आल्याचे औषधी उपयोग फायदे माहिती

आल्याचे औषधी उपयोग

आल्याचे औषधी उपयोग

आले ही जमिनीखाली मुळीच्या स्वरुपात वाढनारी वनस्पती आहे. खोड जाडसर असते. आणि त्याला गाठी असतात. आल्याची पाने टोळी किवा कापली तर त्यांना एक खास वास येतो. वरची पाने वाळल्यानंतर जमिनीखालचे आले काढतात.

आले उन्हामध्ये चांगले वाळवले कि त्याची सुंठ तयार होते. संस्कृत आणि चीनी साहित्यामध्ये अल्यासंबंधी अनेक संबंध आहे. आल्याचे मुल स्थान भारत असून पहिल्यांदा त्याचा प्रचार चीन मध्ये झाला. दोन्ही देशामध्ये त्याचा वापर औषध आणि मसाल्यासाठी होतो. आले आयुर्वेदामध्ये वायुनाषक म्हणून प्रसिद्ध आहे.

आल्याचे औषधी गुणधर्म :

भारत आणि इतर देशांमध्ये आल्याचा औषध म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पोटातील वायू चा नाश करण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. स्नायुमध्ये वेदना होत असतील तर आले बाहेरून लावतात. इतर मसाल्याच्या पदार्थ प्रमाणे आले सुद्धा कामउत्तेजक आहे.

पचन विकार :

अपचन, पोटात गुबारा धरणे, पोट दुखणे, आणि इतर पचन विकार यांवर आले अत्यंत गुणकारी आहे. पचन विकार होऊ नये यासाठी जेवण झाल्यानंतर रोज आल्याचा तुकडा चावून खावा. त्यामुळे तोंडामध्ये चांगली लाड सुटते. आणि दायास्टेज नावाचा पाचक रस पाझरायला मदत होते.

अर्धा चमचा आल्याचा रस, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा पुदिन्याचा रस, एक चमचा मध असे मिश्रण घेतल्यास पित्तामुळे होणारी मळमळ, उलटी, मांसाहारामुळे होणारे अपचन जड आणि तळलेले पदार्थ खाल्ल्यामुडे होणारा पचनाच त्रास, गरोदरपणातील उलट्या, कावीळ आणि मुळव्याध त्रास कमी होतो. हे मिश्रण दिवसातून ३ वेळा घ्यावे.

खोकला आणि सर्दी :

खोकला असेल तर आल्याचा रस मधासोबत दिवसातून तीन चार वेळा घ्यावा. सर्दी असेल तर आल्याचे तुकडे टाकण पाणी उकळवावे. आले टाकून केलेल्या चहाने सुद्धा सर्दी बरी होते.

नपुंसकता :

आल्याचा रस कामोत्तेजक आहे. अर्धा चमचा आल्याचा रस, मध आणि अर्धवट उकळलेले अंडे रोज रात्री झोपताना महिनाभर घ्यावे. त्यामुळे लैंगिक अवयवांना बळ मिळते.  नपुंसकत्व दूर होते आणि संभोग पूर्व विर्यस्खलन होत नाही. स्वप्न दोष दूर होतो.

वेदना आणि दुखणे :

आले वेदनाशामक आहे. डोके दुखत असेल तर आले पाण्यामध्ये वाटून त्याचा लेप करून कपाळावर लावावा. याने दाढ दुखणे ही थांबते. कान दुखत असेल तर आल्याचा रस 2-3 थेंब कानात टाकावा.

इतर उपयोग :

आले आणि सुंठ असे आल्याचे दोन प्रकार आहे. चीनी स्वयंपाकात आले मासाल्याचा पदार्थ म्हणून जास्त प्रमाणात वापरतात. आल्याचे तेल सुगंधी द्रव्यात आणी औषधी मध्ये वापरतात.

पोटातील जंत रोग घरगुती उपचार.

सर्दी घरगुती उपाय कसा करतात

बाबा रामदेव घरगुती उपचार.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *