्याला काय करायला हवे ?
अशक्तपणा दूर करण्याचे घरगुती उपाय :
जर तुम्हाला सारखा अशक्तपणा जाणवत असेल आणि तुम्हाला ते दूर करायचं असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय वापरू शकतात जेणेकरून तुम्हाला कुठलाही गोळ्या न खाता या समस्येपासून सुटका मिळू शकते.
-
दालचिनी पावडर आणि मधामुळे करा अशक्त पणा दूर :
जर तुम्हाला सारखा अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही दालचिनी पावडर आणि मधामुळे तुमचा अशक्तपणा दूर करू शकतात. यासाठी तुम्हाला –
- अर्धा चमचा दालचिनी पावडर
- दोन चमचे मध
एकत्र मिसळून रात्री थोडे चाटल्याने काही दिवसातच तुम्हाला अशक्तपणा ची समस्या दूर झालेली दिसेल. याचा नियमित वापर केल्यामुळे तुमची इम्युनिटी सिस्टिम मजबूत होईल.
-
बदाम आणि खजूर करतील अशक्त पणा दूर :
जर तुम्हाला साध्या सरळ सोप्या पद्धतीने अशक्त पणा घालवायचा असेल तर तुम्हाला बदाम आणि खजूर खूप उपयुक्त ठरतील. आजकाल सर्वांच्याच घरांमध्ये बदाम आणि खजूर तुम्हाला मिळतात त्यामुळे तुम्हालाही घेण्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही.
- पाच बदाम
- पाच खजूर
- एक वाटी दूध किंवा पाणी
यासाठी तुम्हाला रात्री झोपताना पाच बदाम आणि पाच खजूर एक वाटी दुधामध्ये किंवा पाण्यात भिजवायला टाकायचे आहेत. सकाळी उठल्यानंतर तुम्ही ब्रश केल्यानंतर सर्वप्रथम हे बदाम आणि खजूर खायला हवे आणि ते पाणी किंवा दूध प्यायला हवे. असे तुम्ही नियमित कराल तर तुम्हाला अशक्त पणा कधीच येणार नाही. फक्त हे डायबिटीस वाल्या लोकांनी नाही करायला हवे.
-
अशक्त पणा दूर करण्यासाठी बदाम आणि मनुका :
जर तुम्हाला खजुरचे जागे मानु का वापरायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकतात. वरील दिलेल्या उपाय मध्ये आम्ही तुम्हाला बदाम आणि खजूर वापरून अशक्तपणा घालवायची पद्धत सांगितली होती. पण या पद्धतीमध्ये तुम्हाला बदाम आणि मनुका वापरून सुद्धा तुम्ही अशक्तपणा घालू शकतात.
- दहा काळ्या मनुका
- पाच बदाम
- एक वाटी पाणी किंवा दूध
वरील सारख्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला एका वाटी दुधामध्ये किंवा पाण्यात दहा काळी मनुका घेऊन त्यात पाच बदाम रात्रभर भिजवून ठेवल्याने सकाळी उठून हे मनुका आणि बदाम खाल्ल्याने आणि ते पाणी किंवा दूध प्यायल्याने तुम्हाला अशक्तपणा जाणवणार नाही.
-
अश्वगंधा पावडर आणि गावरान तूप करेल तुमचा अशक्तपणा दूर :
जर तुम्हाला कुठल्या प्रकारची आयुर्वेदिक पावडर वापरून तुमचा अशक्तपणा घालवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अश्वगंधा पावडर खूप फायदेशीर राहील. यासाठी तुम्हाला-
- एक चमचा अश्वगंधा पावडर
- एक चमचा गावरान तूप
- एक ग्लास गाईचे दूध
यासाठी तुम्हाला दूध थोडेसे कोमट करून घ्यावे व त्यात एक चमचा अश्वगंधा पावडर आणि एक चमचा गावरान तूप चांगले मिसळून रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला घ्यायचे आहे. डायबिटीस वाल्या लोकांसाठी ही पद्धत खूप फायदेशीर आहे. या पद्धतीमुळे तुम्हाला अन्य आजारांपासून सुद्धा सुटका मिळू शकतो.
-
खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा :
जर तुम्हाला तुमच्या रोजच्या जेवणामध्ये हिरवा भाजीपाला किंवा रोजच्या आहारामध्ये तुम्हाला फळे घेता येतील तर हे तुमच्यासाठी कधीही योग्य | जर तुम्ही दिवसातून सकाळी उठल्यावर एक सफरचंद, एक ते दोन केळी, दिवसाला एक नारळ पाणी अशा प्रकारचे आहार घेतले तर तुम्हाला कधीच थकवा आणि अशक्तपणा येणार नाही |
जर तुम्हाला असेच उपाय दुसऱ्या कुठल्या समस्यांमध्ये हवे असतील तर हि पोस्ट शेअर करायला विसरू नका | जर तुम्हाला काही प्रश्न तुमच्या मनात येत असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहून आमच्याशी गप्पा मारू शकतात |

Dr. Madhuri is a leading Health expert. She has started her career in Doctor Field in 2018. She has completed her Medical Degree from a Govt recognized organization.