ताप आल्यावर काय करावे


ताप आल्यावर काय करावे

जर तुम्हाला थोडा फार ताप असेल तर डॉक्टर कडे जायची गरज नाही  तापाचे प्रकार खूप सारे आहेत . आज आम्ही आपल्याला ताप आल्यावर काय करावे मध्ये घरगुती उपचार करून सुद्धा तुम्ही ताप घालवू शकतात.

ताप येण्याची सामान्य लक्षणे :

शरीर गरम होणे, घाम न येणे, तोंडाला चव नसणे, भूक न लागणे, काहीही करायची इच्छा न होणे, इत्यादी लक्षणे दिसून येतात.

अंगावर ताप असल्यास काय खावे:

मूग, मसूर, साळीच्या लाह्या, दुधी, कारले, पालक, तांदूळ, मोसंबी, डाळिंब, पपई, तूप, धने, जिरे, गरम पाणी इत्यादी सेवन करावे

ताप असल्यास काय खाऊ नये:

गहू, चवळी, मटार, पावटा, सिमला मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, दही, अननस, आंबा, चिकू, तळलेले व जड पदार्थ खाण्याचे टाळावे.

ताप असल्यास खालील दिलेले घरेलू उपचार करावे.

ताप आल्यावर काय करावे घरगुती उपचार:

  • ताप आल्यावर जीभ पांढरी होऊन आपल्याला भूक लागत नाही. अश्या वेळी मध घालून तुळशीच्या पानांचा अर्धा चमचा रस सकाळ संध्याकाळ घ्यावा. याने तोंडाला चव येईल आणि भूक लागेल.
  • पाळीचा ताप येत असल्यास ताप येण्याचा अगोदर तीन तास परिजक्ताची पाने ठेचून तयार केलेल्या सुपारीच्या आकाराची गोळी गुलासह खावी. याने ताप येत नाही व आल्यास लवकर बरा होतो.
  • अपचनामुळे ताप आल्यास पाव चमचा जिरेपूड व पाव चमचा धणेपूड कोमट पाण्यात दिवसातून चार वेळा घ्यावी. ताप लवकर बरा होईल.
  • ताप नसताना अंघोळ न करता रिठे व कडुलिंब घालून उकलेल्या कोमट पाण्याने अंग पुसून घ्यावे. असे केल्याने ताप वाढत नाही.
  • खुप ताप असल्यास कपाळावर मिठाच्या पानाच्या किंवा थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्या, हात पायाला कांद्याचा रस चोळावा. ह्या उपायाने ताप बरा होण्यास मदत होते. तरीही ताप कमी न झाल्यास थंड पाण्याने अंग पुसून घ्यावे.
  • ताप आल्यावर सर्वप्रथम लंघन करावे. काहीही न खाता केवळ कोमट पाणी तहान लागेल तसे प्यावे. फार भूक लागत असल्यास सालीच्या लाह्या किंवा तांदूळ मुगाची मऊ खिचडी खाऊ घालावी.
  • दिवसभर प्यायचे पाणी वाळा, चंदन, व सुंठ घालून उकळून घेतलेले असावे.

याशिवाय ताप आलेला असताना जड, तळलेले, आंबवलेले पदार्थ, खाऊ नये. व्यायाम, मैथुन, व रात्री जागरण टाळावे. आणि पुरेपूर विश्रांती घ्यावी. ताप आल्यावर काय करावे मध्ये आम्ही आमच्या पद्धतीनेकाही घरगुती उपचार सांगितले आहेत त्यामुळे जर आपला ताप कमी नाही होत असेल तर आपल्याला लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता आहे.

बाजारामध्ये उपलब्द्ध असलेले सुदर्शन चूर्ण आणि संतुलन पित्त शांती अशी औषधे घ्यावी.

अंगावर भाजणे व जखमेवर घरगुती उपचार.
पोट साफ होण्यासाठी उपाय मराठी मध्ये.
उल्टी vomating थांबवण्याचे घरगुती उपचार.